आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आधुनिक भारताच्या इतिहासात सर्वात महत्वाचा उठाव म्हणून ज्याचे नाव घ्यावे लागेल तो म्हणजे १८५७ चा उठाव. ब्रिटिश भारतामध्ये आल्यावर त्यांनी भारतीय लोकांवर अन्याय केले आणि त्याच्या विरोधात भारतीयांनी त्यांचा मोठ्या चिकाटीने सामना केला.
यामध्ये भारतीय सैनिकांचा विजय झाला नाही. पण याचे दूरगामी परिणाम संपूर्ण स्वातंत्र्यलढ्यावर झाले आहेत.
१८५७ च्या बंडाची सुरुवात १० मे या दिवशी झाली होती. ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीच्या पदरी असलेल्या भारतीय सैनिकांनी केलेल्या या उठावात अनेक सैनिक शहीद झाले. इंग्रजांनी हा उठाव शास्त्राच्या बळावर चिरडून टाकला.
एवढा काळ उलटून गेल्यांनतर देखील या विषयीबद्दलची असलेली लोकांमधील उत्सुकता कमी झालेली नाही.
द टाइम्स नुसार लंडनचे एक प्रसिद्ध पत्रकार सर विलियम रसेल १८५७ मध्ये भारतामध्ये आले होते. ते क्रिमिया युद्धाचे वार्तांकन करून येथे भारतात आले होते.
या दरम्यान त्यांनी एक कोड्यात टाकणारा रिपोर्ट लिहिला होता, ज्यामध्ये शाहजहांपुरमध्ये काही ठिकाणी इंग्रज भूते असल्याच्या उल्लेख त्यांनी केला होता.
एका ठिकाणी तर ते म्हणतात की डोके नसलेला एक सैनिक उत्तर भारताच्या शहरांमध्ये प्रत्येक रात्री दिसू लागला होता. याच्या व्यतिरिक्त ते जिथे गेले तिथे झालेल्या तोडफोडीविषयी देखील त्यांनी लिहिले आहे.
जेव्हा दिल्लीवर भारतीय सैनिकांनी वर्चस्व मिळवले होते, तेव्हा काही विदेशी स्त्रियांना देखील खूप कठीण परिस्थितीमधून जावे लागले होते. यामध्ये एक हॅरिएट टायटलर देखील होती, जी कॅप्टन रॉबर्ट टाइटलरची पत्नी होती.
रॉबर्ट ३८ व्या नेटिव्ह इन्फेन्ट्रीमध्ये तैनात होते. जेव्हा इंग्रजांनी दिल्ली काबीज केले, तेव्हा त्यांची पत्नी आठ महिन्यांची गर्भवती होती. त्यांनी दिल्लीच्या दाद या जंगलमय भागामध्ये एका बैलगाडीमध्ये आपल्या मुलाला जन्म दिला होता.
सर विलियम रसेल यांच्या या रिपोर्ट मध्ये अभ्यासात सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे तिच्या स्वागताचा छोटासा भाग उद्धृत करण्यात आला होता. त्यात ती म्हणते,
“माझ्या बाळाला न्युमोनिया झाला होता (हॅरीएटच्या अनुमानानुसार) आणि असे वाटत होते की, तो एक आठवड्यापेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकत नाही. तो फालॅलेनच्या (एक प्रकारचे कापड) छोट्याशा तुकड्यावर होता आणि दुसरे काहीही नव्हते. अंगाई गीताच्या ऐवजी चेतावणीचे आवाज, गोळ्यांचे आवाज होते.”
–
“बाळाच्या जन्माच्या एका आठवड्यानंतर मान्सून किंवा उन्हाळ्यामधेच पाऊस सुरु झाला होता. जोरात होणाऱ्या या पावसामध्ये छप्पर गळायला लागले आणि काही वेळेमध्येच आम्ही सर्व पाण्यामुळे पूर्णपणे भिजून गेलो. आमचे नशीब चांगले होते, म्हणून हत्यार ठेवण्यासाठीची एक जागा खाली झाली होती. त्यामुळे माझ्या पतीने आम्हाला तिकडे नेले.”
असे हॅरीएट म्हणाली. त्याच्यानंतर हॅरिएट वृद्ध होईपर्यंत जिवंत राहिली आणि २० व्या शतकाच्या अगदी सुरुवातीला तिचे निधन झाले.
यातील एक दुसरी पीडित स्त्री ही एमेलिया होती. जिला २७ जूनला सतीचौडा घाटावर झालेल्या नरसंहाराच्या दरम्यान गंगेमध्ये फेकण्यात आले होते. तिला मोहम्मद इस्माईल खान नावाच्या एका घोडेस्वाराने वाचवले. त्याने तिला आपल्या हाताने पकडून घोड्याच्या बाजूला बांधून पुढे गेला.
