Site icon InMarathi

भारताच्या तिरंग्यावर असलेल्या अशोकचक्रातील २४ आऱ्यांचा अर्थ जाणून घ्या!

24 arrows im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताच्या तिरंगी झेंड्याचे जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व या झेंड्यावरील अशोक चक्राचे आहे. अशोकचक्र म्हणजे ‘धम्माने प्रेरित असलेल्या सदाचरणाचे चक्र.’ सम्राट अशोकांचे चक्र म्हणजे धम्मचक्राचेच रूप समजले जाते.

या चक्राला २४ आरे असतात. मौर्य साम्राज्याच्या अनेक अवशेषांवर असे अशोकचक्र मोठ्या प्रमाणात कोरलेले आहेत.

यापैकी सर्वात महत्त्वाचे अवशेष म्हणजे सारनाथ येथील सिंहाचे प्रतीक आणि अशोकस्तंभ, हे समजले जातात. या

अशोक चक्रावर २४ आरे दर्शवले जातात, जे आपल्या रोजच्या दिवसातील २४ तासांशी निगडित आहेत. आपल्या तिरंगावर जे अशोक चक्र आहे, ते निळ्या रंगाचे असून त्याच्यामागे पांढरी बॅकग्राउंड आहे.

 

jagranjosh.com

 

अशोक चक्राला कर्तव्याचे चाक देखील म्हटले जाते. हे २४ आरे एका व्यक्तीचे २४ गुण दर्शवतात. अशोक चक्रामध्ये अश्या सर्व गुणांचा उल्लेख केलेला आहे, ज्याने कोणत्याही देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी हातभार लावला जाईल.

कदाचित हेच कारण असू शकते की, आपल्या राष्ट्रीय ध्वजाच्या डिझायनरने चरख्याचे चित्र आणि अशोक चक्र ध्वजाच्या मध्यभागी ठेवले.

आपल्या ध्वजामधील अशोक चक्राच्या प्रत्येक आऱ्याचा अर्थ वेगवेगळा आहे.

आपण आज त्याचबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत आणि या प्रत्येक आऱ्याचा अर्थ समजून घेणार आहोत.

१. पहिले आरे : पहिल्या आऱ्याचा अर्थ शुद्धता आहे, जे साधे जीवन जगण्यास प्रेरित करते.

२. दुसरे आरे : दुसऱ्या आऱ्याचा अर्थ आरोग्य आहे, जे शरीर आणि मन निरोगी राखण्यासाठी प्रेरणा देते.

३. तिसरे आरे : तिसऱ्या आऱ्याचा अर्थ शांती आहे, जे संपूर्ण देशात शांती आणि एकता राखून ठेवण्यासाठी प्रेरणा देते.

४. चौथे आरे : चौथ्या आऱ्याचा अर्थ त्याग आहे, जे देश आणि समाजासाठी कोणत्याही बलिदानासाठी तयार असण्यासाठी प्रेरित केले.

 

thenorthlines.com

 

५. पाचवे आरे : पाचव्या आऱ्याचा अर्थ नैतिकता आहे, जे व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात उच्च नैतिकता टिकवून ठेवण्यासाठी प्रेरणा देते.

६. सहावे आरे : सहाव्या आऱ्याचा अर्थ सेवा असा होतो, जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा देश आणि समाजासाठी सेवा प्रदान करण्याची तयारी दाखवण्यास सांगते.

७. सातवे आरे : सातव्या आऱ्याचा अर्थ क्षमा असा होतो, जे मनुष्य आणि इतर प्राण्यांना क्षमा करण्याची भावना निर्माण करते.

८. आठवे आरे : आठव्या आऱ्याचा अर्थ प्रेम आहे,  जे देवाबद्दल आणि इतर सर्व प्राण्यांवर प्रेम करण्याची भावना निर्माण करते.

 

psychologytoday.com

 

९. नववे आरे : नवव्या आऱ्याचा अर्थ मैत्री आहे, जे सर्व नागरिकांबरोबर मैत्रीचे नाते ठेवण्यास सांगते.

१०. दहावे आरे : दहाव्या आऱ्याचा अर्थ बंधुता असा होतो, जे देशातील बंधुत्वाची भावना विकसित करण्याचे काम करतात.

११. अकरावे आरे : अकराव्या आऱ्याचा अर्थ संघटन असा होतो, जे राष्ट्राची ऐक्य आणि अखंडता बळकट करण्याची प्रेरणा देते.

१२. बारावे आरे : बाराव्या आऱ्याचा अर्थ कल्याण करणे असा होतो, जे देश आणि समाजाच्या कल्याणासाठी झटण्याची प्रेरणा देते.

 

runu.it

 

१३. तेरावे आरे : तेराव्या आऱ्याचा अर्थ समृद्धी असा होतो, जे देशाच्या विकासामध्ये सक्रियपणे सहभागी होण्यास सांगते.

१४. चौदावे आरे : चौदाव्या आऱ्याचा अर्थ उद्योग असा होतो, जे देशाला त्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी मदत करण्याची प्रेरणा देते.

 

manufacturingsuccess.org

 

१५. पंधरावे आरे : पंधराव्या आऱ्याचा अर्थ सुरक्षितता असा आहे. जे सांगते की, देशाच्या संरक्षणासाठी नेहमी तयार राहा.

१६. सोळावे आरे : सोळाव्या आऱ्याचा अर्थ जागरूकता असा होतो. जे सत्याबद्दल जागरूक असणे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्यास सांगते.

१७. सतरावे आरे : सतराव्या आऱ्याचा अर्थ समता असा होतो. जे समानतेवर आधारित समाजाची स्थापना करण्याची प्रेरणा देते.

 

dailytimes.com

 

१८. अठरावे आरे : अठराव्या आऱ्याचा अर्थ पैसा असा होतो. जे  पैशाचा इष्टतम उपयोग करण्याची प्रेरणा देते.

१९. एकोणिसावे आरे : एकोणिसाव्या आऱ्याचा अर्थ धोरण असा आहे. जे देशातील धोरणावर विश्वास ठेवण्यास सांगते.

२०. विसावे आरे : विसाव्या आऱ्याचा अर्थ न्याय असा आहे. जे सर्वांसाठी योग्य न्याय देण्याबाबत विश्वास ठेवण्यास सांगते.

 

actualite.cd

 

२१. एकविसावे आरे : एकविसाव्या आऱ्याचा अर्थ सहकार असा आहे. जे एकत्र काम करण्याची प्रेरणा देते.

२२. बाविसावे आरे : बाविसाव्या आऱ्याचा अर्थ कर्तव्ये असा आहे. जे प्रामाणिकपणे आपल्या कर्तव्यांचे पालन करण्याची प्रेरणा देते.

२३. तेविसावे आरे : तेविसाव्या आऱ्याचा अर्थ अधिकार असा आहे. जे आपल्याला आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नका असे सांगते.

२४. चोविसावे आरे : चोविसाव्या आऱ्याचा अर्थ बुद्धी असा आहे. जे आपल्याला पुस्तकांच्या बाहेरील ज्ञान घेण्यासाठी प्रेरणा देते.

असा आपल्या देशाच्या झेंड्यावर असलेल्या अशोक चक्राच्या प्रत्येक आऱ्याचा अर्थ होतो आणि त्यावर आपल्या देशाची प्रगती आणि लोकांची वागणूक अवलंबून आहे.

जर आपण या प्रत्येक आऱ्याने सांगितलेल्या संदेशाचे पालन केले, तर आपला देश नक्कीच प्रगत होईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version