' दैनंदिन जीवनातील टेन्शनला दूर करण्यासाठी हे सोपे उपाय तुम्हाला मदत करतील – InMarathi

दैनंदिन जीवनातील टेन्शनला दूर करण्यासाठी हे सोपे उपाय तुम्हाला मदत करतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या सर्वांचेच सध्याचे जीवन खूप धकाधकीचे आहे. नेहमी आपण तणावातून जात असतो आणि त्याच्यातून बाहेर पडणे आपल्याला शक्य नसते.

नेहमी आपल्याला जीवनामध्ये एका मागून एक समस्या येतच असतात आणि त्यांना आपल्याला मोठ्या धैर्याने सामोरे जावे लागते. पण कधी – कधी अशी परिस्थिती निर्माण होते, जिथे आपण खचून जातो आणि परत तेथून परतण्याचा रस्ता आपल्याला काही केल्या सापडत नाही.

पण हाच तो काळ असतो, जो आपले भवितव्य ठरवतो.

 

Stress free life Tips.inmarathi8
huffingtonpost.com

 

दैनंदिन तणाव हा घटक आपल्या जीवनावर प्रतिकूल परिणाम करतो, पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मानसिक आजार आहे.

तणाव हा तुमच्या कामाच्या प्रक्रियेतून आलेला नैसर्गिक घटक आहे. तणावग्रस्त जीवन जगणे हे आपल्या कार्यक्षमतेस अडथळा निर्माण करते आणि आनंदी जीवन जगण्याची आपली क्षमता कमी करते.

तणावामुळे आपण खूप वेळा आजरी पडतो आणि त्यामुळे आपण चिडचिडे होऊ शकतो. आपल्या व्यस्त शेड्युलमुळे आणि अनेक जबाबदाऱ्यांनी ही स्थिती निर्माण होत असते.

त्यामुळे या तणावपूर्ण परिस्थितीला कमी करण्यासाठीचे मार्ग जाणून घेणे खूप गरजेचे आहे. जे तुमचा रोजचा ताण कमी करू शकते.

आज आपण काही असे मार्ग जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला तणावमुक्त जीवन जगण्यास मदत करते.

१. नियमांचे अनुसरण करा

नियमांचे पालन करणे हा गुण नेहमी तुम्हाला जीवनात योग्य मार्ग प्रदान करतो. जर तुम्ही तुमचे रोजचे रुटीन नियमबद्ध पद्धतीने तयार केले असेल, तर तुम्हाला तुमचा दिवस पूर्णपणे वापरण्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागत नाही.

 

rules inmarathi

यामुळे तुम्ही तुमचे कोणतेही काम अगदी वेळेवर करण्यास सक्षम व्हाल आणि तुम्हाला इतर मनोरंजनाचे उपक्रम, छंद आणि खेळ खेळण्यास योग्य तो वेळ मिळेल. यामुळे तुम्ही आपोआपच तणावमुक्त व्हाल.

२. लवकर उठावे

 

Stress free life Tips.inmarathi
approachyouractions.com

 

नेहमी सकाळी लवकर उठावे. लवकर झोपी जाणे आणि लवकर उठणे, हे मनुष्याला निरोगी, श्रीमंत आणि ज्ञानी बनवण्यास मदत करते.

यासाठी दैनंदिन नित्यक्रमाचे अनुसरण करा आणि रात्री झोपण्यासाठी व सकाळी लवकर उठण्यासाठी वेळ नक्की करा आणि तिचे पालन करा.

लवकर उठणे हे आपल्या शरीराला फक्त निरोगीच ठेवत नाहीतर हे मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

३. स्वतःसाठी एक यादी तयार करा

आपल्याला आनंदी आणि आशावादी बनवणाऱ्या गोष्टीची एक सूची तयार करा.

हे तंत्र सकारात्मक पद्धतीने आपला तणाव कमी करण्यासाठी मदत करेल. तसेच, एका दिवसात आपण करणाऱ्या कामाची किंवा आवश्यक कार्याची एक यादी तयार बनवा.

 

Stress-free-life-Tips.inmarathi1.
rookiemoms.com

 

आपल्या सर्व कार्यांची आणि इतर गोष्टींची एक यादी तयार करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला कोणतेही काम करण्याचा विसर पडणार नाही. तसेच, तुम्ही त्या गोष्टीला चांगल्याप्रकारे करू शकता आणि कामाचा तणाव देखील त्याच्यावर पडणार नाही.

