क्रिकेटमधील हे ११ जबरदस्त रेकॉर्डस् तोडणं केवळ अशक्य मानलं जातं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारताकडून एका टी – २० सामन्यात सर्वात जास्त धावा देण्याचा रेकॉर्ड मध्यंतरी चहलने आपल्या नावे केला आहे. याआधी हा रेकॉर्ड जोगिंदर शर्माच्या नावावर होता.
पण मजेशीर गोष्ट हीदेखील आहे की, एका सामन्यामध्ये सर्वात जास्त विकेट काढण्याचा रेकॉर्ड देखील चहलकडेच आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या एका सामन्यामध्ये सहा गडी बाद केले होते.
एखाद्या फिरकीपटूने आंतरराष्ट्रीय टी – २० मध्ये ६ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट काढणाऱ्यांमध्ये फक्त जगातील दोनच फिरकीपटू आहेत आणि हे आतापर्यंत तीनदाच झाले आहे. त्यातील एक म्हणजे चहल आणि दुसरा म्हणजे श्रीलंकेचा अजंता मेंडिस. मेंडिसने हा पराक्रम दोनदा करून दाखवला आहे.
आज आपण क्रिकेट इतिहासातील काहीच अशाच रेकॉर्डविषयी जाणून घेऊयात, जे कदाचित कधीही कुणी मोडू शकणार नाहीत.
१. रोहित शर्माची एकदिवसीय सामन्यामधील द्विशतके
एकदिवसीय सामन्यांमध्ये २०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारे काही मोजकेच फलंदाज आहेत. पण भारताच्या रोहित शर्माने हा पराक्रम एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर तीनदा केला आहे.
त्यानेश्रीलंकेविरुद्ध खेळलेली २६४ धावांची इनिंग तर अफलातून होती. एकेकाळी ५० षटकांच्या सामन्यामध्ये फलंदाजाला १०० धावा करणे देखील कठीण होते, पण आता हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. कदाचित हा त्याचा रेकॉर्ड तोडणे कुणालाही शक्य होणार नाही.
२. ब्रायन लाराच्या कसोटीमधील ४०० धावा
ब्रायन लारा हा वेस्ट इंडिजचा एक महान खेळाडू आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात सर्वात जास्त धावा करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.
त्याने २००४ मध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात एक डावामध्ये ४०० धाव ठोकल्या होत्या. हा त्याचा रेकॉर्ड अजूनही कायम आहे आणि तो तोडणे खूपच कठीण आहे. यावेळी त्याने मॅथ्यू हेडनचा ३८० धावांचा विश्व रेकॉर्ड तोडला होता.
३. मुरलीधरनच्या विकेट्स
जगातील काही महान फिरकीपटूंचा विचार केला तर, श्रीलंकेच्या मुथैय्या मुरलीधरनचे नाव सर्वात अव्वल स्थानी येते. मुरलीधरनने आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये कितीतरी रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत.
मुरलीधरनने आपल्या कारकिर्दीमध्ये १३३ कसोटी सामन्यांमध्ये ८०० विकेट्स घेतले आहेत. ३५० एकदिवसीय सामन्यांमध्ये ५३४ विकेट्स घेतले आहेत. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये एकूण १३४७ विकेट्स घेतल्या आहेत. जे आजपर्यंतचे एखाद्या खेळाडूचे सर्वात जास्त विकेट्स आहेत. त्याचा हा विकेट्सचे रेकॉर्ड तोडणे खूपच कठीण आहे.
–
हे ही वाचा – एकेकाळी विश्वचषक गाजवणारा क्रिकेटर आज उपजीविकेसाठी सुद्धा करतोय संघर्ष!
४. जेसन गिलेस्पीचे नाईट वॉचमन म्हणून दुहेरी शतक
२००५ मध्ये बांग्लादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झालेल्या कसोटी सामन्यामध्ये जेसन गिलेस्पी हा ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नाईट वॉचमन म्हणून फलंदाजी करण्यासाठी आला होता. या सामन्यामध्ये त्याने दुहेरी शतक ठोकून सर्वांना आश्चर्यचकीत केले होते. त्याचा हा रेकॉर्ड आजही तसाच कायम आहे.
५. जिम लेकरच्या १९ विकेट्स…
इंग्लंडचा फिरकीपटू जिम लेकर याने १९५६ सालच्या ऍशेस मालिकेतील चौथ्या सामन्यात दुसऱ्या डावात १० च्या १० गडी बाद केले. गम्मत म्हणजे पहिल्या डावात सुद्धा जिम लेकर याने ९ गडी बाद केले होते. म्हणजेच एका कसोटी सामन्यात त्याने तब्बल १९ गडी बाद केले आहेत.
