आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
लेखक: बापू शिंदे
===
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी शिवपुर्वकालीन भारतातील परिस्थितीचे अवलोकन करणे गरजेचे आहे. भारतातील शिवपूर्वकालीन राजवट ही विशिष्ट धर्माची होती. राजा व त्याचे शासक इस्लाम धर्मानुयायी होते. इस्लामचे शास्त्रीय कायदेच येथे सर्वोच्च होते, व्यवहार त्याच धोरणाने चाले.
कुरणाच्या आधारे येथील उलेमा सदैव मूर्तीपूजा व इस्लाम विरोध साफ मोडून काढण्यासाठी सुलतानावर प्रभावी दडपण आणत.
सुलतानही बव्हंशी त्यांच्यासमोर दबत. कारण इस्लाम धर्मानुसार राज्य अल्लाचे असून त्यांचा प्रतिनिधी म्हणून सुलतानाने कार्य करायचे असते.
काफिरासंबंधी कुराणाचे आदेश होते, “पैगंबराचा इन्कार करणा-यास क्षमा नाही, हे नबी, काफिराविरूद्ध जिहाद कर, ज्यावेळी काफीरांशी मुठभेड होईल, त्यावेळी त्यांच्या गर्दना कापा, चांगले कुचलून काढा, वाचलेल्यांना कैद करा. इस्लाम धर्मानुसार हजरत मुहम्मद हे शेवटचे प्रेषित असून कुराण अपरिवर्तनीय आहे.”
कोणत्याही धर्म ग्रंथात काही भाग कालसापेक्ष, काही भाग कालनिरपेक्ष किंवा शाश्वत स्वरूपाचा असतो. कालसापेक्ष भाग स्वाभाविकपणे कालांतराने कालबाह्य ठरत असतो म्हणूनच त्यावेळी त्याज्य समजायला पाहिजे. कुराणाकडे याच दृष्ठीने पाहवे लागेल.
इस्लामचा भारताशी प्रामुख्याने संबंध आला, तो मुहम्मद बिन कासीमच्या वेळी इ.स. ७११ मध्ये. यावेळी मुहंमद पैगंबरांचा मृत्यू झालेला असून इस्लाम पूर्ण जोशात होता. इस्लामचे पुरस्कर्ते जगात जेथे जेथे गेले तेथे त्यांनी तीन पर्याय लोकांसमोर ठेवले:
१- इस्लामचा स्वीकार करावा
२- अथवा कर देवून गुलामगिरी स्वीकारा
३- युद्धार्थ सिद्ध व्हा.
त्यावेळच्या स्वाऱ्याची जी वर्णने उपलब्ध आहेत त्यावरून मंदिरांचा विध्वंस करणे, हजारो लोकांच्या कत्तली करणे,हजारोंना गुलाम म्हणून कैद करणे, स्त्रियांचा उपभोगार्थ उपयोग करणे, प्रजेवर जिझिया कर बसवणे या प्रकारचे अनेक अत्याचार केलेले दिसून येतात.
महमुद गझनवीने भारतावर एकूण सतरा स्वाऱ्या करून येथून प्रचंड लुट गोळा करून नेली. निव्वळ लूटच नेली नाही तर अगणित मनुष्य संहार केला, शिवाय स्वधर्म प्रचाराच्या नावाखाली क्रूरपणे इथल्या लोकांच्या धार्मिक भावनांवर तीव्र आघात केले.
अल्बेरुनी हा त्याचा समकालीन अरबी लेखक आहे. त्याने भारताविषयी ज्या हकीकती लिहून ठेवल्या आहेत त्यात महमुदाविषयी लिहिताना तो म्हणतो “महमूद गझनीने भारताचे वैभव समूळ नष्ट केले”. अशी चाल तो चालला की, “जेणेकरून हिंदू लोक मातीच्या परमाणू प्रमाणे उधळले गेले”….
महमुदाच्या मते हिंदू काफिर होते व म्हणून त्यांना नरकाच्या भट्टीत जाळणे गरजेचे होते.
