या प्रसिद्ध माणसाने फक्त पीएनबी बँकेलाच नव्हे तर प्रियांका चोप्रालाही लावला होता चुना
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
विजय माल्या नंतर जगप्रसिद्ध अब्जाधीश हिऱ्याचा व्यापारी निरव मोदी याला कोण नाही ओळखत??
त्याला लाईमलाईटमध्ये यायची एवढी उत्सुकता होती की त्यासाठी त्यांनी छोटा-मोठा नाही तर तब्बल ११ हजार ४०० कोटींचा घोटाळा केला.
आतापर्यंत निरव मोदी हे नाव केवळ काही मोजक्याच लोकांना माहित होते. पण आज विजय मल्ल्या-२ म्हणून तो प्रत्येक घरात लोकप्रिय झाला आहे.
निरव मोदींनी त्याच्या एका मुलाखतीत व्यापार करणाऱ्या लोकांना सल्ला म्हणून सांगितले होते की,
“आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करा. कधीही रिस्क घ्यायला घाबरू नका आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करा…”
तर ह्या महाशयांनी स्वतःचाच सल्ला स्वतःच खरा करून दाखवला. त्यांनी बॉक्सच्या जरा जास्तच बाहेरचा विचार केला आणि कोणालाही न घाबरता बँकेच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा घडवून आणला.
हेच काय ते वेगळेपण ज्याचा सल्ला ते इतरांना देत होते.
बर हा घोटाळा त्यांनी एकट्याने नाही केला तर ह्यात त्यांच्या पत्नी अमी, स्वतः निरव मोदी, भाऊ निश्चल मोदी आणि बिजनेस पार्टनर मेहुल चौकसी ह्यांचा देखील तेवढाच सहभाग होता.
पण ह्या घोटाळ्यसंदर्भात सर्वात मनोरंजक बाब तर आता उघड झाली आहे. कारण ह्या मोदींनी केवळ बँकेलाच नाही तर आपली देसी हॉलीवूड स्टार प्रियांकाला देखील चांगलंच गंडवलं आहे.
निरव मोदी ह्यांचा हा घोटाळा जेव्हा उघडकीस आला तेव्हा प्रियांका चोप्रा हिच्या पीआर टीमने निरव मोदीवर आरोप लावले. त्यांच्या मते, निरव मोदीने त्यांना फसवलं आहे.
त्याचं झालं असं की, निरव मोदी ह्याने प्रियांकाकडून आपल्या कंपनीकरिता आधी जाहिरात शूट करवून घेतली आणि जेव्हा पैसे देण्याची वेळ आली तेव्हा मात्र मोदीने पैसे दिले नाही.
पैसे कमी दिले गेले, जेवढ्या पैशांत ही जाहिरात करण्याचं ठरलं होतं त्याहून कमी पैसे निरव मोदीने दिल्याचा आरोप त्याच्यावर लावला गेला!
निरवने प्रियांका चोप्राला आपल्या कंपनीची आणि आपल्या डायमंड ब्रांडची इंटरनॅशनल ब्रांड एम्बेसडर बनवलं होत. त्यासाठी एक पूर्ण अॅड कॅम्पेन शूट करण्यात आलं.
पण जेव्हा पैसे देण्याची वेळ आली तेव्हा मात्र निरव मोदींनी प्रियांकाला टांग दिली.
ह्या अॅड कॅम्पेनच्या एका अॅडमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा देखील होता. सिद्धार्थ सुद्धा निरव मोदीवर अतिशय चिडलेला आहे. तो तर निरव मोदी विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात होता.
पण आता तर भारत सरकारच निरव मोदीच्या मागे हात धुवून लागलं आहे. कदाचित ह्यामुळे प्रियंका आणि सिद्धार्थ दोघेही समाधानी असतील…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.