Site icon InMarathi

फक्त NDTV वरच २४ तासांची बंदी कश्यामुळे? – जाणून घ्या

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

==

“With great power, comes great responsibility”
असीम शक्ती लाभून “स्पायडरमॅन” बनलेल्या पीटर पार्करला, त्याच्या काकांनी शिकवलेल्या ह्या गोष्टीची जोपर्यंत जाणीव होते तोपर्यंत उशीर झालेला असतो! तो काकांनाच गमावून बसतो.

सध्या हिंदी वृत्त वाहिनी NDTV च्या बाबतीत नेमकी हीच गोष्ट घडून आली आहे.

पत्रकारिता हा कुठल्याही लोकशाहीचा, देशाचा चौथा स्तंभ म्हणवला जातो. पत्रकार, विशेष करून इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकार देशाच्याच नव्हे तर परदेशातल्या देखील कानाकोपऱ्यात पोचून लोकांना माहिती पुरवण्याची ताकद बाळगतात. ते देखील real time. पण जितकी मोठी ताकद, तितकीच मोठी जबाबदारी असते. TRP च्या चढाओढीत अनेक वाहिन्या हि गोष्ट एकतर विसरतात किंवा जाणूनबुजून दुर्लक्षित करतात.

थेट प्रक्षेपण हा सर्व TRP मिळवण्याचा एक मुख्य स्रोत आहे. पण थेट प्रक्षेपण कशाचे केले जावे ह्यावर अनेकांची अनेक मते असली तरी एखाद्या आतंकवादी हल्ल्याविरुद्ध होणाऱ्या प्रतिहल्ल्याचे किंवा जिथे हल्ला होतोय तिथल्या आजूबाजूच्या लोकांची सुरक्षा धोक्यात येईल अशा गोष्टींचे थेट प्रक्षेपण चुकीचे असते ह्यावर एकमत असायला हरकत नाही.

जानेवारी महिन्यात भारतीय सैन्याच्या पठाणकोट बेसवर आतंकवादी हल्ला झाला. अनेक वाहिन्यांप्रमाणे हि बातमी ndtvवर देखील चालवण्यात आली. 4 जानेवारी रोजी, प्रतिहल्ला सुरु असताना ndtvवर सैन्याची ब्रिफिंग दाखवण्यात आली व लगेच अँकरने संवादात्याकडे माहिती विचारली असता संवाददात्याने पुढील माहिती कॅमेऱ्यासमोर दिली.

 

त्यानंतर अँकरने संवाददात्याला सैन्यासमोर असणाऱ्या अडचणींबद्दल विचारणा केली असता संवाददाता पुढे म्हणतो :

 

वरील परिच्छेदाची IMC (inter-ministerial committee)ने नोंद घेतली की ndtvने कळत-नकळत थेट प्रक्षेपण करत आजूबाजूच्या परिसराची, शस्त्रांच्या डेपोची, विमानतळावर असणाऱ्या विमानांची, दारूगोळ्याची माहिती पुरवून केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आजूबाजूच्या लोकांची सुरक्षा देखील धोक्यात आणली.

IMCच्या मते ndtv ने केबल टीव्ही नेटवर्क नियामावलीतल्या नियम 6(1)(p)चा भंग केला आहे जो म्हणतो :

कुठल्याही वाहिनीने सुरक्षाबाळांनी चालवलेल्या प्रति-आतंकवादी ऑपरेशनचे थेट प्रक्षेपण करणे निषिद्ध असून ऑपरेशन संपत नाही तोवर केवळ सरकारने नियमित केलेल्या अधिकाऱ्याची पिरिओडिक ब्रिफिंग दाखवणे बाध्य आहे.

ह्यावर उत्तर देताना ndtvने चे म्हणणे आहे कि अशा प्रकारची माहिती अनेक छापील प्रसारमाध्यमानी तसेच सैन्याच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी देखील दिली आहे. टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्थान टाइम्स व इंडियन एक्सप्रेस इत्यादी वर्तमानपत्रांनी 3 व 4 जानेवारी रोजी अशा आशयाच्या बातम्या दिल्या होत्या असे ndtvचे म्हणणे आहे. दिलेली माहिती व्यक्तिपरत्वे आहे असेही ndtvने नमूद केले.

होय, ndtv प्रमाणेच इतर प्रसारमाध्यमांनी अशा प्रकारच्या बातम्या तुकड्या तुकड्यात दिल्या होत्या, पण, ndtvने जिवंत दहशतवाद्यांचे ठिकाण अचूक रित्या आजूबाजूच्या संवेदनशील परिसराच्या अनुषंगाने “थेट प्रक्षेपित” केले आहे – जे इतरांनी केलेले नाही. काही प्रिंट मिडीयाने डिटेल रिपोर्ट दिले होते. परंतु प्रिंट आणि लाइव्ह मधे मोठा फरक असतो.

लक्षात घ्या –

संवाददाता इथे स्पष्ट करतो की 2 अतिरेकी जिवंत असून ते शस्त्रास्त्र साठ्याजवळ आहेत. सैन्याला भीती आहे की जर हे साठ्यापर्यंत पोचले तर ह्यांना आवरणे अतिशय अवघड जाईल कारण डेपोमध्ये रॉकेट लोंचर, मोर्टार व इतर स्फोटके आहेत.

वरील गोष्टींवरून IMCने नोंद घेतली की ndtvने प्रक्षेपित केलेली माहिती अधिकृत सैन्यअधिकाऱ्याच्या ब्रिफिंगनुसार नव्हती आणि अशाप्रकारे ndtvने नियम 6(1)(p)चे उल्लंघन केले.

IMCने अजून एका गोष्टीची नोंद घेतली की वाहिन्या व छापील प्रसारमाध्यमे ह्यांच्यासाठीची नियमावली वेगवेगळी असून टीव्हीची पोहोच भाषा(लिखित) व भौतिक सीमेच्या पलीकडे असते. टीव्ही हे ऐकायचे व पाहायचे संसाधन असल्याकारणाने त्यावर प्रक्षेपित केलेल्या गोष्टींची पोहोच आणि परिणाम हा खूप मोठा असतो.

शेवटी कुठल्याही राष्ट्रीय सुरक्षेसमोर कुठल्याही गोष्टींचं समर्थन कोणत्याही अर्थाने केलं जाऊ शकत नाही आणि म्हणूनच ह्या बाबतीत ‘व्यक्तिपरत्व’अमान्य करत IMCने ndtvवर कारवाई केली.

शिक्षा ठरवण्यासाठी IMCने नियामावलीच्या आधारे आधी 30 दिवसांची बंदी ठरवली होती पण सूचना व प्रसारण मंत्रालयाने 6(1)(p) हा नियम जून 2015मध्ये घातल्याने ती कमी करून 24 तास करण्यात आली.

एक महत्वाची गोष्ट नमूद करायला हवी – ही अशी पहिली बंदी नाही. ह्या पूर्वी Al jazeera, jamaat, live india देखील असेच बॅन झालेले आहेत.

आशा आहे की प्रसार माध्यमे ह्यावरून धडा घेतील व असलेल्या शक्तीचा जबाबदारीने वापर करतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version