होळीची विविध राज्यांतील रुपं पाहून “भारत” देशाचं एक वेगळंच रंगीत चित्र उभं राहतं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
होळी म्हणजे उत्साह, नातेवाईक, खाणेपिणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे होळीचे वेगवेगळे रंग. होळीचा हा सण आपल्या जीवनात आनंद आणि उत्साह घेऊन येतो. हा सण आपल्या जीवनात अनेक रंग भरून जातो.
आपल्या महाराष्ट्रात रंग, गुलाल आणि पाणी ह्याशिवाय तर होळी साजरीच होत नाही. जोपर्यंत एखाद्या मित्राला रंग लावून त्याची रंगाच्या पाण्याने अंघोळ घालत नाही तोपर्यंत होळी खेळल्यासारखीच वाटत नाही.
देशाच्या इतर भागांत कशी होळी साजरी केली जात असेल?
रंगपंचमी – मध्यप्रदेश, महाराष्ट्र
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सर्व भागांमध्ये रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जातो. ह्या प्रदेशांतील लोक होळीला आणखी विशेष बनविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात.
ह्या राज्यांत होलिका दहनाच्या पाचव्या दिवशीपर्यंत होळी खेळली जाते. म्हणून ह्याला रंगपंचमीचा उत्सव असे म्हणतात.
लट्ठमार होळी -बरसाना
लाठ्ठ्मार होळी आपण अक्षय कुमारच्या “टॉयलेट-एक प्रेम कथा” ह्या चित्रपटात बघितली असेलच. पण ही होळी प्रत्यक्षात मथुरा जवळील राधाचे गावं बरसाना येथे खेळतात.
ह्या होळीच्या सणाला तेथील स्त्रिया पुरुषांना लठ्ठ म्हणजेच लाठीने मारतात आणि पुरुष त्यांच्या लाठीपासून वाचत त्यांना रंग लावण्याचा प्रयत्न करतात. ही होळी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.
–
हे ही वाचा – होळी आणि धूळवड का साजरी केली जाते? ही आहेत शास्त्रीय कारणं
–
खडी होळी – कुमाउंनी
उत्तराखंड येथील कुमाउंनी क्षेत्रात होळी खूप उत्साहाने साजरी केली जाते. तेथील लोकं होळीच्या दिवशी आपली पारंपारिक वस्त्रे घालून होळी खेळतात. सोबतच पारंपारिक गाणे गात ढोल-ताशांच्या तालावर नाचतात.
येथे साजरी होणारी होळी बैठीका होळी, खडी होळी आणि स्त्रियांची होळी इत्यादी नावाने ओळखली जाते.
होला मोहल्ला – पंजाब
शीख धर्मीयांमध्ये देखील होळीचं खूप महत्व आहे. शीख धर्माचे अनुयायी ह्या सणाला शारीरिक आणि सैनिक प्रबळतेच्या रुपात बघतात. म्हणून होळीच्या एका दिवसाआधी वेगवेगळे मैदानी खेळ आणि स्पर्धा ठेवण्यात येतात.
ढोल जात्रा – पश्चिम बंगाल
जर तुम्हाला देशातील सर्वात डिसेंट होळी खेळायची असेल तर बंगाल तुमच्यासाठी बेस्ट आहे. पश्चिम बंगाल येथे होळीच्या दिवशी एक जात्रा म्हणजेच यात्रा काढली जाते.
ह्यात ढोल-ताशांच्या तालावर लोकं नाचतात, कोरडे रंग आणि फुलं उडविले जातात. ह्यामध्ये स्त्रिया आणि पुरुष विशेष करून पिवळ्या रंगाचे कपडे घालतात.
शिमगा – गोवा
गोव्यात खासकरून एक वेगळी होळी साजरी केली जाते. यात शेतकरी आणि शेती करणारे इतर लोकं गोव्यातील रस्त्यांवर पारंपारिक गाण्यांवर नाचताना दिसून येतात. ह्यात तिथल्या स्थानिक लोकांबरोबरच पर्यटक देखील सहभागी होतात.
याओसांग – मणिपुर
आसाम येथे होळीचा सण हा ६ दिवसांचा असतो. ह्यादरम्यान प्रत्येक दिवशी इथल्या संस्कृतीच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळतात. तसेच होळीच्य दिवशी येथे पारंपारिक नृत्य ‘थांबला चोंगबा’चे आयोजन केले जाते.
मंजल कुली – केरळ
तसं बघितल्या गेलं तर दक्षिण भारतात होळी हा सण अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला जातो. पण येथील काही मोजक्या समाजातील लोकं होळी अतिशय उत्साहाने साजरी करतात. ह्याला ‘मंजल कुली’ म्हणतात. ह्यात रंग आणि फुलांचा वापर केला जातो.
फगुआ – बिहार
जर होळीची खरी मजा लुटायची आहे तर तुम्ही बिहारला जाऊ शकता. होळीचे रंग आणि बिहारी गाणे ह्या सणात आणखी उत्साहाची भर घालतात. तसेच येथे भांग देखील मोठ्या प्रमाणात वापरली जाते. त्यामुळे होळीत रंग, नाच-गाणे आणि भांग अशी असते बिहारची होळी.
रॉयल होळी – उदयपुर (राजस्थान)
राजस्थानच्या उदयपूर येथे होळी रॉयल पद्धतीने साजरी केली जाते. ज्यात होलिका दहनाआधी होलिकेला फुलांनी सजविल्या जाते. त्यानंतर सजविलेल्या घोडा-गाडींसोबत यात्रा काढली जाते. यात्रेनंतर विधिवत होलिकेला अग्नी दिली जाते.
तर अशी ही होळी सर्वांच्याचं जीवनात उत्साह आणि आनंद घेऊन येते…!
===
हे ही वाचा – महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तिपीठे आणि त्यांचा इतिहास नक्की वाचा!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.