Site icon InMarathi

आहारात या गोष्टी खा आणि एक कार्यक्षम, लक्ष विचलित न होणारा मेंदू विकसित करा!

blueberry im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या मनुष्याला खूप धकाधकीच्या जीवनाचा सामना करावा लागतो. तणावाला त्याला रोजच सामोरे जावे लागते. हा तणाव बहुतेकदा कामामुळे निर्माण होतो. आपल्या रोजच्या जगण्यात आपला मेंदू हा सर्वात महत्त्वाचे कार्य बजावत असतो.

त्याच्या आधारावरच आपण कितीतरी कामे व्यवस्थित करू शकतो. पण कधी – कधी अशा समस्या निर्माण होतात, ज्यांच्यावर उपाय शोधणे आपल्या मेंदूलाच शक्य नसते, कारण त्यावेळी आपला मेंदू तेवढा कार्यक्षम नसतो.

त्यामुळे आपले लक्ष कामात लागत नाही आणि ते काम करणे आपल्याला खूप कठीण जाते. आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांविषयी सांगणार आहोत, जे नियमितपणे खाल्ल्याने तुमच्या मेंदूची कार्यक्षमता चांगल्याप्रकारे वाढू शकते.

कॅफेन आपल्याला अधिक अलर्ट बनवू शकते.

आपल्या बुद्ध्यांकाला (IQ ) प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्याला हुशार करण्यासाठी कोणत्याही जादूची आवश्यकता नाही, तर विशिष्ट घटक जसे कॅफेन आपल्याला उत्साही करू शकते आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करू शकते. कॉफी, चॉकलेट, एनर्जी ड्रिंक्स आणि काही औषधे यांमध्ये आपल्याला कॅफेन आढळते.

 

 

याचा प्रभाव जरी अल्पकालीन असला, तरी प्रभावशाली असतो. पण कॅफेनचे  अतिसेवन करणे धोकादायक असते. कॅफेनचे अतिसेवन केल्याने ते आपल्याला चिडखोर आणि अस्वस्थ करू शकते.

साखर तुमचा अलर्ट वाढवू शकते.

साखर हा मेंदूला कार्यक्षम बनवणारा सर्वात महत्त्वाचा इंधन स्रोत आहे. आपली साधारण साखर नाही, तर ग्लुकोज हा तुमच्यासाठी मेंदूसाठी महत्त्वाचा घटक आहे. जो तुमच्या शरीरामध्ये साखर आणि इतर पदार्थांमधून जातो.

 

 

एक ग्लास संत्र्याचा रस किंवा इतर फळांचा रस तुमची स्मृती, विचार आणि मानसिक क्षमता यांना अल्पकालीन वाढ देऊ शकते. पण याचे योग्य प्रमाणामध्ये सेवन करणे कधीही चांगले असते.

आपल्या मेंदूला चालना मिळवण्यासाठी नाश्ता करा.

अभ्यासकांनी असे सांगितले आहे की, नाश्ता केल्याने आपले अल्प काळासाठी स्मृती आणि लक्ष वाढण्यास मदत होते. जे विद्यार्थी चांगल्याप्रकारे नाश्ता करतात, ते नाश्ता न करणाऱ्या मुलांपेक्षा अभ्यासामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये चांगले प्रदर्शन करतात.

 

 

खाद्यपदार्थ हे तुमच्या मेंदूला चालना मिळवून देण्यासाठीचे सर्वात मोठे इंधन आहे. या नाश्तामध्ये फळे , दुग्धजन्य पदार्थ आणि इतर फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश असावा. पण जास्त खाऊ नये, कारण जास्त खाल्ल्याने त्यातील उच्च कॅलरी आपली एकाग्रता रोखू शकते, असे संशोधकांना आढळले आहे.

मासे हे खास मेंदूला चालना देणारे अन्न आहे.

मेंदूच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेले ओमेगा – ३ फॅटी ऍसिड हे उत्तम बुद्धीसाठी एक प्रोटीन स्रोत आहे. जे माशांपासून आपल्याला मिळते. त्यांच्या चरबीमध्ये मेंदूला विकसती करण्याची चांगली शक्ती असते.

 

 

आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मासे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्यामुळे आपली स्मरण शक्ती वाढण्यास देखीलमदत होते. आपला मेंदू आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून कमीतकमी दोनदा मासे खावे.

ब्लूबेरी ह्या खूप पौष्टिक असतात.

प्राण्यांमधील संशोधनामधून असे दिसून आले आहे की, ब्लूबेरीज या स्वतंत्र रॅडिकल्समुले होणाऱ्या नुकसानापासून मेंदूचे संरक्षण करण्यास मदत करू शकतात आणि अल्झायमर रोग किंवा स्मृती भ्रंश यासारख्या वय संबंधित स्तिथीचे परिणाम कमी करू शकतात.

 

 

रिसर्चवरून हे देखील दिसून आले आहे की, ब्लूबेरीच्या समृद्ध आहारामुळे मेंदूची कार्यपद्धती चांगल्याप्रकारे चालवता येऊ शकते.

===

===

दैनंदिन आहारामध्ये नट्स आणि चॉकलेटचा समावेश करा

नट्स आणि चॉकलेट हे अँटिऑक्सिडेंट व्हिटॅमिनचे चांगले स्रोत आहेत. जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते आणि वाढत वयामध्ये बुद्धीला चालना देण्यासाठी उपयोगी ठरू शकते.

 

 

डार्क चॉकलेटमध्ये  देखील शक्तिशाली अँटी ऑक्सिडंटचे गुणधर्म असतात आणि त्यामध्ये कॅफिनसारख्या नैसर्गिक उत्तेजक पदार्थांचा समावेश असतो. जो तुमचा फोकस वाढू शकतो. या फायद्यांचा लाभ घेण्यासाठी नट्स आणि डार्क चॉकलेट दररोज एक घ्या.

या सर्व उपायांचा आणि खाद्यपदार्थांचा ताळमेळ तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये ठेवलात, तर तुम्ही नक्कीच तुमच्या मेंदूचा चांगल्याप्रकारे विकास घडून आणू शकता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version