' जाणून घ्या, पुरुषांचा बुद्ध्यांक खरंच स्त्रियांपेक्षा जास्त असतो का? – InMarathi

जाणून घ्या, पुरुषांचा बुद्ध्यांक खरंच स्त्रियांपेक्षा जास्त असतो का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजकाल स्त्रिया ह्या सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने काम करतात, हे आपल्या सर्वांना माहित आहेच. आपण खूप लोकांना स्त्री आणि पुरुषांमधील बौद्धिक फरकाविषयी बोलतना पाहत असतो.

खूप लोकांचे असे म्हणणे असते की, स्त्री आणि पुरुष फक्त शारीरिक क्षमतेच्या बाबतीतच नाही, तर बौद्धिक क्षमतेमध्ये देखील एकसमान आहेत असा त्यांचा युक्तिवाद असतो. काही लहान फरक असले, तरी ते त्याच्यावर ऐकून न घेता भांडायला सुरुवात करतात.

 

Men really more intelligent women.Inmarathi

हे ही वाचा – स्त्रियांच्या मते ‘पुरुषांचं सौंदर्य’ या “विशेष” गोष्टींमध्ये असतं! रहस्य जाणून घ्या…

स्त्री आणि पुरुष यांच्या समानतेविषयी कितपत बरोबर आहे याचा विचार करायला हवा, कारण प्रत्येकजण हा आपापल्या ठिकाणी योग्य आहे. शास्त्रज्ञांनी स्त्री – पुरुषांवर याविषयीच एक रिसर्च केला होता, ज्या रिसर्चमुळे देखील काही प्रमाणात वाद निर्माण झाले होते. आज आपण येथे फक्त काही निष्कर्ष जाणून घेणार आहोत, ज्याच्या आधारवर पुरुष आणि स्त्री यांच्या बुद्ध्यांकामधील फरक आपल्याला समजू शकतो.

शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की, पुरुषांचा बुद्ध्यांक (IQ ) हा स्त्रियांच्या बुद्ध्यांकापेक्षा चार गुणाने जास्त असतो,
कारण पुरुषांचा मेंदू हा सामान्यतः मोठा असतो. पण या बुद्ध्यांकाचा वापर करणे हे मुख्यतः प्रतिकात्मक तर्कांवर आधारित असते. त्यामुळे हा एक विवादास्पद विषय आहे आणि हे रोजच्या जीवनावर लागू होणे कठीण आहे.

 

Men really more intelligent women.Inmarathi1Men really more intelligent women.Inmarathi1

 

लहान वयात शाळेमध्ये जाण्याच्या आधीच्या काळामध्ये आपल्याला हे समजते की, मुलांना ब्लॉक – बिल्डींग आणि गाड्यांमध्ये जास्त रस असतो, तर मुलींना बाहुली, नाटक, कलाकृती आणि घरगुती कामे आवडतात. मुलांना नवनवीन खेळ खेळायला उत्तेजक असतात आणि त्यांना त्यामधील मज्जा घ्यायला आवडते, पण मुली ह्या मुलांपेक्षा संवेदनशील आणि कामोत्तेजक असतात.

मुलांचे ग्रुप हे खूप मोठे असतात आणि सर्व मुद्द्यांमध्ये ते लगेचच पुढे येतात. पण मुलींचे ग्रुप हे लहान असतात, त्यांचा दोन किंवा तीन मुलींचा ग्रुप असतो. त्या जास्त इतर मुलींनाही सामावून घेत नाहीत.

त्यांच्या भाषेमध्ये विशेषतः लक्षणीय फरक आढळतो. मुली ह्या मुलांपेक्षा लवकर बोलायला शिकतात. मुलींना मोठ्या प्रमाणात शब्दसंग्रह विकसित करता येतो. भाषेबद्दल बोलायचे झाले तर स्त्रियांचा मेंदू याबाबतीत पुरुषांपेक्षा जलद गतीने कार्य करतो. मुलांच्या बाबतीत तसे नसते.

