' मिलिंद सोमण: भारतीय तरुणाईचं हे चिरतरुण स्वप्न एवढं “खास” का आहे?! – InMarathi

मिलिंद सोमण: भारतीय तरुणाईचं हे चिरतरुण स्वप्न एवढं “खास” का आहे?!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

ते म्हणतात “इंटरनेट इज फुल ऑफ ब्रिलिअंट पिपल हु आर स्टक इन राँग जॉब!”

पण हे खऱ्या आयुष्यातही लागू होतं. आणि जे हे लवकर ओळखून पुढचा योग्य निर्णय घेतात ते वेगळ काही करून नाव कमवतात. मिलिंद सोमण ही त्यातलाच. 4 नोव्हेम्बर 1965 ला स्कॉटलंडला ग्लासगोत मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेल्या, इंजिनिअरिंग केलेल्या मिलिंद सोमणने लवकर काळाचे पावलं ओळखून इंजिनिअरिंग सोडून, सुडौल देहबांधा असल्याने मॉडेलिंग क्षेत्राकडे वळला आणि प्रचंड यशस्वी झाला.

तत्कालीन सुपर मॉडेल आणि त्याची कथित प्रेयसी “मधू सप्रे” सोबत अजगरासमवेत “न्यूडावस्थेत” मिलिंद सोमण सोबत केलेल्या फोटोशूटने त्या दोघाना प्रसिद्धी आणि वादग्रस्तता दोन्ही दिले. त्या फोटोशूटमुळे त्याच्यावर प्राणीप्रेमी संघटनेने आणि एका सामाजिक संस्थेने केसही केली होती. अर्थात मॉडेलिंग करिअरमध्ये ते नवीन नसतात आणि एका प्रकारे ते पथ्यावरच पडतात.

 

milind-soman-01-marathipizza

 

पण खऱ्या अर्थाने मिलिंद सोमण घराघरात आणि तरुणींच्या हृदयात शिरला तो अलिशा चिनॉय च्या “मेड इन इंडिया” अल्बम द्वारे!

milind-soman-made-in-india-02-marathipizza

 

मॉडेलिंग च्या करिअर ची एक्सपायरी डेट फार कमी असते. त्यामुळे पुढे लवकरच मिलिंद सोमण ने सिनेसृष्टी कडे मोर्चा वळवला. तथापि शिरस्त्याप्रमाणे त्याला हिंदी सिनेमांसाठी रोल्स मिळू लागले. पण अभिनय आणि रॅम्प वॉक मध्ये “रॅम्पपट्टी” ते “सिल्वर स्क्रिन” चा फरक असतो. अभिनय हे फोटोशूटपुरतं खाण्याचे काम नाही हे सिद्ध झालं. सोमण सिनेसृष्टीत चालला नाही. तरीही अग्निवर्षा आणि शेकडो वेळा बघितला तरीही प्रत्येक वेळी प्रेमात पाडेल असा दिगदर्शन,अभिनय,कास्टिंग सर्वार्थाने परिपूर्ण असलेला “भेजा फ्राय” सिनेमात मिलिंद सोमणचे रोल्स लक्षणीय होते. तामिळ, इंग्लिश, मराठीतला “गंध” हा सिनेमे केलेत. 16 डिसेंम्बर,”कॅप्टन व्योम” ही केलेत.

पण पुन्हा खऱ्या अर्थाने मिलिंद सोमणने आपलं वेगळेपण आणि क्लास सिद्ध केल ते 20 मे 2012 ला 30 दिवसात 1500 किमीची “ग्रीन्याथॉन” रेस पूर्ण करून!

यामुळे लिमका बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नाव आलं.2012 मधेच “फक्त स्त्रियांसाठी” असलेली “पिंक मॅरेथॉन” मिलिंद सोमण च्या नेतृत्वाखाली झाली! यासाठी मिलिंद सोमणशिवाय आणखी कोण योग्य ठरणार होतं!

पण ग्लॅमर क्षेत्रातील चकचकाट बाजुला सारून घाम, रक्त, गाळून सारून स्वतःला पुन्हा वेगळ्या पद्धतीने सिद्ध केलं ते मिलिंद सोमण ने 2015 मधील “आयर्न मॅन चॅलेंज” द्वारे…!

milind-soman-iron-man-03-marathipizza

यामुळे मिलिद सोमण ने सर्वार्थाने देशभरातील लोकांचा आदर मिळवला, सोबतच एक आदर्श प्रस्थापित केला.

आयर्न मॅन चॅलेंज ही “ट्रायथ्यालॉन” असते. यात 3.8 किमी स्विमिंग, 180.२ किमी सायकल चालवणे आणि 42.2 किमी धावणे – अनुक्रमे, नं थांबता अंतर्भूत असते.

हे पूर्ण करण्यास मिलिंदला त्याचा पहिलाच प्रयत्न असूनही फक्त 15 तास 19 मिनिट्स लागलेत! आणि मिलिंद सोमण ने पुन्हा नाव कमावले!

तरुणांनाही लाजवेल असा फिटनेस, ऍंड्युरन्स आणि स्टॅमिना तो आज पन्नाशीतही राखून आहे!आणि म्हणूनच अजूनही तो तरुणीच नाही तर स्त्रीयांचाही “हार्टथ्रोब” आहे!!

टेक अ बाउ मिलिंद सोमण फ्रॉम इनमराठी!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Abhijeet Panse

Author @ MarathiPizza.com

abhijeet-panse has 4 posts and counting.See all posts by abhijeet-panse

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?