शिक्षणासाठी विदेशात जाताय? भारतात आहेत केम्ब्रिज-ऑक्सफर्डच्या तोडीच्या शिक्षणसंस्था
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
दहावी, बारावीच्या परिक्षा झाल्या, कोरोनाचं सावट असतानाच पालक आणि विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशाची लगबग सुरु केली.
सध्या JEE आणि NIIT या परिक्षांनाही विद्यार्थी सामोरे जात असल्याने अनेकांनी अजूनही विद्यापीठ किंवा कॉलेजवर शिक्कामोर्तब केलेला नाही.
यातील अनेक पालक आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांना विदेशात शिकवायला पाठवणार आणि ज्यांच्याकडे तेवढा पैसा नाही ते भारतातच कुठल्यातरी विद्यापीठात आपल्या पाल्यांना शिकवणार…
पण भारतातील शिक्षणसंस्था खरंच इतक्या खालच्या दर्जाच्या आहेत? शिक्षणाची मोठी परंपरा लाभलेल्या आपल्या देशात चांगल्या शिक्षणसंस्था अस्तित्वात नाहीत हा आपण करून घेतलेला गैरसमज आहे.
जगातील पहिले आणि सर्वात मोठे विश्वविद्यालय आपल्या भारतात होते. ते म्हणजे नालंदा विश्वविद्यालय… येथे केवळ भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी यायचे. एवढ महत्व ह्या नालंदा विश्वविद्यालयाचे होते.
आज याच भारत देशातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशी जातात. ज्याच्याकडे पैसा आहे आणि ज्याचा उच्च शिक्षण घ्यायचं आहे, असे बहुतेक विद्यार्थी हे आपल्या देशात नाही तर विदेशातील विद्यापीठांतून शिक्षण घेणे पसंत करतात. आणि यासाठी पूर्णपणे आपली शिक्षण व्यवस्था जबाबदार आहे. ज्यांच्या नाकर्तेपणामुळे आज आपल्या देशातल विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन शिक्षण घ्यावे लागत आहे.
पण हे काही सर्वांच्याच खिशाला परवडेल असं नाही. दूर देशात जाऊन तिथे शिक्षण घेणे म्हणजे पैसा लागणारच. मग त्यापेक्षा कमी पैश्यात जर आपल्याच देशात चांगले शिक्षण घेता येत असेल तर?
आपल्या देशातही काही अश्या शिक्षण संस्था आहेत ज्या कुठल्याच बाबतीत हावर्ड आणि कॅम्ब्रिज विद्यापीठापेक्षा कमी नाहीत.
१. आयआयएम अहमदाबाद :
आयआयएम अहमदाबाद हे भारतातील आयआयएम संस्थांपैकी सर्वात प्रतिष्ठीत महाविद्यालयांपैकी एक आहे.
यात वर्षी QS वर्ल्ड यूनिवर्सिटी रँकिंगमध्ये या संस्थेला जगात २१ वे स्थान मिळाले आहे. पण येथे अॅडमिशन मिळणे खूप कठीण आहे. त्यासाठी आधी कॅटची परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. त्यानंतर GDPI क्लीअर करावे लागते. यासाठी खूप अभ्यास लागतो.
२. महाराजा सयाजीराव विश्वविद्यालय- बडौदा :
आर्ट म्हणजेच कलेच्या शिक्षणासाठी हे विश्वविद्यालय सर्वात चांगले ऑप्शन आहे. कलेच्या शिक्षणात भारतात ह्या विश्वविद्यालयाचा १० वा क्रमांक लागतो. तसेच येथे इतर विषयांकरिता देखील अनेक ऑप्शन्स आहेत. पण येथील कलेच्या शिक्षणाची संपूर्ण जगात ख्याती आहे.
३. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (एनआईटी)- त्रिची :
एनआयटी हे इन्स्टिट्यूट भारतातील पहिल्या १५ इंजीनयिरिंग कॉलेजांपैकी एक आहे. सर्व एनआयटी इन्स्टिट्यूट मधून त्रिची येथील इन्स्टिट्यूट सर्वात उत्तम असल्याचे मानले जाते. यथे विद्यार्थ्यांना JEE क्लीअर करूनच दाखल होता येते. एनआयटी त्रिची चा कॅम्पस देखील खूप मोठा आहे.
४. मिरांडा हाउस- दिल्ली विश्वविद्यालय :
हे मुलींचं कॉलेज आहे. या प्रसिद्ध कॉलेजची स्थापना १९४८ साली झाली. येथे विज्ञान आणि कला याचं शिक्षण दिलं जातं. मागील वर्षी येथील इंग्लिश ऑनर्स या अभ्यासक्रमाकरिता ९७.५ % एवढा कट ऑफ ठेवण्यात आला होता. येथून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी हे आज यशस्वी राजकारणी आहेत. शीला दीक्षित आणि मीरा कुमारी ह्यांनी देखील याचं कॉलेज मधून शिक्षण घेतलेले आहे.
५. एसआरएम इंस्टीट्यूट ऑफ सायन्स अंड टेक्नोलॉजी- चेन्नई :
एसआरएम इंस्टीट्यूट हे प्रायव्हेट इंजीनियरिंग कॉलेजपैकी पहिल्या स्थानावर आहे. श्री रामास्वामी मेमोरियल इंस्टीट्यूट ऑफ सायन्स अंड टेक्नोलॉजी येथे शिकून विद्यार्थ्यांना करियर घडवण्याची उत्तम संधी आहे. २५० एकराच्या जागेत पसरलेलं हे विश्वविद्यालय असून येथे अनेक सोयी-सुविधा देखील आहेत. येथे विश्वस्तरीय ग्रंथालय देखील आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या ह्या विश्वविद्यालयात चांगल्या ठिकाणी कॅम्पस प्लेसमेंट देखील होते, ज्यामुळे विद्यार्थ्याचे भविष्य घडते.
अशी अनेक विश्वविद्यालय आपल्याच देशात आहेत, तर मग एवढा पैसा खर्च करून विदेशात जाऊन का शिकायचं… त्यापेक्षा आपल्याच देशात राहून शिका, इथेच नोकरी करा आणि देशाच्या विकासात हातभार लावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.