सर्वात कमी वयात परमवीर चक्र मिळविणारा साहसी जवान : अरुण खेत्रपाल या बद्दल जाणून घ्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
देशाच्या सुरक्षेसाठी चोवीस तास सीमेवर करडी नजर ठेवणाऱ्या भारतीय सैनिकांच्या शौर्याच्या कथा सांगाव्या तेवढ्या कमी आहेत.
मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या जवानांनी कित्येकदा आपल्या अतुलनीय शौर्याचे दर्शन घडवले आहे.
अरुण खेत्रपाल हा त्यापैकीच एक. सर्वात कमी वयात परमवीर चक्र मिळवणारा शूर सैनिक. याच अरुणबद्दल आपण जाणून घेणार आहोत…
२००१ सालची गोष्ट जेव्हा पाकिस्तान आणि भारत ह्या दोन देशांदरम्यान लोकांचे येणे-जाणे चालूच होते. तेव्हा ८१ वर्षांच्या निवृत्त ब्रिगेडियर एम. एल. खेत्रपाल यांच्याजवळ पाकिस्तानच्या एका ब्रिगेडियरचा संदेश आला.
तो पाकिस्तानी अधिकारी भारताच्या ह्या निवृत्त ब्रिगेडियरला वारंवार पाकिस्तानात येण्याचे निमंत्रण पाठवत होता. पाकिस्तानात येऊन काही वेळ राहण्याची विनंती करत होता.
ब्रिगेडियर खेत्रपाल यांनी बराच काळ त्याच्या ह्या निमंत्रणाकडे दुर्लक्ष केलं. पण काही दिवसांनी त्यांनी ह्या पाकिस्तानी अधिकाऱ्याला भेटण्याचा निश्चय केला.
ब्रिगेडियर खेत्रपाल यांची अशी इच्छा होती की एकदा तरी पाकिस्तानातील सरगोधा येथील त्यांच्या वडिलोपार्जित घराला बघावे.
लाहौर येथे राहणारे ब्रिगेडियर ख्वाजा मोहम्मद नसीर यांनी खेत्रपाल यांच्या विजा आणि इतर कागदपत्रांची व्यवस्था केली.
नसीर, त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि नोकरचाकर या सर्वांनी ब्रिगेडियर खेत्रपाल यांचे स्वागत केले. त्यांनी खेत्रपाल ह्यांना कुठल्याही प्रकारची कमी होऊ दिली नाही.
३ दिवस खेत्रपाल तिथे राहिले. त्या तीन दिवसांमुळे खेत्रपाल आणि नसीर ह्यांच्यात एक आपुलकीचे नाते बनले.
पण खेत्रपाल ह्यांना एक गोष्ट अजूनही सतावत होती, ती म्हणजे एक पाकिस्तानी अधिकारी त्यांना एवढा मान सम्मान आणि प्रेम का देत आहे.
जेव्हा खेत्रपाल यांची परतायची वेळ झाली तेव्हा ब्रिगेडियर नसीर ह्यांनी खेत्रपाल ह्यांना सांगताना म्हटले की,
“सर, एक गोष्ट आहे जी खूप वर्षांपासून मला तुम्हाला सांगायची होती. पण मी कसं सांगू हे कळत नव्हत. मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो.
–
पण ह्यामुळे आता मला हे सांगताना आणखी त्रास होतो आहे की, अरुण ह्याची हत्या माझ्याच हातून झाली होती.”
अरुण म्हणजेच सेकण्ड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, भारताचा सर्वात कमी वयाचा परमवीरचक्र विजेता अधिकारी.
१९७१ च्या युद्धात बासंतार लढ्यात पाकिस्तानजवळ ५ बटालियन होत्या आणि भारताजवळ केवळ ३.
