Site icon InMarathi

जपानमध्ये झोपायला वेळ, तर ऑस्ट्रियात सुट्टीचाही पगार : नोकरीचे अफलातून नियम

office-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

प्रत्येक देशातली कार्यसंस्कृती वेगळी असते. तिथलं वातावरण, भौगोलिक परिस्थिती इत्यादींवर कामाचे नियम आणि वेळा ठरत असतात. कामगारांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, सुट्ट्या वगैरेंचा कामाच्या दर्जावर प्रभाव पडत असतो. भारतातली कार्यसंस्कृती योग्य आहे की नाही यावर बराच उहापोह होत असतो. टी बदलायला हवी असेही अनेकांचे मत असते.

पण काही देश असे आहेत जिथं कामाच्या ठिकाणी कामगारांना अत्यंत मोकळे आणि खेळीमेळीचे वातावरण उपलब्ध करून देण्यात येते. आवश्यक त्या सर्व सुविधा, विश्रांतीसाठी राखीव वेळ यांसारख्या अनेक गोष्टी मिळतात. याने होते असे की कामाचा मंताला येण्याऐवजी उत्साह वाटू लागतो.

एखाद्या गोष्टीची सक्ती असेल तर ती करणे जास्त जड वाटणे ही साधारण मानसिकता आहे. या काही देशात मुळात काम काहीतरी तिऱ्हाईत जबाबदारी नसून ती हौशीने करायची गोष्ट आहे हे बिंबवले जाते.

अशाच काही देशातील कार्यसंस्कृती बाबत आपण जाणून घेणार आहोत.

१. जपान येथे कर्मचाऱ्यांना झोपायला वेळ दिला जातो

 

timesofindia.indiatimes.com

ऑफिसमध्ये जर कधी चुकीनही डोळा लागला, की कोणीतरी तुम्हाला हाक मारतं, उठवतं आणि तिकडून तुमचा बॉस डोळे वटारून तुमच्याकडे बघत असतो. आणि बॉस नसला तरी असे अनेक असतात जे तुमची तक्रार बॉस कडे करतील. कारण आपल्याकडे कामाच्या वेळी झोपा काढण्याचे पैसे दिले जात नाहीत, हो ना?

 

businessinsider.in

पण जपानमध्ये आपल्यापेक्षा खूप वेगळे आहे. तिथले लोक, तिथली संस्कृती, त्यांचे इंव्हेनशंस हे देखील अतिशय वेगळे आणि विचित्र असतात. अशाच प्रकारचा जपान येथे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक विचित्र नियम आहे.

तिथे काम करणारे लोक हे रात्री देखील काम करत असतात, त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही.

त्यामुळे तेथील बहुतेक कंपन्या ह्या आपल्या कर्मचाऱ्यांना दिवसा झोपण्याची मुभा देतात. त्यांच्या मते ह्यामुळे कर्मचाऱ्यांची उत्पादन क्षमता वाढेल आणि ते आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरित होतील.

२. नेदरलंड येथे कर्मचाऱ्यांना ३ दिवस काम केल्यानंतर सुट्टी मिळते.

आठवडाभर ऑफिसमध्ये काम करणारी व्यक्ती जर त्याच्या पगारापेक्षाही जास्त आतुरतेने कुठल्या गोष्टीची वाट बघत असेल तर ते म्हणजे विकेंड. इथे मंगळवार पण संपायचा असतो आणि ह्या विकेंडला कुठे फिरायला जायचं, काय करायचं ह्याचं प्लॅनिंग होत असतं. आणि त्याची वाट का बघू नये?

एक विकेंडच असतो जेव्हा तुम्ही आठवड्याभराचा थकवा घालविण्यासाठी, काम विसरून आपलं जीवन जगण्यासाठी मोकळे असता.

 

iamexpat.nl

पण तुम्हाला हे वाचून खूप आश्चर्य वाटेल की, नेदरलंडच्या कर्मचाऱ्यांना विकेंडची वाट बघायची गरजच पडत नाही. कारण येथे ३ दिवसानंतरच त्यांना विकेंड मिळतो. येथील सरकारच्या मते कर्मचाऱ्यांनी जास्त प्रवास करायला हवा, फिरायला हवं.

डच न्यायव्यवस्थेनुसार प्रत्येक नागरिकाला मातृत्व, पितृत्व आणि मोठ्या सुट्ट्या घेण्याचा हक्क आहे.