एमेलिया ही बंड सुरु होण्याच्या काही दिवस अगोदरच दिल्लीमधून निघाली होती आणि ती कानपूरला पोहचता पोहोचता सैनिकांचे बंड सुरु झाले होते.
एमेलियाने सांगितले होते की,
“मला घाटापासून तीन मेल लांब एका सुभेदारच्या झोपडीपर्यंत घेऊन जाण्यात आले. तिथे मला वरच्या जातीच्या स्त्रियांचे कपडे घालण्यासाठी देण्यात आले. सूर्याच्या प्रकाशात माझा चेहरा सुकत चालला होता. त्यामुळे बंदी बनवणाऱ्याला मला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे खूप सोपे झाले होते.”
===
हे ही वाचा – हिटलर – सुभाषचंद्र बोस यांच्या पहिल्या भेटीतील, टिळक आणि गौतम बुद्धांचं कनेक्शन!
===
एमेलिया एका मोठ्या टेंटमध्ये कितीतरी दिवस राहिली, त्यानंतर तिला सैनिक अलाहाबादला घेऊन गेले. ते तिथून दिल्लीसाठी निघणार होते, पण इंग्रजांच्या आव्हानाला पाहता त्यांनी फरुखाबादचा रस्ता निवडला आणि तिला सांगितले की, तुला आम्ही मारून टाकणार.
एमेलिया एका ठिकाणी म्हणते की मौलवींनीं तिला धर्म बदलण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की,
तू जर आमचा धर्म स्वीकारला तर तुझे रक्षण आम्ही करू. तिने हे स्वीकारल्यानंतर तिला लखनौला पाठवण्यात आले. जिथे ती एका मुस्लिमाच्या झोपडीमध्ये दोन महिने राहिली. त्यानंतर तिला बंदी बनवणाऱ्या मुस्लीम सैनिकानेच ब्रिटिश सैनिकांकडे सोपवून जीवनदान दिले.
भयानक नरसंहार झाला
२ जून १८५७ ला जेव्हा सैनिक सीतापूरकडे चाल करायला लागले, तेव्हा मॅडलिन जॅक्सन आपला भाऊ आणि दुसऱ्या एका इंग्रज कुटुंबासोबत जंगलात लपण्यासाठी निघून गेली.
मॅडलिन तर पाच महिन्यानंतर जिवंत सुटली, पण तिच्या भावाची हत्या झाली. मॅडलिन त्यावेळीच्या लखनौ ऍक्टिंग चीफ कमिश्नरची भाची होती. ब्रिटिश सैनिकांनी नंतर विध्वंसाने याचा बदला घेतला.
रिचर्ड बार्टर याविषयी म्हणतात की,
“हे भयानक होते, आमचे घोडेस्वार सैनिक आणि तोफांनी शत्रूला नेस्तनाबूत करून टाकले. त्यांचे मृतदेह कुजले होते आणि त्यामधून येणारा दुर्गंध खूप भयानक होता.”
जिथे बंड केलेल्या सैनिकांच्या विध्वंसाची खूप चर्चा झाली, तिथेच ब्रिटिशांनी हे बंड दाबण्यासाठी खूप अन्याय केले. यामध्ये हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. शेकडो स्त्रिया मारल्या गेल्या. बहादूर शाहच्या जनानखान्यातील स्त्रियांचा देखील यात समावेश होता.
लहान मुलांना देखील सोडण्यात आले नाही. हा नरसंहार ‘अल्बियन के एंजिल्स’ या पुस्तकामध्ये जेवढा सांगण्यात आले आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी पट वाईट आहे.
आपल्याजवळ असणाऱ्या शस्त्रांच्या जोरावर ब्रिटिशांनी उठाव करणाऱ्या सैनिकांना धूळ चारली, आणि ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात भारतात झालेला पहिला सार्वत्रिक उठाव चिरडून टाकला.
परंतु या उठावाची दुसरी बाजूही इतकी हृदय हेलावून टाकणारी आहे. ब्रिटीश स्त्रियांचे अतोनात हाल या उठावात झाले. अनेक इंग्रजी कादंबऱ्यांची पानेच्या पाने या हालअपेष्टांच्या वर्णनाने भरलेली आहेत.
===
हे ही वाचा – नेपोलियन सारखा शूर योद्धा इतका हळवा, रोमँटिक असेल यावर विश्वास बसेल का?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.