हा विक्रम मोडणं नक्कीच अशक्य आहे…!!!
अनिल कुंबळे याने सुद्धा आंतराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामन्यामधील एका इनिंगमध्ये सर्वच्या सर्व खेळाडू बाद करण्याचा विश्वविक्रम केला होता. हा पराक्रम त्याने भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या विरोधात करून दाखवला होता.
६. सर्वात जलद स्टॅम्पिंग
सर्वात जलद स्टॅम्पिंग करण्याचा रेकॉर्ड भारताच्या माजी कर्णधाराच्या म्हणजेच कॅप्टन कूल धोनीच्या नावावर आहे. त्याने एक स्टॅम्पिंग फक्त ०.०८ सेकंदामध्ये केली होती. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर विंडीजच्या किमो पॉलला त्याने यष्टिचित केले होते.
त्याने स्वतःचाच ०.०९ सेकंदाचा विक्रम यावेळी तोडला होता.
जी आपल्या पापण्या फडकावण्यापेक्षाही जलद आहे. आपल्याला पापण्या फडकवण्यासाठी ०.३ सेकंद लागतात. धोनीचा हा रेकॉर्ड कदाचित इतर कोणताही विकेटकिपर तोडू शकणार नाही. कारण धोनी एकमेवाद्वितीय आहे. त्याचा रेकॉर्ड तोच तोडू शकतो.
७. सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड
क्रिकेटचा देव म्हणून संबोधला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावे क्रिकेटचे कितीतरी रेकॉर्ड्स नोंदवलेले आहेत. सचिन सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यांनी एकूण ४६३ एकदिवसीय सामने खेळले आहेत.
सचिन यांची एकदिवसीय क्रिकेटची कारकीर्द देखील खूप मोठी होती. सचिन जवळपास २२ वर्ष ९१ दिवस एकदिवसीय क्रिकेट खेळले. त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८४२६ धावा, १५४ विकेट्स आणि १४० झेल देखील घेतले आहेत. जो एक वेगळाच रेकॉर्ड आहे. अजूनही काही रेकॉर्ड्स फक्त त्यांच्याच नावावर आहेत.
–
हे ही वाचा – बॉलर्ससाठी कठीण मानल्या जाणाऱ्या टेस्ट क्रिकेटमध्ये या फलंदाजांनी केलाय विक्रम!
८. सर डॉन ब्रॅडमन यांची सरासरी
सर डॉन ब्रॅडमन हे ऑस्ट्रेलियन खेळाडू कसोटी क्रिकेटच्या इतिहासातले सर्वश्रेष्ठ फलंदाज मानले जातात. त्यांच्या कारकिर्दीची सरासरी ९९.९४ आहे. जी आतापर्यंतच्या कोणत्याच खेळाडूची नाही. त्यांनी ९९.९४ च्या सरासरीने ५२ कसोटी सामन्यांमध्ये ६९९६ धावा केल्या होत्या. त्यांचा हा रेकॉर्ड देखील मोडणे कोणत्याही फलंदाजाला कदाचित शक्य होणार नाही.
९. युवराज सिंगच्या १२ चेंडूत ५० धावा
युवराज सिंगने २००७ च्या टी – २० विश्व चषकामधे १२ चेंडूंमध्ये आपली फिफ्टी पूर्ण केली होती. यामध्ये त्याने ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार ठोकले होते. त्याचा हा रेकॉर्ड देखील अजूनही कुणी तोडलेला नाही.
१०. एबी डिव्हिलर्सचे जलद शतक
दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू ए. बी. डिव्हिलर्स याने कोरी अँडरसनचा एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये ३६ चेंडूंमधील शतकाचा रेकॉर्ड तोडला आहे. एबीने फक्त ३१ चेंडूंमध्ये शतक ठोकले आहे आणि त्याचा हा रेकॉर्डदेखील अजून तसाच कायम आहे.
११. बेस्ट बॉलिंग फिगर
श्रीलंकेचा सुप्रसिद्ध गोलंदाज चामिंडा वाझ याने एकदिवसीय सामन्यामध्ये ८ गडी बाद करण्याची किमया केली आहे. २००१ साली झिम्बाब्वे विरुद्ध त्याने अवघ्या १९ धावा देऊन ८ गडी बाद केले होते. यावेळी त्याचा स्पेल ८-३-१९-८ असा अफलातून होता. वनडे सामन्यामध्ये ८ गडी बाद करणं ही सहजशक्य गोष्ट नाही.
त्यामुळे हा विक्रम मोडणं जवळपास अशक्य आहे.
–
हे ही वाचा – “सर्वाधिक चौकार”नुसार विजयी! : वाचा क्रिकेटमधील असेच इतर विचित्र नियम..!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.