Site icon InMarathi

बोटं मोडण्याची सवय; चांगली की वाईट? जाणून घ्या…

knuckle-cracking IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

आपली मराठी भाषा फार मजेशीर आहे, सारख्याच शब्दांपासून वेगळे अर्थ निर्माण करण्यासाठी बहुधा ही अतिशय प्रभावशाली भाषा आहे. एखाद्याच्या नावाने “बोटे मोडणे” या शब्दांचा अर्थ पूर्णपणे वेगळा होतो आणि तो तुम्हा जाणकारांना वेगळा सांगण्याची गरज नाही.

पण आज तुम्हाला शब्दशः “बोटे मोडणे” या सवयीच्या बऱ्या-वाईट परिणामांबद्दल या लेखातून माहिती सांगत आहोत.

दिवसभर आपण काम करत असतो, तेव्हा आपला जास्तीत वेळ हा कॉम्पुटरवर टायपिंग करण्यात जातो. तसेच दिवसभर आपल्या मोबाईलवर चॅटिंग करत असतो.

ह्या सर्वातून जेव्हा केव्हा ब्रेक मिळतो आपण लगेच आपल्या हातांना आराम मिळावा म्हणून बोटं मोडतो. हो ना?

आपल्यापैकी जवळपास सर्वच हे करतात, आणि कधी कधी तर असच सहज बसल्या बसल्याही आपण बोट मोडत असतो. आपल्याला असं वाटत की ह्याने आपल्या हातांची आणि पायांची बोटे मोकळी होतात.

 

 

पण हा निव्वळ एक गैरसमज आहे. खरेतर ह्याने आपल्या हात पायांची बोटे मोकळी होत नाहीत तर आपल्या हाडांवर वाईट परिणाम होऊ शकतो.

तुम्हाला आठवतं का लहानपणी जेव्हा आपण मजा म्हणून बोट मोडायचो तेव्हा आपली आजी आपल्याला रागवायची की, असे बोट मोडत नसतात. मग कुठेतरी असं देखील ऐकलं होतं की बोट मोडणे हा एक अपशकून आहे. म्हणून बोट मोडू नये.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पण या सगळ्या सांगोपांग गोष्टी असल्या तरी यामागे एक वैज्ञानिक कारण आहे.

 

आपल्याला भलेही ही अंधश्रद्धा वाटत असली तरी बोट का मोडू नये ह्यामागे एक शास्त्रीय कारण देखील आहे.

बोटे मोडणं हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरू शकत. डॉक्टरांच्या मते हाताची किंवा पायाची बोटं मोडल्याने आपल्या हाडांवर त्याचा वाईट परिणाम होतो. ह्याने त्यांच्यातील कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे ही सवय जेवढ्या लवकर सोडता येईल तेवढे चांगले.

 

 

आपली बोटं, गुडघा आणि कोपर ह्यांच्या जॉईन्टमध्ये एक विशिष्ट प्रकारचं लिक्विड असतं. ज्याला synovial fluid म्हणतात. हे लिक्विड आपल्या हाडांच्या जॉईन्टमध्ये ग्रीस प्रमाणे काम करते.

त्यासोबतच ह्यामुळे आपली हाडे एकमेकांशी घर्षण करत नाहीत. ह्या लिक्विडमध्ये असणारा वायू जसे की कार्बन डाय ऑक्साईड तिथे स्वतःसाठी जागा बनवतो. ज्यामुळे तिथे बबल्स तयार होतात. जेव्हा आपण बोट मोडतो तेव्हा हे बबल्स फुटतात. ह्यामुळेच बोट मोडल्यावर तो कुट-कुट आवाज येतो.

का दुसऱ्यांदा बोट मोडल्यावर आवाज येत नाही. असं का होत असेल?

 

तर होत असं की, एकदा बोट मोडले की, ते बबल्स फुटून जातात आणि मग त्या लिक्विडमध्ये परत ते बबल्स तयार व्हायला १५-२० मिनिटे लागतात.

त्यामुळे आपण एकदा का बोटे मोडली की त्यानंतर बोटे मोडल्याचा आवाज येत नाही. मग तुम्ही कितीही वेळा ट्राय केलं तरी जोपर्यंत ते बबल्स पुन्हा तयार होत नाही तोपर्यंत आवाज येत नाही.

एका रिपोर्टनुसार आपली हाडे एकमेकांसोबत लिगामेंटच्या सहाय्याने जुळलेली असतात. नेहमी अशा पद्धतीने बोटे मोडत राहिल्याने आपल्या हाडांतील लिक्विड कमी होऊ लागते. जर ते पूर्णपणे संपले तर त्यामुळे संधिवात होऊ शकतो. तसेच जर सांध्यांना नेहमी ओढत राहिलं तर आपली हाडे सैल होऊ शकतात, त्यांची पकड ढिली होऊ शकते.

 

 

ह्यासंबंधी कॅलिफोर्निया विश्वविद्यालय तसेच इतर काही ठिकाणी देखील येथे संशोधन सुरु आहे. पण बोट मोडल्याने कुठला आजार होऊ शकतो हे अजूनही सिद्ध झालेले नाही. तरी ह्याच्या परिणाम तुमच्या हातांच्या आणि पायांच्या हाडांवर होऊ शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तेव्हा ह्यानंतर बोट मोडताना जरा विचार करा…आणि मुख्य म्हणजे तुमचे असे मित्र मैत्रीण ज्यांना ही बोटे मोडण्याची सवय आहे त्यांना हा लेख नक्की शेअर करा. 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version