आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपल्याकडे सध्या बिझनेसची क्रेझ खूप वाढली आहे. कारण आपल्या देशात नोकऱ्यांची वानवा आहे. म्हणजे काम करणारे तर आहेत पण कामच नाही, अशी आपली स्थिती.
म्हणूनच तरुणांना नवे उद्योग सुरु करण्याबद्दल लिहिलं-बोललं जात आहे. त्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे.
पण आपल्या देशासारखं प्रत्येक देशात नसतं! आपल्या देशात काम करणारे आहेत पण तेवढ्या संधी मिळत नाही. पण काही देश असे देखील आहेत जिथे काम आणि संधी आहे पण काम करणारे नाहीत.
मग असे देश जगातील लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना आखत असतात. त्यातील हे काही देश जे तुम्हाला कामाची संधी तर देतातच त्यासोबतच भरमसाठ पैसाही देतात.
आयरलंड :
आयरलंड संपूर्ण जगातील उद्योजकांना स्वतःकडे आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जो स्टार्ट अप बिझनेस सुरु केला आहे त्याची ग्रोथ होऊ शकतो, तो बऱ्यापैकी मोठा होऊ शकतो तर तुम्ही येथे फंडिंग करिता मागणी करू शकता.
तुमचा अर्ज स्वीकारण्यात आला तर तुम्हाला फंड म्हणून हजारो युरो-डॉलर मिळेल सोबतच आयरलंडमध्ये राहण्याची आणि काम करण्याची संधी देखील मिळेल.
चिली :
जर तुम्ही तुमचा स्टार्टअप बिझनेस सुरु करण्याच्या विचारात आहात तर तुमच्यासाठी चिली हा देश सर्वात उत्तम पर्याय आहे. तिथले सरकार तुम्हाला बिझनेस सुरु करण्यासाठी ५० हजार डॉलर देईल.
एवढंच नाही, तर ह्यादरम्यान ६ महिन्यांपर्यंत तुम्हाला तिथेच राहावे लागेल. फंडिंग सोबतच चिली येथे तुम्हाला एका वर्षांचा वर्किंग विजा देखील मिळेल. सोबतच बिझनेस कॉन्टॅक्ट्सची एक लिस्ट देखील मिळेल जी तुम्हाला तुमचा बिझनेस वाढविण्यासाठी मदत करेल.
येथे बिझनेस सुरु करण्याचा आणखी एक फायदा आहे, की येथे तुम्हाला भाषेचा कुठलाही त्रास होणार नाही कारण येथील प्रमुख भाषा ही इंग्रजी आहे.
कॅनडा :
जर तुम्ही पदवीधर आहात आणि तुमच्याजवळ नोकरी नाही तर तुम्ही कॅनडा येथे जाऊ शकता. येथे तुम्हाला २० हजार कॅनडीयन डॉलर ट्युशन परतफेडच्या रुपात मिळेल.
पण त्यासाठी तुमचे २०१० किंवा त्यानंतर कॉलेज ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. ही परतफेड नॉन रिफंडेबल टॅक्स क्रेडीटच्या रुपात दिली जाते.
कोरिया, थायलंड आणि व्हियेतनाम :
ह्या तिन्ही देशांत तुम्हाला सारख्याच सुविधा मिळतील. हे तीन देश युनायटेड स्टेट्स आणि युरोप येथील अश्या लोकांच्या शोधात असतात जे इंग्रजी आणि इतर विषय शिकवू शकतील.
कोरिया येथे तर ह्यासाठी भरमसाठ पैसा दिला जातो. तसेच येथे अश्या अनेक योजना आहेत ज्यानुसार आपल्या देशातून येथे येण्या-जाण्याचा खर्च देखील हे देश करतात.
कोरियाच्या तुलनेत थायलंड आणि व्हियेतनाम हे विकसनशील देश आहेत त्यामुळे ह्या देशांत कोरियापेक्षा कमी पैसा मिळतो.
न्युजीलंड :
न्यूजीलंड येथे लोकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना तेथे राहायला घरे दिली जातात.
कायतगटा शहरात जवळपास ४ एकराच्या जागेत बनलेलं घर ज्याची किंमत २३०,००० न्युजीलंड डॉलर आहे, ते लोकांना दिले जाते जेणे करून लोकं तिथे राहतील. येथे लोकांना त्या घराच्या अर्ध्या किमतीत ते घर दिल्या जाते.
असं करण्याचं सर्वात मोठे कारण म्हणजे त्या परिसरात असलेली काम करणाऱ्या तरुणांची कमतरता. येथे नोकऱ्या तर आहेत, पण त्या करायला लोकच नाहीत. म्हणून येथे लोकांना आकर्षित करण्यासाठी अशी शक्कल लढविली जाते.
एकुणात काय, भारतात तुम्ही स्टार्टअप सुरू करण्याच्या विचारात असाल- तर या देशांचाही तुम्ही नक्कीच विचार करू शकता.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.