मानवी कल्पनाशक्तीचा अविष्कार : पाण्यावर तरंगणारे विमानतळ
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
सुरुवातीला मनुष्याकडे दळणवळणाची खूप कमी साधने होती, पण जसजशी विज्ञानामध्ये प्रगती झाली तसेतसे माणसाला विविध सुखसुविधा मिळू लागल्या. विज्ञानामुळे असे काही आश्चर्यकारक शोध लागले, ज्याची माणसाने कधी कल्पना देखील केली नव्हती. हळूहळू दळणवळणाच्या सुविधा देखील वाढल्या आणि माणसे कमी वेळामध्ये जास्त अंतर कापू लागले. विमान हा विज्ञानाच्याच अविष्काराचा एक भाग आहे.
विमान हे आपल्याला खूप कमी वेळामध्ये लांबचा पल्ला गाठून देण्यास मदत करते. पण विमानासाठी लागणाऱ्या धावपट्टीला आणि विमानतळाला जागा देखील तेवढीच जास्त लागते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी विमानतळ बांधणे शक्य नसते.
पण कधी तुम्ही तरंगणाऱ्या विमानतळाची कल्पना केली आहे का ? आजूबाजूला संपूर्ण पाणी त्यामध्ये एक सुंदर असे विमानतळ ज्यावर उतरताना जणू काही आपण पाण्यातच उतरत असल्याचा भास होईल. पण हे लवकरच सत्यात उतरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. याबद्दलचे काही युक्तिवाद पाहिल्यापासूनच इंजिनियर्स मांडत आलेले आहेत.
जर तुम्ही बांधकाम मोठ्या संरचनेत तयार केले आणि मजबूत बनवले, तर लाटांचा त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही. त्यासाठी योग्य रचनेत आणि योग्य ठिकाणी बांधकाम करणे आवश्यक आहे. हे एक नक्कीच मोठे अभियांत्रिकी आव्हान असेल आणि याच्या बांधकामाचा खर्च देखील भरपूर असेल.
ही अभियंत्यांची एक कल्पना आहे, जी कितीतरी दशकापासून त्याच्या डोक्यामध्ये चालू होती. १९३० मध्ये या विमानतळाबद्दलची कल्पना मांडण्यात आली होती.
एका मॅगझिनच्या लेखामध्ये असे सुचवण्यात आले होते की, हे विमानतळ अटलांटिक महासागरामध्ये काही स्तंभांवर ४०० मैल म्हणजेच ६४३ किलोमीटर आतमध्ये तयार करण्यात येऊ शकते. हे स्तंभ विमानतळाला लाटांपासून ८० फूट म्हणजेच २४ फूट उंचीवर धरून ठेवतील.
या विमानतळाच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारच्या इमारती बांधण्याचे त्यामध्ये सांगितलेले नव्हते. पण त्यानंतर १९९५ मध्ये अशीच एक कल्पना समोर आली होती. या धावपट्टीसाठी टोकियोच्या कंपन्यांनी टेक्नॉलॉजी रिसर्च असोसिएशनची स्थापना केली. या समूहाने या महत्वकांक्षी नमुना संरचनेला निधी दिला. ही धावपट्टी टोकियो बेमध्ये ३२८१ फूट म्हणजेच १००० मीटर इतक्या अंतरावर कृत्रिमरित्या तयार करण्यात येणार होती.
या बेटावर इंटरलॉकिंग तुकडे रचण्यात आले, प्रत्येकी ९८४ फूट बाय १९७ फूट म्हणजेच ३०० मीटर बाय ६० मीटर. यावर लाटांचा आणि आगीचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नव्हता. त्यांनी यावर टेक- ऑफ आणि लँडिंगची चाचणी देखील आयोजित केली होती आणि ती यशस्वी देखील झाली.
या मेगाफ्लोटची चाचणी तर योग्यप्रकारे झाली, पण त्यांना अजून मोठ्या संरचनेमध्ये ते तयार करायचे होते. त्यामुळे ते काही काळासाठी थांबले, पण ही कल्पना पूर्णपणे सोडून देण्यात आली नाही. युकेमध्ये याबद्दल विचार करण्यात येत आहे. २०३० पर्यंत हीथ्रो विमानतळामध्ये प्रवाश्यांची संख्या खूप अधिक प्रमाणात वाढणार आहे, त्यामुळे तिथे त्याच्याआधीच एक नवीन विमानतळ बांधणे खूप गरजेचे आहे.
परिवहन विभागाचे अनुमान आहे की, २०३० पर्यंत हीथ्रो विमानतळावर प्रवाश्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे त्याआधी येथे एक नवीन विमानतळ तयार करणे गरजेचे आहे.
हे विमानतळ हीथ्रोपासून थोड्या अंतरावर पण लंडनच्या विमानतळाचा एक भाग असेल. या विमानतळाला थेम्स नदीवर बांधण्याची योजना आहे. पूर्व लंडनमध्ये अशी जागा आहे, जिथे विमानतळ बनवले जाऊ शकते. सहा धावपट्टीवाले हे विमानतळ असेल, ज्याला लंडन ब्रिटानिया विमानतळ असे म्हटले जाईल.
या योजनेनुसार सात वर्षांमध्ये या विमानतळाला पूर्णपणे तयार केले जाईल आणि यासाठी जवळपास ५६०० अब्ज रुपये खर्च येईल. या प्रोजेक्ट्साठी आर्किटेक्ट नोर्मन फॉस्टर यांनी हा प्रस्ताव तयार केला होता, ज्याचे लंडनचे मेयर बोरिस जॉन्सन यांनी समर्थन केले होते. ब्रिटिश सरकार आणि उद्योजकांनी देखील फिलिंग विमानतळाचे समर्थन करत, त्याबद्दलच आनंद व्यक्त केला. हिथ्रो विमानतळ हे ९९ टक्क्यांच्या क्षमतेने काम करते आणि त्यासाठी धावपट्टीची कमतरता हे सर्वात मोठे आव्हान आहे.
हे विमानतळ तयार होऊन किती दिवसात वापरासाठी खुले होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.