अंतराळाबद्दल तुम्हाला माहित असलेल्या या गोष्टी म्हणजे केवळ ‘मिथक’ आहेत!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
अंतराळ, स्पेस हा असा विषय आहे, ज्याबाबत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना उत्सुकता असते.
सर्वांना ह्या आपल्या पृथ्वी बाहेरच्या जगात म्हणजेच अंतराळात नेमकं काय असेल, ते कसं असेल हे सर्व जाणून घेण्याची उत्सुकता असते.
आणि या उत्सुकतेतूनच अंतराळाबद्दल काही मिथकांनीही जन्म घेतला.
या मिथकांना आपण आजवर खरं मानत आलो आहोत. पण त्यात काहीही सत्य नसून ते केवळ आणि केवळ एक मिथक आहेत.
आज आपण अंतराळासंबंधी असेच काही मिथक आणि त्यामागचे सत्य पाहणार आहोत.
१. अंतराळातून चीनची भिंत दिसते…
अंतराळासंबंधी हे सर्वात प्रचलित मिथक आहे.
भलेही चीनची भिंत ही जगातील सर्वात लांब भिंत असेल. पण ती अंतराळातून दिसते हे काही खरे नाही.
चीनची भिंतच काय अंतराळातून पृथ्वीवर बनलेली कुठलाही इमारत किंवा इतर कोणतीही वस्तू दिसत नाहीत.
२. सूर्य पिवळ्या रंगाचा आहे
पृथ्वीवरून जरी आपल्याला सूर्य हा पिवळा दिसत असला तरी त्याचा रंग पिवळा नाही.
तो केवळ पृथ्वीवरील वातावरणामुळे आपल्याला पिवळ्या रंगाचा दिसतो.
सूर्यप्रकाश हा पृथ्वी भोवती असणाऱ्या वातावरणाच्या थर पार करत येतो.
त्यामुळे सूर्य किरणे आपल्याला लाल, केशरी किंवा पिवळ्या रंगाच्या दिसतात. पण सूर्य किरणे पिवळी दिसतात म्हणून सूर्यही पिवळा असेल असं नाही.
तर आपला सूर्य हा पांढऱ्या रंगाचा आहे. जर तुम्हीही अंतराळातून सूर्याला बघितले तर तो तुम्हाला पांढरा दिसेल.
३. एका दिवसात चंद्र पृथ्वीची एक परिक्रमा पूर्ण करतो
चंद्र हा इतर ग्रहांच्या तुलनेत अतिशय वेगाने फिरतो. पण तो एका दिवसात पृथ्वी भोवती एक परिक्रमा पूर्ण करतो, हे साफ खोटे आहे.
चंद्राला पृथ्वीभोवती एक परिक्रमा पूर्ण करायला २७ दिवस लागतात. आपल्याला रोज ज्या चंद्राच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळतात त्या यामुळेच.
४. अंतराळात कुठल्याही वस्तूच्या धडकण्याचा मोठा आवाज येतो
आपण चित्रपटांत तसेच कार्टून्समध्ये देखील बघितले असेल की, जेव्हा केव्हा अंतराळातील कुठली फाईट दाखविली जाते तेव्हा कुठल्याही दोन्ही गोष्टी एकमेकांवर आदळल्या की, जोरदार धमाका होतो आणि आवाज येतो असे दाखवले जाते.
पण हे सर्व स्पेशल इफेक्टमुळे होत असते. पण वास्तवात असे शक्य नाही.
कारण आवाजाला प्रवास करण्यासाठी एखाद्या माध्यमाची गरज असते, म्हणजेच हवा. अंतराळात हवा नसल्याने आवाजाचा प्रवास होत नाही आणि त्यामुळे आवाजही येत नाही.
५. जर स्पेस सूट घातला नाही तर अंतराळवीराचा विस्फोट होऊन जातो
हे खरे आहे की, विना स्पेस सूट कुठलाही अंतराळवीर जिवंत राहू शकत नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की, त्यांच्यात विस्फोट होतो.
असा स्फोट होण्याची कारणे काही वेगळी असतात. जर अंतराळ यानात कुठला विस्फोट झाला तर ठीक.
पण असा स्पेस सुट घातला नाही म्हणून अंतराळवीरांमध्ये विस्फोट होत नाही.
फक्त स्पेस सूट न घालता अंतराळाच्या बाहेर निघाले तर त्यांच्या शरीरातील रक्ताचा प्रवाह थांबून जाईल आणि शरीर फुगेल.
६. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते
अंतराळात हवा आणि पाणी नाही हे तर १०० टक्के खरे आहे. पण म्हणून तिथे गुरुत्वाकर्षण नाही हे खरे नाही, हे केवळ एक मिथक आहे.
अंतराळात प्रत्येक ठिकाणी थोडंफार गुरुत्वाकर्षण असतं, म्हणूनच चंद्र हा पृथ्वीभोवती परिक्रमा घालतो. जर गुरुत्वाकर्षण नसते तर चंद्र कधीचाच पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेला असता.
७. बुध हा ग्रह सर्वात उष्ण ग्रह आहे
बुध हा ग्रह सर्वात जास्त उष्ण ग्रह आहे हे देखील एक मिथक आहे.
बुध हा सूर्याच्या सर्वात जवळ असल्याने तो इतर ग्रहांच्या तुलनेत सर्वात उष्ण आहे असं म्हणतात. पण असे नाहीये.
कुठलाही ग्रह हा सूर्यापासून जवळ असेल किंवा दूर त्यांच्या त्या ग्रहाच्या उष्णतेवर काहीही फरक पडत नाही. ग्रहावर ज्या प्रकारच्या वायू असतात त्यावर त्याची उष्णता अवलंबून असते.
कारण बुध पेक्षा जास्त उष्ण शुक्र हा ग्रह आहे. कारण ह्या ग्रहावर कार्बनडाय ऑक्साईड हा वायू मोठ्या प्रमाणात आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.