धावती ट्रेन “रूळाचे ट्रॅक” इतक्या सहजतेने कशी बदलते? एक जबरदस्त यंत्रणा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतीय रेल्वे म्हणजेच भारताची जीवन वाहिनी. ही जगातील सर्वांत मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. भारतातीय रेल्वेसेवेची सुरवात १८५३ मध्ये झाली. १९४७ पर्यंत भारतात ४२ रेल्वे कंपन्या होत्या. पण १९५१ मध्ये या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. जी जगातील सर्वांत मोठ्या संस्थांपैकी एक आहे.
भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.
–
- कोकण रेल्वेच्या जन्माची कथा : असामान्य धाडस आणि अफलातून इंजिनिअरिंगची कमाल
- रुळांवर माणसे दिसत असून देखील चालक ट्रेन का थांबवू शकत नाहीत?
–
२००३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतीय रेल्वे दररोज १ कोटी ६० लाख प्रवाशांची, तसेच १४ लाख टन मालाची वाहतूक करते.
भारतीय रेल्वेची गणना जगातील सर्वांत मोठ्या रेल्वेसेवेमध्ये केली जाते. २५ लाख कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे, जगातील सर्वांत मोठी व्यावसायिक संस्था आहे, जी कर्मचारीसंख्येत फक्त चिनी लष्करापेक्षा लहान आहे.
२००२ च्या आकडेवारीनुसार, भारतीय रेल्वेच्या मालकीत २,१६,७१७ वाघिणी (मालवाहू डबे), ३०,२६३ प्रवासी डबे आणि ७,७३९ इंजिन आहेत आणि रोज ८,७०२ प्रवासी गाड्यांसहित एकूण १४,४४४ गाड्या भारतीय रेल्वे चालवतात.
ट्रेनचा प्रवास हा बहुतेकांना आवडतो. ट्रेनच्या हॉर्नचा आवाज, रुळावरून चाकं फिरतानाचा आवाज, ट्रेनच्या खिडकी बाहेरील ते निसर्गरम्य देखावे, आणि ट्रेन वळण घेत असताना खिडकीतून तिला वळताना बघणे हे तर सर्वांनाच आवडते. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की, ट्रेन रूळ कसं बदलत असेल?
रस्त्यावर काय आपण गाडीला कसेही वळवू शकतो कारण रस्ता हा सपाट असतो. पण ट्रेनच तसं नसतं, ट्रेन ही रुळांवर धावते. तिचे रूळ हे सपाट नसतात. मग आपल्याला न कळता ती वळण कसं घेत असेल?
तुम्ही रूळ बघितले आहेत का? ते काही नेहेमी सरळ नसतात तर रुळांच जाळं पसरलेलं असतं. म्हणजे एखादे रूळ दुसऱ्याच कुठल्या रुळाला जोडलेले दिसते. पण ह्या रुळांवरून ट्रेन वळण कशी घेत असेलं? तर ह्यामागे एक मेकॅनिजम आहे.
तुम्ही कधी ट्रेनची चाकं बघितली आहेत का? ट्रेनची चाकं ही लोखंडाची असतात आणि रूळांमध्ये फसलेली असतात. त्यांची बनवत ही जरा वेगळ्या प्रकारची असते. ट्रेनच्या चाकांचा आतील भाग हा बाहेरील भागापेक्षा मोठा असतो. ज्याला Flagde असे म्हणतात.
ह्या Flagde मुळे ट्रेन रेल्वे रूळांवरून खाली उतरत नाही. ती नेहेमी त्या रुळांवर स्टेबल राहते. चाकांच्या आतील भाग म्हणजेच Flagde हा रूळांमध्ये समतोल राखतो.
–
- ऑक्सिजन एक्सप्रेस आधी तहानलेल्या लातूरकरांसाठी ही ट्रेन धावली होती…
- मुंबई ते ठाणे नव्हे, तर ‘या मार्गावर’ धावली आहे भारतातली पहिली रेल्वे!
–
ट्रेन रूळ कशी बदलते, ह्यामागे एक विशिष्ट यांत्रिक प्रणाली असते. ह्या प्रणालीला Railroad Switch असे म्हणतात. ह्यामध्ये एक रुळांची जोडी असते, ज्यांना switching rails किंवा points म्हणतात. हे एकमेकांना जोडलेले असतात.
Switching rails हे गाडीला मार्ग देतात, त्यांना कुठल्या मार्गाने जायचं आहे हे सांगतात. मग तो सरळ रस्ता असो किंवा वळणाचा गाडी कुठल्या मार्गाने जाईल हे या switching rails वर अवलंबून असतं.
Railroad Switch हे एका वेळी एकाच बाजूला जोडलेले असतात. जर ते रुळाला जोडलेले असेल तर ट्रेन आपला मार्ग बदलेलं आणि जर ते रुळाला जोडलेले नसेल तर ट्रेन सरळ जाईल.
आता हे कसं होत असेल ते समजून घेण्यासाठी घालील demonstration बघा…
तो switch अगदी व्यवस्थित सेट असणे खूप आवश्यक असते. बहुतक वेळी ट्रेन रुळावरून खाली उतरण्याच्या घटना ह्या ह्याच switching rails दरम्यानच्या हलगर्जीपणामुळे होतात. ह्यामध्ये जर थोडा जरी गॅप राहिला तर ट्रेन रुळावरून उतरून मोठा अपघात होऊ शकतो.
पण भारतीय रेल्वे तसेच जगभरातील रेल्वे व्यवस्थांनी रेल्वे रूळ बदलण्याची कला आत्मसात केली आहे. हे एवढ सहज रित्या केले जाते आपण ट्रेनमध्ये असून देखील आपल्याला हा बदल लक्षात येत नाही.
–
हे Switch नेहेमी दूरस्थपणे रेल्वेच्या वाहतूक ऑपरेशन केंद्राद्वारे नियंत्रित केले जातात. ट्रेन चालविणाऱ्या ड्रायव्हरला switching rails व्यवस्थित झाल्या आहेत की नाही ह्यासाठी काही सिग्नल्स देण्यात येतात, ज्यावरून ते ट्रेन त्या दिशेने पुढे नेतात.
तर ही आहे रेल्वेच्या वळण घेण्यामागील यंत्रणा.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.