Site icon InMarathi

भारतात PNB घोटाळा रोजचाच! दर चार तासाला एक बँक कर्मचारी देशाला लुबाडतो!

Rise-in-corruption-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारताच्या बँकिंग इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा समजला जाणारा पीएनबीचा घोटाळा झाल्यापासून रोज नवनवीन आश्चर्यकारक बाबी समोर येत आहेत. सध्या तर ह्या प्रकरणातील मुख्य आरोपी अब्जाधीश हिरा व्यापारी निरव मोदी आणि मेहुल चौकसी हे पंजाब नॅशनल बँकेला तब्बल ११ हजार ४०० कोटींचा चुना लावून विदेश दौऱ्यावर निघून गेलेत.

पण ह्या घोटाळ्यात त्यांची मदत करणारे पीएनबीचे कर्मचारी ह्यातून सुटू शकलेले नाही. या घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने गोकुल शेट्टी आणि मनोज खरात ह्यांना अटक केली आहे. आणि ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या घोटाळ्यात बँकेचे एकूण ६ जण सहभागी होते. पण हे काही एकमेव असे प्रकरण नाही, ज्यात बँकेच्याच अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे.

हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या देशात प्रत्येक चार तासाला एक बँक कर्मचारी घोटाळा करतो.

 

टाईम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीनुसार रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने १ जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०१७ पर्यंतचा एक आकडा जाहीर केला आहे. हा आकडा रिझर्व्ह बँकेने स्वतः जाहीर केला आहे. ज्यानुसार आपल्या देशात दर चार तासाला एक भ्रष्टाचारी बँक अधिकारी पकडला जातो. म्हणजेच दर चार तासाला एक बँक घोटाळा घडतो.

आरबीआयनुसार १ जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०१७ पर्यंत सरकारी बँकांचे ५२०० अधिकाऱ्यांविरोधात अश्या प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. ह्यापैकी काही अधिकाऱ्यांच्या विरोधात तपास सुरु आहे. काही अधिकाऱ्यांवर दंड ठोठावण्यात आला आहे तर काहींना त्यांच्या नोकरीवरून काढण्यात आले आहे.

आता आरबीआय एप्रिल २०१७ ते आतापर्यंतचे आकडे तयार करत आहे. नक्कीच ह्यामध्ये सर्वात मोठा घोटाळा हा पीएनबी च्या कर्मचाऱ्यांचा असणार आहे. तरी ह्यामुळे आणखी किती भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ह्या वर्षांत घोटाळे केले ते समोर येणार आहे.

 

 

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही भारताची सर्वात मोठी बँक आहे, म्हणूनच की काय ह्या बँकेत भ्रष्ट अधिकाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ५२०० भ्रष्ट अधिकाऱ्यांपैकी १५३८ अधिकारी हे एसबीआय चे आहेत. तर ज्या बँकेत आजवरचा सर्वात मोठा बँकिंग घोटाळा मानला जाणारा घोटाळा घडलाय त्या बँकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची संख्या सर्वात कमी आहे.

म्हणजेच आपल्या देशात ह्या घोटाळेबाज अधिकाऱ्यांची काहीही कमी नाही. गोकुल शेट्टी आणि मनोज खरात ह्यांच्यासारखे अनेक असे बँक अधिकारी आहेत ज्यांच्यासाठी घोटाळे करणे हे त्यांच्या कामाचाच एक भाग बनला आहे. आणि असंही नाही की ह्या घोटाळ्यांत खालच्या पातळीवरचेच कर्मचारी असतात.

ह्यात सर्वात मोठा वाटा टॉप लेवलच्या बड्या अधिकाऱ्यांचा असतो. कारण त्यांच्या संमती शिवाय हे शक्यच नाही.

 

indiablooms.com

शेट्टी ह्याने सांगितले की या घोटाळ्यात आणखी काही बड्या अधिकाऱ्यांचा देखील हात आहे. त्यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर ह्या प्रकरणात बँकेच्या एकूण ६ कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. हे सहा कर्मचारी निरव मोदी ह्यांना मदत करायचे.

सर्वांचाच ह्या घोटाळ्यात हिस्सा होता. निरव मोदी आणि मेहुल चौकसी ह्यांच्याकडून मिळणारा पैसा सर्वांमध्ये वाटला जायचा. आता ह्या दोघांच नाव समोर आलं म्हणून आपण ह्यांना आरोपी समजतो. पण खरे आरोपी तर अजूनही समोर आलेले नाहीत.

आता सीबीआय आणि ईडी ह्या घोटाळ्याचा तपास करत आहेत. ह्या दोन अधिकाऱ्यांनी ११,३४५ कोटींचा घोटाळा केला आहे, तर मग त्या ५२०० भ्रष्टाचाऱ्यांनी कितीचा घोटाळा केला असेल? ह्याचा तर विचारही आला की डोक सुन्न होऊन जातं. मग जेव्हा ह्याचा खरा आकडा समोर येईल तेव्हा काय होईल?

आधी मुघलांनी, मग इंग्रजांनी आपल्या देशाला लुटून नेलं, आणि आज स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षांनी देखील ते थांबलेलं नाही. सामान्य माणसाची लुट ही तर सुरूच आहे, फक्त लुटणारे बदलले…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version