पुढे महमद घोरी हिंदुस्तानावर चालून आला. त्याची प्रतिज्ञाच होती की या “काकमुखी हिंदुना” नरक यातना भोगायला लावू. महमद घोरीनेच इस्लामी राज्याचा पाया भारतात घातला. कुतुबुद्दीन ऐबक नावाचा गुलाम इथे बंदोबस्तासाठी त्याने मागे ठेवला. त्याने दिल्लीस सुलतानशाही ची स्थापना केली व इस्लामी राजवट हिंदुस्थानात सुरु झाली.
गुलाम घराण्यातील सर्व सुलतान एतदेशियांसाठी कर्दनकाळ होते. नमुन्यादाखल बल्बन घेऊ. दिल्लीच्या आसपास “शांतता” प्रस्थापीत करण्यासाठी त्याने एक लाख लोक निर्घुणपणे ठार मारले. बंगालमध्ये तर अनेक वधस्तंभ ओळीने उभा करून त्याने हजारो लोकांना ज्या पद्धतीने सुळावर लटकावले त्या पद्धतीचे क्रोर्य तत्पूर्वी हिंदुस्थानने कधीच पाहिलेले नव्हते.
गुलाम घराण्यानंतर खल्जी घराणे राज्यावर आले. अल्लाउद्दीन खल्जी हा या घराण्यातील सर्व श्रेष्ठ सुलतान मानला जातो.
त्याची व त्याच्या काझीची इस्लाम व हिंदू बद्दलची धारणा काय होती हे झिया बराणी या समकाली इतिहासकाराच्या हकीकतीवरून कळून येते. बराणीच्या म्हणण्यानुसार एकदा अल्लाउद्दीनने काझीला विचारले, की आपल्या धर्मग्रथानुसार हिंदूंचे वर्तन कसे असावे? काझी उत्तरला
“की हिंदूंचे काम कर देण्याचे आहे, आपल्या अधिकाऱ्यांनी त्यांना चांदी मागितली असेल तर हिंदुनी अत्यंत आदरपूर्वक बिनतक्रार सोने दिले पाहिजे, अधिकारी जर त्यांच्या तोंडावर थुकंला तर त्यांनी निमुटपणे ती झेलण्यासाठी तोंडाचा आ केला पाहिजे. असे वर्तन केले तरच ते शरण आले म्हणून समजा. त्यांची मानखंडना करावी अशी अल्लाचीच आज्ञा आहे. हजरत पैंगबराची आपणास आज्ञा आहे की त्यांचा वध करा, त्यांना लुटा त्यांना बंदी करा.”
=====
सदर लेखावर मतभेद असतील तर आपला प्रतिवाद आमच्या फेसबुक पेजवर मेसेज करावा. अभ्यासपूर्ण आणि सभ्य शब्दात व्यक्त केलेल्या प्रतिवादांना प्रसिद्धी नक्कीच देण्यात येईल. आमच्या फेसबुक पेजची लिंक: facebook.com/MarathiPizza
=====
धर्मपंडित मुघीसउद्दीन (Mughis-ud-din) याने मुसलमानांच्या पवित्र धर्मग्रंथाचा आधार घेऊन अल्लाउद्दीन खिलजीला सांगीतले त्याप्रमाणे ‘इस्लाम धर्म हाच खरा धर्म आहे,पाखंडयांना (गैर मुस्लिमांना) नष्ट करा, त्यांची लुट करा आणि त्यांना पकडून तुरुंगात टाका, असा प्रेषिताने आदेशच दिलेला आहे.
(जिझिया कर म्हणजे बदली पैसा. तुम्ही इस्लाम धर्म स्वीकारीत नाही म्हणून त्याऐवजी घेतलेला पैसा.) शिवपूर्वकालात सर्वच इस्लामिक राजवटीत धर्माधिकाऱ्यांनुसार हिंदूंच्या बाबतीत एकच कायदा लागू आहे, तो म्हणजे एकतर मुसलमान धर्म स्वीकारा किंवा कर भरा किंवा मृत्यू पत्करा.
मुह्म्मदानंतर फिरुशाह, सय्यद, लोदी या घराण्यातील नामधारी सुल्तानानंतर बाबराने जो चंचू प्रवेश केला,तोही तैमुर वंशजाचा मोगल साम्राज्याचा संस्थापक म्हणून. बाबराचे अतिशय महत्व आहे. त्याने लिहिलेले “तुज्क-ए-बाबरी” नामक आत्मचरित्र उपलब्ध आहे. त्यावरून काफिरांच्या शिरांचे पहाडीवर मनोरे रचून विजयोल्लास करण्याची त्याला खूप आवड होती.
