आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – विशाल दळवी
===
“हे बघा रिपोर्टनुसार तुमच्या रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्या आहेत, या प्लेटलेट्स पुरेश्या प्रमाणात निर्माण होत नाहीत तोवर काळजी घ्यायला हवी.”
डॉक्टरांचे हे बोल ऐकताच आपल्या जीवाची अगदी घालमेल होते.
प्लेटलेट्स कमी झाल्या म्हणजे माझ्या जीवाला तर धोका नाही ना ही चिंता मनात अगदी घर करून बसते.
कारण त्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसते आणि दुसऱ्याच क्षणी मनात प्रश्न उभा राहतो,
“हे प्लेटलेट्स म्हणजे नेमकं काय?”
तर –
प्लेटलेट्स (थ्रोम्बोसाईट्स) अर्थात तंतुकणिका हा तसा रक्तातील महत्वाचा घटक!
हिमोग्लोबिन प्रमाणे त्याला देखील महत्वाचे स्थान! रक्त पातळ होऊ नं देण्याचे आणि रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास जास्त प्रमाणात होणारा रक्तस्त्राव रोखण्याच काम या प्लेटलेट्स करतात.
प्लेटलेट्सचे स्वरूप असतेच एका प्लेटप्रमाणे, म्हणून त्यांना प्लेटलेट्स हे नाव दिलं गेलं.
–
- तुमचा किंवा घरातल्या कोणाचाही रक्तगट O-निगेटिव्ह असेल तर तुम्ही हे वाचलंच पाहिजे!
- ‘रक्ता’विषयी तुम्ही या गोष्टी आजवर कधीही ऐकल्या नसतील !
–
रक्तात प्रामुख्याने तीन प्रकारच्या पेशी असतात – लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स.
या पेशींपैकी रक्तामध्ये प्लेटलेट्सची संख्या सर्वाधिक असते. आपल्या शरीरातील मोठ्या हाडांत असणाऱ्या रक्तमज्जेतील मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून प्लेटलेट्स तयार होतात. याचं आयुष्य साधारण ५ ते ९ दिवसाचं असतं.
आपल्या शरीराला कोठेही इजा झाली आणि त्यातून रक्तप्रवाह सुरु झाला की जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तस्त्राव खंडित करण्याचे काम करतात.
सामन्यात: मानवी शरीरात दीड लाख ते साडेचार लाख एवढ्या संख्येत प्लेटलेट्स आढळतात. प्लेटलेट्सची संख्या वाढल्यास रक्ताची गुठळी होऊन रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते.
यातूनच हृदयरोग, स्ट्रोक सारखे आजार उदयास येतात. हातापायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाहास अडथळा निर्माण झाल्यास तो भाग बधीर होऊन निकामी होण्याची शक्यता जास्त असते.
या उलट प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होतो, कारण त्याला रोखण्यासाठी पुरेश्या प्रमाणात प्लेटलेट्स उपलब्ध नसतात.
अशा परिस्थितीमध्ये नाकातून, हिरड्यांतून, थुंकीतून रक्त बाहेर पडतं. त्वचेवर लालसर ठिपके दिसून येतात.
डेंगू, मलेरिया, अनुवांशिक आजार आणि केमोथेरपीमुळे प्लेटलेट्सची संख्या कमी होते. सध्या डेंगू, मलेरिया, चिकुनगुन्या सारख्या रोगांनी थैमान घातल्यामुळेच प्लेटलेट्स तपासण्यासाठी डॉक्टर रक्त तपासणी करण्यास सांगतात.
ज्या आधारे पुढील उपचार करता येऊ शकतात. अशावेळेस प्लेटलेट्स कमी झाल्याचे निदान आल्यास पुढील गोष्टी जरूर लक्षात ठेवा:
१) लसून खाणे टाळावे
२) अधिक श्रमाचे व्यायाम आणि दगदग होईल अशी कामे करू नयेत
–
- तुमचा आहार तुमच्या ब्लड ग्रुपनुसार योग्य आहे ना!? बघा संशोधन काय सांगतं…!!
- बॉम्बे ब्लड ग्रुप! होय, हा आहे मराठी माणसाने शोधलेला दुर्मिळ ब्लड ग्रुप!!
–
३) दात घासताना हिरड्यांना ब्रश लागणार नाही याची काळजी घ्यावी
४) बद्धकोष्ठता होणार नाही याची काळजी घ्यावी
५) शरीराला कोणत्याही प्रकारे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी
नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आहारात पपई, गुळवेल, आवळा, भोपळा, पालक, नारळ पाणी आणि बीट यांचे सेवन जरूर करावे.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.