आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
मुंबईची राणीची बाग म्हणजेच जिजामाता उद्यान आपल्या सगळ्यांना माहीतच असेल.
लहानपणी आपल्यातील बहुतेकांना या राणीच्या बागेमध्ये जायला, तेथील प्राणी पाहण्यास आणि तिथे रमण्यास खूप आवडत असेल.
आज लहान मुलांना राणीची बाग फिरायला आणि तेथील वेगेवगेळे प्राणी – पक्षी पाहायला आवडतात. त्यात काही महिन्यांपूर्वी अजून एका पक्षाची भरती झाली आहे.
काही काळातच हे पेंग्विग या राणीच्या बागेचे खास आकर्षण बनून गेले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व येथे खास हे पेंग्विन पाहण्यासाठी येऊ लागले.
पण या पेंग्विनवरून काही वाद निर्माण झालेले होते.
महापालिकेने या पेंग्विगसाठी खूप पैसे देखील खर्च केले. पण काही पेंग्विनला या वातावरणाशी जुळवून घेता आले नाही आणि ते मृत्युमुखी पडले.
असो, पण काही प्रमाणात हा महापालिकेचा प्रकल्प यशस्वी झाला आणि राणीच्या बागेकडे परत एकदा पावले वळू लागली.
पेंग्विग हा खासकरून थंड प्रदेशात राहणारा जीव आहे. याचे वास्तव्य पाण्याजवळ आढळते, तसेच हा पक्षी फक्त दक्षिण गोलार्धात आढळतो.
लहान मुलांना पेंग्विग हा पक्षी खूप प्रिय असतो, कारण तो इतर पक्षांपेक्षा खूप वेगळा आहे. आज आपण लहान मुलांच्या लाडक्या पेंग्विगबद्दल काही तथ्य जाणून घेणार आहोत.
१. पेंग्विनला इतर पक्ष्यांप्रमाणेच पिसे असतात.
पेंग्विनला इतर पक्षांप्रमाणेच पिसे असतात, पण ही पिसे थोडी वेगळी असतात. कारण पेंग्विन हे आपल्या जीवनातील जास्तीत जास्त वेळ पाण्याखाली घालवतात.
पेंग्विनची पिसे वॉटरप्रूफ असतात. पेंग्विनमध्ये विशेष तेल ग्रंथी असतात. ज्याला प्रेन ग्रंथी म्हटले जाते. जे त्याच्या पिसांना वाटरफ्रुफिंग करण्यास मदत करते.
त्यांची ही तेलमय पिसे थंड पाण्यात उबदार ठेवण्यास त्यांना मदत करतात, त्यांना पोहताना सूर मारण्यासाठी मदत करतात.
इतर पक्षांसारखीच पेंग्विनची पिसे झडतात आणि त्या जागी दुसरी पिसे येतात. पण पेंग्विनची पिसे ही वर्षातील वेगवगेळ्या वेळी झडतात.
पण संपूर्ण वर्षभरामध्ये वेगवेगळ्या वेळी पिसे गमावण्याऐवजी तो एकदाच सर्व पिसे गमावू शकतो. याला कॅस्ट्रॉफिक मोल्ट असे म्हटले जाते.
२. पेंग्विनला इतर पक्षांप्रमाणेच पंख असतात.
इतर पक्षांना जसे पंख असतात, त्याचप्रमाणे पेंग्विनला देखील पंख असतात. पण तरीही ते पंख इतर पक्षांच्या पंखांसारखे नसतात.
पेंग्विनचे पंख हे उडण्यासाठी बनलेले नसतात. खरेतर, पेंग्विनला उडताच येत नाही. त्यांचे पंख सपाट असतात आणि ते पक्षांच्या पंखांप्रमाणे नाही, तर डॉल्फिनसारखे दिसतात आणि कार्य करतात.
उत्क्रांतिवादी जीवशास्त्रज्ञ म्हणतात की,
पेंग्विन हे भूतकाळात उडत होते, पण कितीतरी लाखो वर्षांपूर्वी त्यांना हे साध्य होत असे. कालांतराने त्यांचा हा गुणधर्म लोप पावला आणि ते कुशल जलतरणपटू बनले.
या पंखांचा उपयोग ते पाण्यामध्ये सूर मारण्यासाठी आणि उत्तमरीत्या पोहण्यासाठी करतात.
३. पेंग्विन हे कुशल आणि जलद जलतरणपटू असतात.
