Site icon InMarathi

स्मार्टफोनचा अतिवापर तुमच्या मुलांचं भविष्य धोक्यात घालू शकतो

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

स्मार्टफोन्सने आपले जीवन खरंच अतिशय सोयीस्कर केले आहे. आज आपल्याला जे काही हवं असतं; ते आपल्याला आपल्या स्मार्टफोन द्वारे घर बसल्या मागवता येते, तिकीट बुक करता येते, जेवण मागवता येते, एवढच नाही तर बिल देखील भरता येते. काही लोकं ह्याला आधुनिक जगातील सर्वात मोठा शोध मानतात कारण ह्यामुळे जीवनातील अनेक कामे सोप्पी झाली आहेत.

 

indianexpress.com

पण हळूहळू हे वरदान अभिशापाकडे वाटचाल करू लागले आहे. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार हे आधुनिक जगातील खेळणं तुमच्या मुलांसाठी अतिशय घटक ठरू शकतं. कारण ह्याचा प्रवाभ सरळ त्यांच्या मानसिक तसेच शारीरिक विकासावर होतो.

 

lifehack.org

ब्रिटन येथे झालेल्या एका रीसर्चच्या मते, लहान मुलांसाठी हे स्मार्टफोन्स अत्यंत नुकसानदायक आहेत. ह्या शोधात असे दिसून आले की, ह्या स्मार्टफोन्सच्या अतिवापरामुळे लहान मुलांच्या बोटांचे स्नायू कमकुवत होत आहेत ज्यामुळे त्यांना पेन-पेन्सिल पकडण्यात अडचण येत आहे.

ही रिसर्च ब्रिटनच्या हार्ट ऑफ इंग्लंड फाउंडेशन ह्या वैज्ञानिकांनी केली. ह्याबाबत सांगताना बालरोगतज्ञ ह्यांनी सांगितले की, आजकाल शाळेत जाणारे लहान मुलांना हाता संबंधी काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

त्यांना पेन्सिल-पेन पकडण्यास अडचण होत आहे. जेव्हा की, १० वर्षांआधीपर्यंत असे नव्हते. ह्या शोधात असे समोर आले की, लहान मुलांची पेन पेन्सिलवरील पकड कमकुवत होत चालली आहे. ज्याच्या मोठा प्रभाव त्यांच्या लिखाणावर तसेच चित्रकलेसारख्या कलांवर देखील होतो आहे.

 

indianexpress.com

शोधकर्त्यांच्या मते पालकांना त्यांच्या मुलांना अश्या समस्यांना तोंड द्यावे लागू नये ह्यासाठी काही विशेष बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यांना त्यांच्या मुलांना स्मार्टफोन पासून दूर सरून इतर मैदानी खेळात व्यस्त करायला हवे. ज्यामुळे त्यांचे स्नायू मजबूत होतील.

 

india.com

तसेच मुलांना चित्रकला ह्यांसारख्या गोष्टी करण्यास प्रोत्साहित करा. त्याने त्यांचा रचनात्मक दृष्टीकोन वाढेल आणि त्यांना मानसिक विकास होण्यास मदत होईल.

सर्वात महत्वाच म्हणजे आपल्या मुलांना ह्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पासून जमेल तेवढं दूर ठेवा. त्यांना स्मार्टफोन्स किंवा टॅबलेटवर फार वेळ घालवू देऊ नका.

पुढे चालून तुमच्या मुलांनाही पेन-पेन्सिल हातात धरताना त्रास होऊ शकतो. तर थोडी काळजी घ्या आपल्या मुलांना ह्या त्रासापासून वाचवा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version