४. आव्हाने स्वीकारा आणि त्यांना तोंड द्या 

 

Stress free life Tips.inmarathi2
churchleaders.com

 

आपण स्वतः एखाद्या वाईट परिस्थितीत सापडल्यास किंवा आपण घेतलेले काही निर्णय चुकीचे ठरल्यास येणाऱ्या संकटांना घाबरून न जाता, त्यांना सामोरे जा.

तसेच, या येणाऱ्या आव्हानांना स्वीकारा आणि त्यांच्यामधून योग्य तो मार्ग काढा. असे केल्यास आपण त्या संकटाच्या दबावाखाली न येता, त्यांचा योग्यप्रकारे सामना करू शकतो. तसेच, ही गोष्ट तुम्हाला भविष्यामध्ये मोठ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी मदत करेल.

५. स्वतः कडे लक्ष द्या 

स्वतःची योग्य ती काळजी घेण्यास कधीही विसरू नका. जेव्हा आपण तणावग्रस्त वातावरणात असतो, तेव्हा आपण स्वतःबद्दल विचार न करता त्या तणावामुळे चिंताग्रस्त होतो. आपण स्वतःच्या शरीराला अस्वस्थ करून घेतो आणि जेवण किंवा पुरेशी विश्रांती आपल्या शरीराला देण्यास अपुरे पडतो.

 

alia bhatt camera inmarathi

 

स्वतः कडे त्यामुळे खूप दुर्लक्ष होते आणि आपली तब्येत खालावते. त्यामुळे  कधीही स्वतःकडे लक्ष द्यायला विसरू नका.

६. पुरेशी विश्रांती घ्या 

 

Stress-free-life-Tips.inmarathi4.
financebuddha.com

 

जर तणावग्रस्त वाटत असेल, तर आपल्या मनाला आणि शरीराला आराम द्या. एक दीर्घ श्वास घेऊन शांत निपचित थोडावेळ पडा, ज्याच्यामुळे तुमचा तणाव थोडा कमी होण्यासाठी वेळ मिळू शकतो.

सातत्याने काम केल्याने तुमचा तणाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कधीही सारखे काम करत राहू नका आणि काही वेळाने थोडा आराम करा. नुसते काम करत बसल्यास तुमचा तणाव वाढत जाऊन तुमच्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

७. चिंतन – मनन करा.

ध्यान करणे हा उपाय तुमचा तणाव कमी करण्यासाठी आणि नाकारातमक विचार तुमच्यापासून दूर करण्यासाठी एक उत्कृष्ट पद्धत आहे. ध्यान केल्याने तुमच्या मनामध्ये असलेल्या नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतात.

jaqueline-yoga-inmarathi
pinterest.co.uk

 

जेव्हा तुमहाला जास्त काम करावे लागते, तेव्हा त्याचे तुम्हाला ओझे वाटू लागते किंवा काम केल्यामुळे तुम्हाला थकल्यासारखे देखील वाटू लागते, या सर्वांमुळे तुमची लहानसहान गोष्टींवरून देखील चिडचिड सुरु होते. याचा वाईट परिणाम तुमच्यावर आणि त्याचबरोबर तुमच्या कुटुंबावर देखील होतो.

तुमच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी रोज कमीत कमी २० मिनिटे ध्यान करणे कधीही चांगले असते. रोज ध्यान केल्याने तुमचा तणाव खूप प्रमाणात कमी होतो.

८. लक्ष केंद्रित करा.

 

Stress free life Tips.inmarathi6
durangohome.co

 

लक्ष केंद्रित करणे आणि केंद्रित राहणे, हे आपल्या जीवनाचे बोधवाक्य असावे. जेव्हा आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा आपण अधिक कार्यक्षमतेने आणि कार्यक्षम पद्धतीने ते पूर्ण करू शकतो.

आपण करत असलेल्या प्रत्येक कार्यावर नेहमी लक्ष केंद्रित करा आणि आपल्याकडून त्या कामासाठी जमेल तेवढे सर्वकाही करा. असे केल्याने तुम्ही तुमचे ध्येय नक्कीच साध्य करू शकता.

या सर्व उपायांना योग्य पद्धतीने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एकरूप केले, तर नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये योग्य तो बदल दिसेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?