' छत्रपती शिवाजी महाराजांचं “खरं” थोरपण दाखवून देणारा अप्रतिम लेख – InMarathi

छत्रपती शिवाजी महाराजांचं “खरं” थोरपण दाखवून देणारा अप्रतिम लेख

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – शैलेंद्र कवाडे

===

मानवी समाजाची एक खासियत आहे, ती म्हणजे गोष्टी सांगत राहणे. एकच सत्य समाज वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या प्रकारे सांगत राहतो. सत्य तेच राहतं पण त्यातलं तात्पर्य, त्यातून मिळणारा संदेश मात्र बदलत जातो.

 

Hidden history of India.Inmarathi5

एकच गोष्ट आपापल्या सोयीनुसार, आपल्याला आवडेल तशी फिरवली जाते आणि स्वतःपुरतं निखळ सत्य म्हणून समाजाच्या माथी मारली जाते. ज्याची गोष्ट जास्त रंजक आणि सोयीची, त्याचं सत्य जास्त बलवान.

भारतीय समाजाची अजून दुसरी खासियत आहे, मुळातच बहुदैवीक असलेला हा समाज, आपल्या महापुरुषांचे दैवतीकरण पटकन घडवून आणतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भारतीय महापुरुषांना कट्टर समर्थकांचा आणि विरोधकांचा शाप लाभलाय. हा शाप वागवतच या महापुरुषांना त्यांचं पारलौकिक जीवन जगावं लागतं.

प्रत्येकजण त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचा एखादा कवडसा पकडायला जातो आणि आपल्याला सापडलेला कवडसा हेच खरे सत्य हे जगात ओरडून सांगतो.

छत्रपती शिवराय हे असेच, कुणाच्याही पूर्ण आवाक्यात न आलेले महापुरुष. ज्योतीबांना दिसलेले शिवराय वेगळे,  टिळकांचे वेगळे, नेहरूंचे वेगळे, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचे अजूनच वेगळे.

 

shivaji-maharaj-marathipizza04

हे ही वाचा – छत्रपती शिवरायांचे अस्सल रेखाचित्र शोधून काढणारे भीष्माचार्य इतिहासकार…!

मराठी मुलं जरासं जाणतं झालं की आधी शिवाजी महाराजांचे चित्र ओळखायला, काढायला शिकते. राजांच्या गोष्टी, त्यांचे पराक्रम महाराष्ट्राच्या हवेवर सतत दरवळत राहतात.

या मातीत शिवबांचे प्रेम रुजवावे लागतंच नाही, पाऊस पडल्यावर ज्या सहजतेने हिरवळ फुटून येते त्याच सहजतेने शिवरायांचा अभिमान मराठी मनात उमलून येतो.

मराठी माणूस मग शिवरायांना आजच्या त्याच्या भावविश्वाशी जुळवून घ्यायला पाहतो.

आजच्या प्रश्नांची उत्तरं, आपल्या विचारांचे अर्थ तो शिवकाळात आणि महाराजांच्या चरित्रात शोधू पाहतो. या प्रयत्नात अनेकदा गोंधळ उडतात.

 

shivaji maharaj-inmarath

 

अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर महाराज हे त्यांच्या काळातील राजे होते. त्यांच्या श्रद्धा, त्यांचे विचार, त्यांची घडण ही त्या कालानुरूप, आणि त्या काळासाठी होती.

लोककल्याणकारी राज्य स्थापण्याचे स्वप्न घेऊन त्यांनी आपलं राज्य घडवलं.

स्वराज्य हा फक्त भूगोल नव्हता तर आधी ते राज्य महाराजांनी रयतेच्या मनात स्थापन केलं.

स्वराज्य, सुराज्य ही श्रद्धा घडवताना राजांना जी अधिष्ठान वापरावी लागली ती त्यांनी वापरली, मग ती देव असो धर्म असो की अजून काही.

 

jijabai_shivaji_inmarathi

हे ही वाचा – “शिवाजी कोण होता?” पुस्तक – नाण्याची दुसरी बाजू

त्यांच्या काळातील प्रत्येक राज्याला धार्मिक अधिष्ठान होतेच तसेच ते स्वराज्यालाही होते.

महाराजांचा ज्या सत्तांशी संघर्ष झाला त्या सत्तानाही हे धार्मिक आधिष्ठान होते आणि जेंव्हा त्या सत्तांनी स्वराज्याच्या धार्मिक प्रतीकांचा उपमर्द केला तेंव्हा त्यांना महाराजानी त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. याचे लिखित पुरावे आहेत.

एक हिंदू आणि एक सुस्वभावी परोपकारी राजा म्हणून जितके सहिष्णू असावे तितके महाराज होते पण त्यांना आजच्या काळाच्या पट्टीने मोजणे व्यर्थ आहे.

 

shivaji-maharaj-marathipizza

महाराजांची सर्वोच्च प्रार्थमिकता रयतेचे कल्याण ही होती आणि ते गाठण्यासाठी ओघाने जे करायला हवं ते सगळं त्यांनी केलं.

मध्ययुगीन मराठी समाजात, स्वराज्य या मंत्रासाठी जीव पणाला लावून लढणाऱ्या दोन तीन पिढ्या महाराजांनी घडवल्या हे त्यांचे श्रेय आहे.

त्याचबरोबर अतिरेकी धर्मवादाच्या आहारी गेलेल्या राजवटींना त्यांनी पायबंद घातला हेही त्यांचे श्रेय आहे.

उगाच आजच्या काळातील आणि त्या काळाशी सुसंगत नसलेल्या कल्पना महाराजाना चिकटवल्यास, कदाचित तत्कालीन राजकीय सोय साधेलही पण पुढे जेंव्हा राजकीय गरज बदलेल तेंव्हा मोठा गोंधळ उडणार.

शिवराय कुणाला कसे भावतील हे त्या व्यक्तीच्या मानसिक घडणीवर अवलंबून आहे पण हे करत असताना एकच काळजी घ्यावी.

महाराज स्वतःच्या डोळ्यांनी पाहावे. ऐतिहासिक कागदपत्रात, मूळ दस्तऐवजांमध्ये दडलेले महाराज स्वतः जाणून घ्यावे. एखाद्या संघटनेच्या, नेत्याच्या चष्म्याने महाराजाना कधी बघू नये.

 

shivaji-maharaj-marathipizza

 

कोणत्याही संघटनेचे महाराज, हे त्यांना सोसतील झेपतील इतकेच असतात, आणि संपूर्ण शिवाजीराजे शक्यतो कुणालाच झेपत नाहीत. शिवसुर्याकडे बघताना काजळी लावलेली काच वापरायची गरज नाही.

महाराजांकडून काही घ्यायचं असल्यास मोठी स्वप्न पहाण्याची ताकद आणि ती स्वप्न सत्यात उतरवण्याची हिम्मत घ्यावी.

म्हणूनच, शिवरायांचं स्मरण करून एका नव्या कल्याणकारी समाजाचे मोठे स्वप्न पाहायला काय हरकत आहे?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – शिवाजी महाराजांचे “गुरू” कोण? एक विवेचन!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?