' एक लीटरमध्ये विमान नेमकं किती मायलेज देते? हे रंजक उत्तर नक्की वाचा… – InMarathi

एक लीटरमध्ये विमान नेमकं किती मायलेज देते? हे रंजक उत्तर नक्की वाचा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

विमान प्रवासाबद्दल सामान्य माणसाच्या मनात नेहमीच कुतूहल असते. आयुष्यात एकदातरी आपण विमानातून प्रवास करावा असे स्वप्न बाळगून असलेले कितीतरी लोक सहज सापडतील. हवेत प्रवास करत इच्छित ठिकाणी तुलनेने खूपच लवकर पोहोचवणारे हे वाहन.

त्यामुळे हवाई वाहतुकीने दळणवळण क्षेत्रात क्रांती आणली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

विमान उड्डाणाच्या तांत्रिक बाजूंचा अभ्यास करणेही तेवढेच मजेदार आहे. विमान उडते कसे, जमिनीवर उतरते कसे, वेगवेगळ्या सुविधा विमानात कशा पुरवल्या जातात याबद्दल जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक असतो.

जगभरात अनेक असे लोक आहेत, जे नेहेमी विमानाने प्रवास करतात. जलद सेवा हे या वाहतुकीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य. त्यामुळेच अनेक लोक इतर मार्गांपेक्षा हवाई वाहतुकीचा वापर जास्त करतात.

 

Plane-heart attack-inmarathi02

 

वाहतुकीचे आर्थिक गणित ती चालवण्यासाठी लागणारा खर्च आणि होणारा नफा यावर अवलंबून असते.

त्यामुळे ठराविक अंतर जाण्यासाठी विमानाला किती इंधन लागते हा प्रश्न महत्वाचा आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ज्या विमानाने आपण प्रवास करतो त्या मायलेज किती असेल. हा दूरचा प्रवास करायला त्याला किती इंधन लागत असेल? त्याचे मायलेज किती असेल?

ह्याबाबत कदाचितच काही लोकांना माहित असेल. पण असे अनेक लोक असतील जे विमानाने तर प्रवास करतात पण त्यांना ह्याचे उत्तर ठाऊक नसेल.

हे विशाल पंख असलेले, २००-३०० लोकांना घेऊन सहज आकाशात झेप घेणारे विमान एक किलोमीटर चालण्यासाठी किती इंधन वापरत असेल. हे जाणून घेणे तुमच्यासाठी नक्कीच आश्चर्यकारक ठरणार आहे.

 

airplanes-inmarathi05

 

विमान प्रती सेकंदाला जवळपास ४ लिटर इंधन खर्च करते.

जर बोईंग 747 असेल तर ते प्रती मिनिटाला २४० लिटर इंधन खर्च करते. एका रिपोर्टनुसार बोईंग 747 सारखे विमान १ लिटर इंधनामध्ये किती अंतराचा प्रवास करू शकते, तर फक्त ०.८ किलोमीटर. हे विमान १२ तासांच्या प्रवासा दरम्यान १७२,८०० लिटर इंधन खर्च करते.

एका बोईंग वेबसाईटच्या आकड्यांनुसार बोईंग 747 विमानामध्ये एक गॅलन (जवळपास ४ लिटर) इंधन प्रत्येक सेकंदाला लागते.

ह्या विमानात १० तासांच्या प्रवासादरम्यान ३६ हजार गॅलन (१५० हजार लिटर) इंधन वापरले जाते. बोईंग 747 प्लेन मध्ये जवळपास ५ गॅलन इंधन प्रती मैल जळत असते.

बोईंग 747 विमान एका किलोमीटर मध्ये १२ लिटर इंधन खर्च करते. म्हणजेच हे विमान ५०० प्रवाश्यांना घेऊन १२ लिटर इंधनामध्ये जवळपास १ किलोमीटरचा प्रवास करते. ह्यानुसार हे विमान एका किलोमीटरमध्ये प्रतिव्यक्तीवर ०.०२४ लिटर इंधन खर्च करतो.

 

 

बोईंग 747 आपल्या १०० किलोमीटरच्या प्रवासादरम्यान प्रतिव्यक्ती २.४ लिटर इंधन खर्च करतो. आणि हे तुमच्या कार पेक्षा कमी आहे.

एक कार १०० किलोमीटरमध्ये ४ लिटर इंधन खर्च करते. जर कार मध्ये ४ व्यक्ती प्रवास करत आहेत तर ठीक आहे. पण जर कार मध्ये एकच व्यक्ती प्रवास करत असेल तर बोईंग विमान कारपेक्षा कमी इंधन खर्च वापरते असे म्हणावे लागेल.

असे असले तरी इतर खर्च लक्षात घेता विमानासाठी लागणाऱ्या इंधनाच्या वाढत्या किमती ही विमान कंपन्यांसाठी नेहमीच एक चिंतेची बाब राहिली आहे.

विमानाचे मायलेज मानवी पातळीवर काही मर्यादा असल्या तरी नियंत्रित करता येईल का यावरही संशोधन चालू आहे.

त्यातून एक निष्कर्ष असा निघाला की विमानाने जास्त मायलेज देणे पायलटच्या विमान नियान्त्रीय करण्याच्या कसबावर बर्यापैकी अवलंबून आहे.

 

pilot-inmarathi

 

“पिस्टन विमान” या प्रकारात मोडणाऱ्या विमानांचे फस्त करण्याचे प्रमाण तर पायलटने त्याचा स्पीड किती ठेवलाय यावर अवलंबून असते. म्हणजे जितका जास्त वेग तितके जास्त इंधनाची आवश्यकता.

हा वेग नियंत्रणात ठेवण्यात वैमानिकाला कौशल्य हस्तगत असेल तर त्या विमानाचा इंधन वापर नियंत्रित करणे शक्य आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?