Site icon InMarathi

या कारणामुळे फाशी देण्याआधी गुन्हेगाराला शेवटची इच्छा विचारली जाते!

crime featured

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलीवूड म्हणजे फुल ऑन ड्रामा. ८०-९० च्या दशकात जेव्हा गुंड हिरोवर बंदूक धरायचा आणि मग विचारायचा की,

“तुम्हारी कोई आखरी ख्वाहिश”…

हा संवाद आपल्या पुरेसा परिचयाचा आहे. गुन्हेगाराला फाशी देण्याच्या आधी शेवटची इच्छा विचारण्याच्या या प्रथेचे मूळ मध्ययुगीन युरोपातल्या एका मान्यतेत सापडते.

मृत्युच्या दारात उभ्या असलेल्या व्यक्तीला तिची शेवटची इच्छा विचारणे आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे. मग ती व्यक्ती कितीही वाईट का असेना. ती गुन्हेगारच का असेना.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

प्रत्येकाची शेवटची इच्छा पूर्ण व्हायला हवी, असा आग्रह त्या काळात युरोपात असायचा.

युरोपातील हा आग्रह पुढे अनेक ठिकाणी रूढ झाला. म्हणूनच, फाशीची शिक्षा अमलात आणण्याआधी त्या व्यक्तीची शेवटची इच्छा विचारण्याची प्रथा सुरु झाली.

 

 

शेवटची इच्छा का विचारली जाते?

या परंपरेची मुळे मध्ययुगीन युरोपीय लोकसाहित्यात आहेत. त्या काळात तिकडे अशी मान्यता होती की कुणाच्या तरी आश्रयात राहणे आणि भोजन घेणे ही पवित्र गोष्ट आहे.

त्यामुळे त्या व्यक्तीचे अधिकार वाढतात. त्या अधिकाराचे उल्लंघन करणे हे पाप मानले जात असे.

असे केल्याने फाशी दिल्यानंतर मृत व्यक्तीचे भूत त्रास देते अशी श्रद्धा होती. या भूताखेतांपासून बचाव व्हावा म्हणून फाशी जाणाऱ्या व्यक्तीची शेवटची इच्छा पूर्ण करण्याची प्रथा होती.

शेवटची इच्छा म्हणून तर तो गुन्हेगार काहीही मागू शकतो ना?

आता आपल्याला हे तर माहित आहे की, एखाद्या गुन्हेगाराला जेव्हा फाशीची शिक्षा दिली जाते तेव्हा फाशी देण्याआधी “त्याची काही शेवटची इच्छा आहे का” असे विचारण्यात येते.

पण आपल्या डोक्यात असा प्रश्न आलाय का, की जर गुन्हेगाराला त्याची शेवटची इच्छा विचारली आणि त्याने काही असं मागितलं जे नैतिकतेच्या बाहेरचे किंवा आपल्या देशाकरिता घातक असेल तर… मग काय करायचं?

गुन्हेगाराची शेवटची इच्छा पूर्ण करण्याच्याही काही अटी असतात.

म्हणजेच फाशी देण्यात येणाऱ्या व्यक्तीला त्याची शेवटची इच्छा मागण्याचा हक्क तर दिला जातोच पण त्यासोबतच काही अटी देखील लागू करण्यात आल्या आहेत.

 

हे ही वाचा – कुप्रसिद्ध गुन्हेगारांसाठीच्या दक्षिण आशियातील सर्वांत मोठ्या जेलबद्दलची रंजक माहिती…

फाशीची शिक्षा मिळालेल्या गुन्हेगाराला त्याच्या फाशीआधी त्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्याची एक संधी दिली जाते. पण ह्या इच्छांना काही मर्यादाही घालण्यात आल्या आहेत.

फाशीची शिक्षा देण्यात आलेल्या गुन्हेगाराला त्याच्या शेवटच्या इच्छेमध्ये आपली शिक्षा माफ करून घेता येत नाही.

पण गुन्हेगाराला हा अधिकार असतो की, तो त्याच्या शेवटच्या इच्छेत आपलं आवडतं जेवण किंवा कुठलाही स्पेशल खाद्यपदार्थ तुरुंग प्रशासनाकडे मागू शकतो.

आणि त्याची ही इच्छा अगदी आनंदाने पूर्ण देखील केली जाते.

फाशीची शिक्षा मिळालेल्या व्यक्तीला त्याच्या शेवटच्या इच्छेत आपल्या कुटुंबियांना भेटण्याची इच्छा देखील व्यक्त करता येते. अश्या प्रसंगी तुरुंग प्रशासन गुन्हेगाराच्या संपूर्ण कुटुंबाशी त्याची भेट करवून देतात.

तसेच फाशीची शिक्षा मिळालेला व्यक्ती आपल्या शेवटच्या वेळेत आपल्या धर्मानुसार कुठलाही पवित्र धर्मग्रंथ वाचायची इच्छा व्यक्त करू शकतो. त्यानंतर त्याच्या धर्मानुसार किंवा त्याला हवी ती पुस्तकं, ग्रंथ त्याला वाचायला दिले जातात.

 

 

भारतीय संविधानानुसार फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला गुन्हेगार जर ह्या व्यतिरिक्त इतर कुठल्या गोष्टीची इच्छा व्यक्त करत असेल तर ती पूर्ण करायची की, नाही यावर विचार करण्याचा कुठलाही नियम आपल्या संविधानात नाही.

त्यामुळे कुठलाही गुन्हेगार शेवटची इच्छा म्हणून काहीही मागू शकत नाही. कारण त्याच्याही काही अटी असतात.

म्हणजेच, शेवटची इच्छा म्हणून मनाला वाटेल तसं वागणं त्या गुन्हेगाराला शक्य नसतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version