' मुस्लिमांना ‘यवन’ हे नाव पडण्यामागची रोचक कथा जाणून घ्या… – InMarathi

मुस्लिमांना ‘यवन’ हे नाव पडण्यामागची रोचक कथा जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

भारतातून सोन्याचा धूर येत असे आपण बऱ्याचदा ऐकले असेल, म्हणूनच आपल्या देशाला सोने की चिडिया ही नाव पडलं! आणि या चिमणी वर अनेक आक्रमणकर्त्यांनी राज्य करायचा प्रयत्न केला, पण आपण आपलं अस्तित्व अबाधित राखून या लोकांचे मनसुबे धुळीला मिळवले!

भारताचा मध्ययुगीन इतिहास हा परकीय आक्रमणाचा आणि भारताच्या अनन्यसाधारण स्थित्यंतराचा काळ होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अनेक परकीय सत्तांची झालेली आक्रमणे, त्यातून झालेले सांस्कृतिक अभिसरण हे सर्व आपले सामाजिक संचित आहे.

 

india golden bird inmarathi

 

याच अभिसरणातून अनेक नव्या संकल्पना, संज्ञांनी जन्म घेतला. मुघल, खिलजी, अब्दाली अशा मुस्लिम राजवटींनी भारतावर राज्य केले आणि ते आपली छाप भारतावर सोडून गेले.

या काळाच्या लिखित इतिहासात बहुतेक सर्व ठिकाणी तत्कालीन मुस्लीम आक्रमकांना संबोधताना ‘यवन’ किंवा ‘म्लेंच्छ’ हे शब्द वापरले गेले आहेत. या शब्दांचा वापर नेमका कसा सुरु झाला ते आपण जाणून घेणार आहोत.

Muslims called Yavanas or Mlechhas.Inmarathi

 

अलेक्झांडरने जेव्हा भारतावर हल्ला केला, तेव्हा भारतातील लोक बाहेरच्या लोकांशी खूप मोठ्या प्रमाणावर संपर्कात आले. हे लोक हिंदू धर्माच्या बाहेरील लोक असल्याने या लोकांना नाव देणे कठीण होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

ते ग्रीसवरून आले असल्याने पर्शियन लोकांनाही त्यांना ‘युनान’ असे संबोधले. तेव्हा भारतीयांनी त्याला यवन असे बदलले आणि त्यामुळे परदेशी लोकाना उद्देशून वापरलेले पहिले संबोधन यवन हे होते.

 

alexander inmarathi

हे नाव त्याकाळी अपमानकारक नव्हते, कारण चंद्रगुप्त मौर्य यांनी यवन राजकुमारीशी लग्न केले होते.

भारतीय ज्योतिषशास्त्राच्या काही गोष्टी ग्रीक यज्ञांकडून शिकवल्या गेल्या. अशाप्रकारे बारा राशींची पद्धत किंवा स्वर्गीय घरे ग्रीक भाषेमधून आल्या. त्याआधी भारतीय ज्योतिषशास्त्रात फक्त २७ नक्षत्रांचीच ओळख पटलेली होती.

त्याचप्रमाणे आठवड्याचे सात दिवस ही कल्पना ग्रीक लोकांनीच भारतामध्ये आणली होती. आठवड्यांच्या दिवसांची मोजणी आणि राशी याबद्दल ग्रीक येण्यापूर्वीचे काहीही पुरावे प्राचीन लिखाणामध्ये मिळत नाहीत.

वाल्मिकी आणि व्यास हे देखील राशींबद्दल आणि दिवसांबद्दल सांगू शकले नव्हते की, श्रीकृष्ण आणि रामाचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता. तेही हे सांगण्यास अयशस्वी ठरले होते. अगदी तुलसीदास देखील याबद्दल काही स्पष्ट करू शकले नव्हते.

 

Muslims called Yavanas or Mlechhas.Inmarathi1

 

‘यवन जातक’ आणि ‘वृद्धा यवन जातक’ यांसारख्या फलज्योतिष शास्त्रावरील ग्रंथ अगदी मूळ स्त्रोतातून घेतलेले आहेत. मुस्लिम भारतामध्ये येण्यापूर्वी भारतावर आक्रमण करणारा प्रत्येक विजेता हा हिंदू धर्मामध्ये विलीन झाला होता आणि त्यांनी यवन राहणे थांबवले होते.

म्लेंच्छ हा शब्द देखील परदेशी लोकांसाठी वापरण्यात आला होता, परंतु सुरुवातीपासूनच याचा अपमानजनक अर्थ रूढ झाला होता. हे त्या परदेशी लोकांना संबोधित करते, ज्यांनी हिंदू लोकांच्या धार्मिक श्रद्धांवर आक्रमण केले.

 

muslim invaders inmarathi

मुस्लिम लोक भारतात येण्याच्या अगोदर देखील म्लेंच्छ हा शब्द वापरण्यात येत असे. जेव्हा महाकाव्ये आणि पूर्ण ग्रंथ लिहिली गेली, तेव्हा गंगा आणि यमुनेचे खोरे हा हिंदू धर्माचा केंद्रबिंदू बनला होता. त्यामुळे उत्तर – पश्चिम भारतातील सात नद्यांमुळे सप्त सिंधू भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भूमीने स्वतःचे महत्त्व गमावले होते.

म्हणून जी माणसे या भागांमध्ये राहत होती, त्या भागातील लोकांना म्लेंच्छ असे म्हटले जात असे. हे महाभारतामध्ये खूप ठिकाणी सांगितले गेलेले आहे.

पुराणांमध्ये या शब्दाचा उपयोग त्या सर्व लोकांसाठी केलेला आहे, ज्यांना हिंदू धार्मिक प्रथांबद्दल फारसा आदर नाही.

त्यानंतर म्लेंच्छ हा शब्द मुस्लिम लोकांसाठी वापरला जात होता, कारण त्यांनी हिंदू धर्माकडे दुर्लक्ष केले आणि हिंदू संस्कृतीची प्रत्येक गोष्ट निषिद्ध केली.

 

mughals in india inmarathi

 

हिंदूंना इस्लामबद्दल फारसे काही माहित नसल्यामुळे त्यांनी हा शब्द पूर्वीच्या ग्रंथांमधून बाहेर काढला आणि त्याचा वापर मुस्लमान लोकांसाठी केला. हा शब्द अगदी युरोपीय लोकांसाठी आणि काही ब्रिटिशांसाठी देखील वापरण्यात आला होता.

त्यानंतर पुढे “तुरुश्क” हा शब्द मुस्लिम आक्रमणकर्त्यांसाठी बनवला गेला, कारण ते स्वतःला तुर्क म्हणत असत.

जोन राज आणि श्रीवार यांनी राजतरंगिणी सारख्या संस्कृत ग्रंथांमध्ये हा शब्द मुस्लिम लोकांसाठी वापरण्यात आल्याचे सांगितले आहे. तसेच, त्यांच्या स्थानिक देवदेवतांना “तुरुश्क भैरव” असे लोक म्हणत असत.

म्लेंच्छ आणि यवन हे दोन्ही शब्द भारतात मुस्लीम आक्रमणाच्या आधीपासून आहेत असे म्हणावे लागेल. बाहेरून  आलेल्या आक्रमकांना उद्देशून हे शब्द वापरले आहेत.

पण त्याचा उगम मुस्लीम भातात आल्यानंतर झालेला नाही, तर तो पूर्वीचाच आहे. पण त्या काळात झालेली सर्व परकीय आक्रमणे मुस्लीम सत्तांची असल्यामुळे हे शब्द मुस्लिमांना उद्देशून वापरले गेले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?