३. ऑस्ट्रियात सुट्ट्यांचेही पैसे मिळतात

 

sciencedaily.com

ऑस्ट्रियाचा कायदा अतिशय रंजक आणि नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला हवा असणारा आहे. इथे दर ६ महिन्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला ३० दिवसांची पेड लिव मिळते. एवढचं नाही तर ज्या कर्मचाऱ्याचं वय हे २५ वर्षांपेक्षा जास्त असेल त्याला ३० नाही तर ३६ दिवसांची व्हॅकेशन लिव मिळते.

आणि जर समजा तुम्ही ह्या सुट्ट्या नाही घेत आणि त्यादरम्यान देखील काम करत असता तर त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे दिले जातात.

४. फ्रांस येथे तुम्ही तुमच्या ऑफिशियल मेल ला इग्नोर करू शकता.

 

hbr.org

आपल्याकडे कामाचे तास संपले तरी काम काही संपत नाही. मग लोक ट्रेनमधून घरी जात असतानाही काम करताना दिसतात. एवढच काय तर काहींना घरी जाऊन देखील काम करावे लागते. पण फ्रांस येथील कर्मचारी ह्या बाबतीत खूप लकी आहेत.

कारण एकदा का ऑफिस मधून बाहेर पडलं की, त्यांचा आणि कामाचा काहीही संबंध नसतो. त्याचं काम हे केवळ ऑफिस पुरतंच असतं.

फ्रांसमध्ये जर तुम्ही ऑफिस मधून निघालात आणि त्यानंतर तुम्हाला कुठलाही ऑफिशियल मेल आला तर तुम्ही न घाबरता तो इग्नोर करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला कोणीही जाब विचारणार नाही. ह्यामुळे लोकांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल जीवनातील समतोल राखला जातो.

५. युरोपियन कोर्ट प्रवासात लागणाऱ्या वेळेला देखील कामाचे तास मानतो.

मुंबई, दिल्ली ह्यांसारख्या मोठ्या शहरात लोक राहतात एका कोपऱ्यात आणि त्याचं ऑफिस असतं दुसऱ्या कोपऱ्यात. अश्यावेळी जर तुम्हाला १० ला ऑफिसमध्ये पोहोचायचं आहे तर तुम्हाला २-३ तास आधी घरून निघावं लागतं.

आपल्या कामाची वेळ १०-६ असली तरी ऑफिसपर्यंत यायला किती वेळ लागतो हे कोणीही विचारत नाही. म्हणजे सकाळी निघाल्यापासून ते घरी पोहोचेपर्यंत आपल्या कामाचे तास ८ नाही तर १२-१३ होऊनच जातात.

 

msn.com

पण युरोप येथील कर्मचाऱ्यांना हा त्रास सहन करावा लागत नाही. येथे कर्मचाऱ्यांच्या ट्रॅवलिंग टाइम ला देखील ऑफिस टाइम मानलं जातं. एवढचं नाही तर सकाळी किंवा सायंकाळी त्यांची कुठल्या क्लायंट सोबत मिटिंग असेल तर कंपनी ह्याची खात्री करते की भेटीचे ठिकाण कर्मचाऱ्याच्या घराजवळचे असेल.

युरोपियन कोर्टाने हा निर्णय कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून घेतला आहे.

६. पोर्तुगाल येथे बॉस कर्मचाऱ्याला कामावरून काढू शकत नाही.

 

msn.com

पोर्तुगाल येथे काम करणारे कर्मचारी ह्या जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणी कामाला आहेत, कारण त्यांना तिथे त्यांची नोकरी जाण्याची भीती नाही. ह्या देशाच्या कायद्यानुसार येथे बॉस आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढू शकत नाही. येथील नोकरीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कुठलाही टर्मिनेशन क्लॉज नाही. जर कोणाला नोकरीवरून काढायचे आहे तर त्या कर्मचाऱ्याला चांगल्यापैकी रेजिग्नेशन पॅकेज द्यावे लागते.

७. बेल्जियम येथे मिळतो करियर ब्रेक

 

greatlearning.in

बेल्जियम येथे देखील नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक खास कायदा आहे. येथे तुम्ही नोकरी जाण्याच्या भीतीशिवाय काही दिवसांकरिता करियर ब्रेक घेऊ शकता. आणि तुमचा बॉस तुम्हाला असे करण्यापासून थांबवू शकत नाही.

एवढचं नाही तर या दरम्यान त्यांना तुमच्या आर्थिक गरजा देखील पूर्ण कराव्या लागतात.

बघितलं… ह्या देशांमध्ये तिथल्या कर्मचाऱ्यांसाठी किती सोयीस्कर सुविधा आणि कायदे आहेत… आता तुम्हालाही नक्की असे वाटत असेल की आपल्याही देशात हे कायदे लागू व्हायला हवेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version