 

Men really more intelligent women.Inmarathi2

 

प्राथमिक शाळांमध्ये मुलामुलींच्या वेगवेगळ्या चाचण्या घेतल्यास यातला फरक लगेचच स्पष्ट होईल. मुलं मुलींपेक्षा चांगल्याप्रकारे सायकलचे चित्र काढू शकतात. तसेच, मुली या मुलांपेक्षा चांगल्याप्रकारे बोलू शकतात. मुलं गणितामधील प्रश्न उत्तमरीत्या सोडवू शकतात. तर मुली या एखादी वस्तू लक्षात ठेवून योग्यप्रकारे ओळखू शकतात.

मुले ही खेळ आणि गणितामध्ये आपला आत्मविश्वास दाखवतात, तर मुली या संगीत आणि वाचन यामध्ये स्वतःचा आत्मविश्वास दाखवतात. मुले ही अनुभव आणि प्रयत्नांच्या कमतरतेमुळे अपयशी ठरतात, तर मुलींना अनेकदा त्यांच्या क्षमतेमुळे अपयशाला सामोरे जावे लागते.

 

Men really more intelligent women.Inmarathi3

 

मुली या मुलांपेक्षा भावनिक असतात. एका रिसर्चमध्ये सहा वर्षाच्या मुलामुलींना एका रडणाऱ्या मुलाचा आवाज ऐकवला आणि त्यानंतर त्यांना त्याबद्दल विचारले. तेव्हा मुलींनी त्या लहान मुलाबद्दल सहानुभूती व्यक्त केली, तर मुलांनी तो स्पीकर दोन वेळा बंद झाल्याचे निदर्शनास आणून दिले.

मुलांच्या बाबतीत- वियोग, विभक्तता, उदासीनता यांचा त्यांच्यावर तुलनेने कमी परिणाम झाला. अर्थात त्यांच्याकडे नुकसान किंवा दुःख स्वीकारण्याची क्षमता मुलींपेक्षा अधिक असते.

अजून एका रिसर्चमध्ये, त्यामध्ये असलेल्या व्यक्तींच्या बुद्धिमत्तेचा अंदाज लावण्यात आला. तेव्हा असे लक्षात आले की, पुरुषांचा सरासरी ब्रेन व्हॅल्यूम १.२ लिटर आहे, तर स्त्रियांचा सरासरी ब्रेन व्हॅल्यूम हा १ लिटर आहे आणि ती माणसे मोठा मेंदू असलेली होती, त्यामुळे त्यांचे बुद्ध्यांक गुण आपोआपच जास्त होते.

 

Men really more intelligent women.Inmarathi4

हे ही वाचा – चूक नेहेमी पुरुषाचीच? या ९ गोष्टीत स्त्रिया कमी पडल्या तर घरी कटकटी होणारच ना!

बुद्धिमत्ता अचूकपणे मोजता येत नाही आणि त्यामुळे या बाबतीत लिंगभेदांचे अस्तित्व सिद्ध करणे किंवा नाकारणे कठीण आहे. हे दृश्य अनेकदा सामान्यतः शिक्षण, पत्रकार किंवा राजकारणी हे कायम ठेवतात, जे वैचारिकदृष्ट्या या चाचणीस विरोध करतात. आपण कधीही कोणाचीही बुद्धी मोजू शकत नाही.

यावरून असे समजते की, कुणाचीही बुद्धिमत्ता ही तपासता येत नाही, प्रत्येकच्या बुद्धीमध्ये आपल्याला फरक हा दिसतोच. त्यामुळे स्त्री आणि पुरुषांच्या बुद्ध्यांकाविषयी काहीही बोलणे चुकीचे आहे. पण त्यांच्यात वर सांगितल्याप्रमाणे मानसशास्त्रीय दृष्ट्या काही फरक असतात हे मात्र खरे आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?