Site icon InMarathi

घरगुती सफाईसाठी केमिकल्स वापरत असाल तर स्वतःसह कुटुंबासाठीही मोठा धोका निर्माण करत आहात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सकाळी पती नोकरीवर आणि मुलं शाळा-कॉलेजात गेली की घरात उरते केवळ ‘ती’… आणि मग सुरु होते तिची तारेवरची कसरत, म्हणजेच घरातली सर्व कामे. धुणं-भांडी, स्वयंपाक, आवराआवर आणि घरातली साफसफाई. ह्यातच तिचा संपूर्ण दिवस जातो.

 

Good Housekeeping

ह्या सर्वांत तिची जरा मदत व्हावी म्हणून आजच्या आधुनिक युगातील आधुनिक कंपन्यांनी क्लिनिंग प्रोडक्ट्सची निर्मिती केली आहे. म्हणजे आधी भांडी घासायला जिथे राखेचा वापर व्हायचा आज त्याची जागा विम बार ने घेतली आहे, आणि ते पण निंबू वाल्या बरं का!

कपड्यांसाठी रिन बार, टाईड, सर्फ एक्सेल वगैरे वगैरे. इथपर्यंत ठीक होतं.

पण लादी आणि घरातील फर्निचरवर बसलेली धूळ पुसण्यासाठी देखील आता क्लिनिंग प्रोडक्ट्स वापरले जातात.

आधी जिथे हे सर्व साफ करण्यासाठी केवळ पाण्याचा वापर व्हायचा आज त्याची जागा ह्या क्लिनिंग प्रोडक्ट्स ने घेतली आहे.

 

 

हेही ठीकच आहे. कारण त्याने आपलं काम सोपं होतं. धूळ लवकर निघते आणि फर्निचर देखील अगदी चकाचक दिसते. पण हे क्लिनिंग प्रोडक्ट्स म्हणजे काही जादू नव्हे, की असचं सर्व साफ होईल. तर ह्यासाठी त्यात वेगवेगळे केमिकल वापरले जातात. यामुळे ते धूळ लवकर साफ करतात.

आणि बरं का, ते जाहिरातीत सांगितल्या प्रमाणे जंतू देखील साफ होतात म्हणे… पण केमिकल कुठलेही असो त्याचा अती वापर हा आधीही हानिकारकच.

मग ती पांढऱ्या कोट वाली बाई कितीही सांगुदेत की, ह्याने तुमची लादी अगदी साफ होईल आणि जंतू देखील मारतील. म्हणजे तुमच्या लहान बाळांसोबत लादीवर खेळणे एकदम सुरक्षित.

खरंय, ह्याने तुमची लादी, फर्निचर नक्की साफ होईल पण ते केमिकल जे तुमच्या श्वसननलिकेतून तुमच्या शरीरात जाते त्याचे काय?

 

rd.com

नॉर्वे येथील University of Bergen येथील रिसर्चर यांनी दावा केला आहे की,

“रोज साफसफाई करण्यासाठी आपण जो स्प्रे वापरतो त्याचा आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. ह्या स्प्रेचा वापर करेणे म्हणजे रोज २० सिगारेट ओढून शरीरावर जो परिणाम होतो तितकाच अपाय करून घेणे होय.”

रिसर्चर्स नुसार सफाई करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ह्या क्लिनिंग प्रोडक्ट्समध्ये अमोनिया सारखे केमिकल असतात. जे आपल्या शरीरासाठी अतिशय हानिकारक असतात.

त्यामुळे महिलांना श्वसनासंबंधी आजार होण्याची शक्यता वाढते.

American Thoracic Society च्या अअमेरिकन जर्नल ऑफ रेस्पीरेटरी अॅण्ड क्रिटीकल केअर मेडिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या शोधानुसार, साफ-सफाई करण्यासाठी अधिक केमिकलचा वापर करणाऱ्या महिलांचे Airways रोज हळू-हळू खराब होत असते.

 

digest.bps.org.uk

University of Bergen चे प्राध्यापक Cecile Svanes ह्यांच्या मते, अस्थमा सारख्या आजारांवर ह्या केमिकल्स चा प्रभाव कमी कालावधीकरिता होतो, ज्याचे अनेक पुरावे आम्हाला मिळाले आहेत.

ह्याचा दीर्घकाळ परिणाम होतात असे कुठलेही प्रकरण अद्याप आढळलेले नाही.

 

ndtv.com

University of Bergen च्या स्टडी नुसार, घराची साफ-सफाई ही महिलांच्या फुफ्फुसांवर एका वेळी २० सिगारेट ओढण्या एवढा परिणाम करते. ह्यामुळे त्यांच्या श्वसनासंबंधित आजार होण्याची शक्यता टाळता येत नाही.

ह्या रिपोर्टमध्ये असा दावा देखील करण्यात आला आहे की, घरची साफ-सफाई करण्याऱ्या पुरुषांच्या फुफ्फुसांवर महिलांच्या तुलनेत कमी परिणाम होतो.

हे संशोधन ६२३५ महिला आणि पुरुषांवर करण्यात आले आहे.

ह्या संशोधनात हे देखील समोर आले आहे की, कार्यालय तसेच घरात साफ-सफाई करणाऱ्या महिलांमध्ये अस्थमा हा आजार मोठ्या प्रमाणावर आढळतो. त्यांची संख्या १२.३ टक्के ते १३.७ टक्के आहे, तर साफ-सफाई न करणाऱ्या महिलांमध्ये ह्या आजाराची संख्या ९.६ टक्के आहे.

 

hindustantimes.com

म्हणून हे केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरणे टाळावे. कारण ते तुमच्या आरोग्यासाठी अपायकारक आहे. त्याएवजी तुम्ही केमिकल फ्री प्रोडक्ट्स चा वापर करू शकता. जेणेकरून त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होणार नाही. तसेच आपल्या घरात नेहेमी हवा खेळती असेल अशी व्यवस्था करा. साफ-सफाई करताना नाका-तोंडाला झाका. आणि हे अश्या प्रकारचे प्रोडक्ट्स वापरणे टाळा…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version