पेंग्विनला जगातील सर्वात कुशल जलतरणपटू समजले जाते. पेंग्विन हे ताशी ४ ते ७ मैल या वेगाने पाण्यामध्ये पोहतात. पण झिपी गेंटो पेंग्विन हा २२ मैल प्रति तास वेगाने पाण्यामध्ये हालचाल करतो.
पेंग्विन हा शेकडो मीटर खोल पाण्यामध्ये सूर मारू शकतो आणि पाण्याच्या आतमध्ये जवळपास २० मिनिटे राहू शकतो. तसेच, पेंग्विन पोर्पोइससारखा पाण्यामधून जमिनीवर झेप घेऊ शकतो.
पक्ष्यांची पोकळ हाडे असतात, म्हणून ते हवेमध्ये स्वछंद्पणे उडू शकतात. पण पेंग्विनची हाडे दाट आणि जड असतात.
ज्याप्रमाणे स्कुबा ड्रायव्हर्स त्यांची प्रबोधन शक्ती कंट्रोल करण्यासाठी जसे वजनाचा वापर करतात. त्याचप्रमाणे पेंग्विनला त्यांचा जडपणा पाण्यामध्ये सूर मारण्यासाठी आणि उत्तम पोहण्यासाठी मदत करतो.
–
- भारतातील एक गाव जेथे दरवर्षी पक्षी करतात आत्महत्या!
- एखाद्या प्राण्याची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे हे कसे ठरवले जाते? जाणून घ्या
–
४. पेंग्विन हे फक्त दक्षिण गोलार्धामध्ये राहतात.
जर तुम्हाला पेंग्विन पाहायचे असतील तर तुम्ही अलास्कामध्ये प्रवास करायला जाऊ नका. आपल्या पृथ्वीवर पेंग्विनच्या १९ वर्णित प्रजाती आहेत.
यांच्यातील एक प्रजाती विषुववृत्ताच्या खालच्या भागामध्ये राहते. लोकांमध्ये सर्वसामान्य गैरसमज आहे की, पेंग्विन अंटार्क्टिकाच्या आइसबर्गमध्ये राहतात. पण हे खरे नाही.
एकतर पेंग्विन हे दक्षिण गोलार्धाच्या प्रत्येक खंडामध्ये राहतात, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. जिथे त्यांना मोठ्या भक्षकांपासून धोका नाही, अशा ठिकाणी पेंग्विन राहतात.
पेंग्विनची जीपॅगस पेंग्विन ही एकमेव प्रजाती आहे, जी विषुववृत्ताच्या उत्तर प्रदेशामध्ये जीपॅगस बेटावर राहणारी प्रजाती आहे.
५. हवामानातील बदल पेंग्विनच्या जगण्यावर परिणाम करू शकतात.
शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला आहे की, जगभरातील पेंग्विनच्या प्रजाती वातावरणातील बदलामुळे धोक्यात आलेल्या आहेत आणि त्यातील काही प्रजाती लवकरच संपू शकतात.
पेंग्विन हे अन्न स्रोतांवर अवलंबून असतात, जे अन्न स्रोत येथील वातावरणावर अवलंबून असतात. जर वातावरण बदलले, तर पेंग्विनचे अन्न स्रोत संपुष्टात येऊ शकतात. त्यामुळे सारखे बदलणारे वातावरण पेंग्विनची संख्या कमी करू शकतात.
इंटरनॅशनल युनियन फॉर कंझर्व्हेशन ऑफ नेचरच्या रेड लिस्टनुसार, पेंग्विनच्या पाच प्रजातींचे आधीच नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजाती म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे.
तसेच, इतर उरलेल्या पेंग्विनच्या प्रजाती देखील संवेदनशील किंवा धोकादायक पातळीवर आहेत.
आफ्रिकन पेंग्विन (स्पिन्सिस्क डिमर्सस) ही पेंग्विनची प्रजाती सर्वात जास्त धोक्यामध्ये आहे आणि ती यामुळे लवकरच संपुष्टात येऊ शकते.
ही आहेत, मुलांना आणि मोठ्या माणसांना आवडणाऱ्या त्यांच्या लाडक्या पेंग्विनबद्दलची काही तथ्ये.
–
- नामशेष होत असलेल्या पक्ष्यामुळे वाचलं ब्राझीलचं जंगल!
- जगातील सर्वात महागड्या कुत्र्यांच्या प्रजातींच्या या किमती पाहूनच डोळे विस्फारतात
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.