या कत्तली बरोबरच त्याचा हिंदू बद्दलचा घृणीत भाव अन्य मार्गांनीही दिसून आला. चंदेरीच्या मेदिनीराय विरुद्ध युद्ध पुकारताना त्याने जिहादचा नारा बुलंद केला होता.
अनेक हिंदू स्त्रिया व मुले यांची विक्री केली व त्यांना दास बनविले. सुंदर तरुण राजकन्या उपभोगार्थ वितरीत केल्या. अयोध्येच्या राम मंदिराचे मशिदीत रुपांतर केले.
तुर्की कारकिर्दीत आपल्या राज्यांच्या सीमेबाहेर कोणत्याही आक्रमक युद्धात हिंदूंची कत्तल करून एक प्रकारे पावित्र आणले जाऊ लागले. हिंदूंची कत्तल म्हणजे अल्लाकडे जाण्याच्या मार्गातील एक जिहाद आणि म्हणून ते प्रत्येकाचे परम कर्तव्य होय, अशा प्रकारची मुस्लीम समाजाची मनोवृत्ती बनली.
काफिरांचा वध म्हणजे प्रत्येक मुसलमानाचे पुण्य समजले जाऊ लागले. कोणत्याही मुसलमानाला खरी मुक्ती मिळविण्याकरिता किंवा स्वर्ग मिळविण्याकरिता काही विशिष्टवर्गीय लोकांची कत्तल करणे किंवा त्यांच्या मालमत्तेची आणि संपत्तीची लुट करणे एवढेच कृत्य त्याकरिता पुरेसे ठरू लागले.
ज्या धर्माच्या अनुयायांना खून आणि दरोडेखोरी करणे हे प्रत्येकाचे धार्मिक कर्तव्य आहे अशी शिकवण देण्यात येते असा धर्म मानवी प्रगतीच्या आणि जगातील शांततेच्या विरोधीच ठरतो.
सम्राट अकबर हा आदर्श राजा होता अशी सर्वसाधारणपणे समजूत आहे. त्यात बरेचसे तथ्यही असेल. मात्र इ. स.१५६७ -६८ मध्ये अकबराने चित्तोडवर स्वारी केली, तेव्हा चित्तोडवर विजय प्राप्त होऊनही केवळ राजपुतांनी कडवा प्रतिकार केला या कारणावरून चिडून जाऊन त्याने सर्वसाधारण प्रजेच्या कत्तले आम चा आदेश दिला.
त्यानुसार त्याच्या डोळ्यादेखत तीस हजार निर्दोषी प्रजाजन कापले गेले. चितोडच्या या सर्व हत्याकांडात जे राजपूत मारले गेलेत त्यांची जानवे अकबराने उत्सुकता म्हणून तोडून आणली व त्याचे वजन केले ते ७४|| मन (चार शेरी) भरले. त्यावेळेपासून राजस्थानात ७४|| हा अंक अशुभ समजला जाऊ लागला.
शिवपूर्वकालात भारतात लोक इस्लामी आघातामुळे दिड़मुढ झाले होते, पिढ्यानपिढ्या चे करपलेले जीवन आणखी किती पिढ्या भाळी लिहिलेले आहे, यांची कल्पना नसल्याने बिचाऱ्या अनाथ प्रजेचे जीवन निरस, रुक्ष झाले असल्यास नवल कोणते?
भाग १ व भाग २ साठी वापरलेले संदर्भ:
१ शककर्ते शिवराय खंड पहिला (लेखक: विजय देशमुख )
२ औरंगजेब (लेखक: जदुनाथ सरकार )
३ राजा शिवछत्रपती खंड १ (लेखक: गजानन भास्कर मेहंदळे)
४ मराठ्यांचा इतिहास खंड १ (लेखक: अ.रा. कुलकर्णी आणि ग.ह. खरे)
५ विकेपिडीया – “फतवा ए अलामगिरी”
क्रमशः
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.