त्यावेळी तीन टँक सोबत ‘१७ पुना हॉर्स’ च्या सेकण्ड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल ह्यांना समोरून येणाऱ्या पाकिस्तानी १३ लान्सर्सच्या पॅटण टँक्सना रोखण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
हा २१ वर्षांचा तरुण सिपाही समोरून येणाऱ्या स्क्वाड्रनशी लढला. त्याने पाकिस्तानचे १० टँक्स नष्ट केले. ह्यामुळे पाकिस्तानी सेनेचे खच्चीकरण झाले आणि समोर येण्याआधीच त्यांनी दुसऱ्या बटालियनची मदत मागितली.
अरुण खेत्रपाल ह्यांनी जो शेवटचा टँक नष्ट केला तो त्यांच्यापासून १०० मीटरहून कमी अंतरावर होता.
शत्रूंच्या हल्ल्यामुळे अरुण ह्यांच्या टँकमध्ये आग लागली. सेनेने त्यांना टँक सोडण्याचा आदेश दिला. पण खेत्रपाल ह्यांनी रेडीओवर अधिकाऱ्यांना म्हटले की,
“सर माझी गन अजूनही चालत आहे आणि जोपर्यंत माझी गन चालत राहील तोपर्यंत मी फायरिंग करत राहील”
हे अरुणचे शेवटचे शब्द होते, त्यानंतर टँकमध्ये लागलेल्या आगीत त्यांची प्राणज्योत मावळली आणि त्यांना वीरगती प्राप्त झाली.
ब्रिगेडियर नसीरने अरुणच्या वडिलांना म्हणजेच ब्रिगेडियर खेत्रपाल यांना सांगितले की, ते दोघेही एकमेकांवर फायरिंग करत होते. दोघांमधून कोणीही एक वाचू शकत होता. ते तर नसीरचं नशीब म्हणून ते वाचले.
नसीरने सांगितले की,
जवानांना ट्रेनिंग दिली जाते की कश्याप्रकारे शत्रूशी लढताना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायचे. पण अरुण खेत्रपाल ह्याचं साहस बघून नसीर ह्यांना त्याची हत्या केल्याचा पश्चाताप होऊ लागला.
–
- नाझींचा एक असा वैमानिक ज्याच्या साहसी व्यक्तिमत्वाची स्तुती स्वतः हिटलर करायचा
- ३० तालिबानी आणि ‘तो’ एकटाच: एका गोरखा सैनिकाचे अतुलनीय साहस!
–
हे सर्व ऐकल्यावर ब्रिगेडियर खेत्रपाल काही बोलू शकले नाही. त्यांच्यासमोर एक असा व्यक्ती होता ज्याने त्यांच्या मुलाची हत्या केली होती. पण सोबतच मागील ४० वर्षांपासून तो त्या गोष्टीचा पश्चाताप देखील करत होता.
त्यानंतर ब्रिगेडियर खेत्रपाल ह्यांनी ब्रिगेडियर नसीरला तेच सांगितले जे एका शिपायाकडून अपेक्षित होते. ते ब्रिगेडियर नसीर ह्यांना म्हणाले की,
“तू तुझे कर्तव्य पार पाडत होतास आणि तो त्याचे.”
शहीद जवान सेकण्ड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांना मरणोत्तर परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. ते भारतातील सर्वात कमी वयात परमवीर चक्र मिळविणारे सैनिक आहेत.
त्यांच्या ह्या साहसी वृत्तीला पाकिस्तानने देखील सलाम केला. त्यांची ही कहाणी पाकिस्तानी डिफेन्सच्या वेबसाईटवर देखील आहे.
शत्रू राष्ट्राने आपल्या देशाच्या एखाद्या जवानाच्या कहाणीला त्यांच्या वेबसाईटवर घेणे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे.
–
- अंगावर हजार जखमा झेलूनही शत्रूला संपवण्यासाठी लढत राहणाऱ्या एका सैनिकाची थरारक कथा
- कोरियन युद्धात अनेक लोकांचे प्राण वाचवणाऱ्या शूर भारतीय सैनिकांची थरारक कहाणी
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.