घराघरांत मधमाशांची पोळी लावून ही कंपनी कमावतीये पैसा, जोडीला पर्यावरण रक्षणपण!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
आपण दिवसेंदिवस जेवढी प्रगती करत आहोत, तेवढेच निसर्गापासून दूर दूर जात आहोत. आपण पर्यावरणाचा, आपल्या निसर्गाचा, त्यात वास्तव्य असलेल्या इतर जीवांचा विचार न करता, आपले ध्येय साध्य करण्याच्या पाठी लागलो आहोत.
यामुळे अश्या अनेक प्राणी-पक्षांच्या, कीटकांच्या जाती होत्या ज्या कधी काळी ह्या पृथ्वीतलावर होत्या पण मानवाच्या विकासाच्या मार्गात आल्याने त्यांचा ऱ्हास झाला आणि त्याचं ह्या पृथ्वीवरील अस्तित्वच नाहीसं झालं.
पण अजूनही कदाचित आपल्याला जाग आलेली नाही. कारण आजही अनेक जीवांच्या प्रजाती ह्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पण आपण आजही केवळ स्वतःचाच विचार करून पुढे जातो आहोत.
पण आजही जगात असेही काही लोक आहेत ज्यांना पर्यावरणाची काळजी आहे. आपल्या निसर्गाचा ऱ्हास होण्यापासून वाचविण्यासाठी ते जमेल तेवढ करतात .
सध्या हनी बी म्हणजेच मधमाशी ह्यांच्या लोकसंख्येत उल्लेखनीय घट होत चालली आहे. भलेही आधुनिक औद्यागिक शेती पद्धतीमुळे ते आणखी काही काळ आपल्याला दिसतील. पण तरी मधमाश्यांचं मुळ वास्तव्य हे नष्ट होत चाललं आहे. ज्यासाठी त्यांना ओळखलं जातं ते म्हणजे मधमाश्यांचं पोळं, हेच त्याचं खरं वास्तव्य आहे.
या सर्वांवर उपाय म्हणून BEEcosystem ह्या कंपनीने एक अनोखी शक्कल लढविली आहे.
त्यांनी एक सिस्टीम बनविली आहे, ज्यात एका षटकोनी चेंबरमध्ये मधमाश्यांना वाढवल्या जाऊ शकते. ही सिस्टीम तुम्ही तुमच्या घरात देखील लावू शकता. ह्या संकल्पनेमुळे मधमाश्या शहरी माणसांच्या जवळ येतील. ह्यामुळे कदाचित मधमाश्यांच्या लोकसंख्येत वाढ होणार नाही पण त्या आपल्या पर्यावरणासाठी किती महत्वाच्या आहेत हे आपल्याला कळणार आहे.
ह्या सिस्टिमला सुरक्षितेचा पूर्ण विचार करून बनविण्यात आले आहे. जेणेकरून मधमाश्या पाळणारे कुठल्याही धोक्याशिवाय व्यवस्थितपणे त्यांचा सांभाळ करू शकतील.
ह्या सिस्टीममुळे तुम्ही मधमाश्यांना त्यांचे काम करताना बघू शकणार आहात. ते कश्याप्रकारे मध बनवितात हे सर्व तुम्हाला बघायला मिळेल. जर खायची इच्छा झाली तर तुम्ही ते मध हार्वेस्ट देखील करू शकता.
ही कंपनी लोकांच्या घरी मधमाश्यांचे पोळे लावून पैसाही कमावते आहे आणि पर्यवारणाची देखभालही होते आहे.निसर्गाला जपत पैसा कमावता येऊ शकतो, आणि त्याचेच हे उत्तम उदाहरण आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.