Site icon InMarathi

प्राचीन भारताच्या ऐतिहासिक साक्ष देणाऱ्या या अज्ञात गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

an inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

 

प्राचीन काळी सिंधूपासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेल्या भारतीय उपखंडाला व्यापक इतिहास लाभला आहे. या देशात विविध राजा – महाराजांनी आपली राज्ये स्थापन केली होती. या राज्यांनी वेगवेगळ्या कलाकारांना आश्रय दिला, कलेची जपणूक केली.

तसेच भव्य आणि आकर्षक अशा वास्तू तयार केल्या. त्यातल्या कित्येक अजूनही तशाच्या तश्या उभ्या आहेत.

त्या काळातील संस्कृतीबद्दल या वास्तू आजही आपल्याला देत आहेत. एवढे असूनही भारतातील काही इतिहास अजूनही कुठेतरी दडलेला आहे, असे दिसून येते. अशा कितीतरी गोष्टी आपल्या भारतामध्ये आहेत, ज्यांची मुबलक माहिती कुठेही उपलब्ध नाही. आज आपण भारताच्या दडलेल्या इतिहासाबद्दलच जाणून घेणार आहोत.

१. कर्कोटा वंश 

भारतीय उपखंडातील ही एक प्रमुख सत्ता होती, जी काश्मीरच्या प्रदेशामध्ये निर्माण झाली होती. हर्षवर्धन यांच्या जीवन काळादरम्यान दुल्लभवर्धन यांनी हे राज्य स्थापन केले होते.

या साम्राज्याचे एकूण क्षेत्रफळ म्हणजे मुघल साम्राज्य (४० लाख चौरस किमी) आणि मौर्य साम्राज्य (५० लाख चौरस किमी) इतके विस्तारलेले होते.

 

 

ललितादित्य मुख्तपिडा ह्या घराण्यातील सर्वात बलवान शासकांनी मध्य आशिया, अफगाणिस्तान आणि पंजाब हा भाग चिनींच्या मदतीने घेतला. ललितादित्य यांनी काश्मीरची शक्ती वाढवली.

इसवीसन ७४० च्या सुमारास कन्नौजच्या राजा यशोवर्मनला त्यांनी पराभूत केले. ललितादित्य हे तुर्क, तिबेटी, भुतिया, कंबोजस आणि इतर काहींना देखील पराभूत करू शकले.

 

 

कर्कोटा सम्राट हे मुख्यतः हिंदू होते. त्यांनी राजधानी परिहासपूरमध्ये हे सुंदर डोळे दिपवणारे हिंदू मंदिर बांधले. मार्तंड सूर्य मंदिर हे ललितदात्य यांनी बांधले. हे भारतातील सर्वात जुने सूर्य मंदिर आहे आणि हे त्यावेळच्या सर्वात मोठ्या मंदिर संकुलांपैकी एक आहे.

२. एलियन रॉक पेंटिंग, चरमा

 

 

छत्तीसगढच्या चरामा या गावामध्ये कोणत्याही ऐतिहासिक तपशिलाशिवाय असलेली भीतीदायक चित्रे आढळतात. पुरातत्ववेत्ते जे. आर. भगत यांनी ही भयानक हॅनोमॉईड्सची चित्रे शोधून काढली. जवळच असलेल्या खेड्यांमध्ये या विषयी अनेक दंतकथा सांगण्यात येतात. पुरातत्व विभागाने या प्रकल्पावर संशोधन करण्यासाठी ISRO ला विनंती केली आहे.

३. सोन भंडार गुहा, बिहार 

 

हे ही वाचा – जगभरातले लोक “या” प्राचीन भारतीय सवयीच्या प्रेमात पडलेत, कारण या सवयीचे हे ११ फायदे त्यांना पटले

बिहारच्या राजगिरीमध्ये असलेली ही गुहा तिसऱ्या किंवा चौथ्या शतकातील असल्याचे मानले जाते. असे देखील म्हटले जाते की, या गुहेच्या पश्चिमी कक्षेमध्ये एक दरवाजा आहे. जो राजा बिंबिसारच्या खजिन्यापर्यंत जातो.

या गुहेच्या भिंतींवर शंख लिपीमध्ये शिलालेख लिहिलेले आहेत. ज्यावरून असे मानले जाते की, एक कोडे आहे जे या खजिन्यापर्यंत जाण्याचा रस्ता सांगते असे सांगितले जाते.

पण आजपर्यंत या लिपीमध्ये जे लिहिण्यात आले आहे, याचे भाषांतर करण्यात आलेली नाही. इंग्रजांनी या दरवाज्याला तोफेने तोडण्याचा प्रयत्न केला होता, पण ते त्यात यशस्वी झाले नाही. तोफेच्या गोळ्याचे निशाण अजूनही येथे असल्याचे दिसतात.

४. नानासाहेबांचे गायब होणे 

 

 

नानासाहेब हे १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध लढा देणाऱ्या प्रमुख लढवय्यांपैकी एक  होते. युद्धानंतर ते गायब झाले. त्यांच्या संदर्भात असे सांगितले जाते की, त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती होती. ब्रिटिशांनी त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण ते यशस्वी झाले नाहीत.

असेही म्हटले जाते की, ते आपल्या संपत्तीचा बराचसा भाग घेऊन नेपाळला पळून गेले होते. पण याला पुरावे नाहीत. १५० वर्षांनंतरही नाना साहेबांचे भवितव्य आणि त्यांच्या खजिन्याचे काय झाले, हे रहस्य आहे.

५. हडप्पा संस्कृतीचा नाश 

 

 

हडप्पा संस्कृती हे कदाचित भारतीय इतिहासातील सर्वात रहस्यमय प्रकरण आहे. ही संस्कृती निर्माण करणाऱ्या लोकांची ओळख आणि ४००० वर्षांपूर्वीची छायाचित्रे अजूनही एक रहस्य बनलेली आहेत, त्यांच्याबद्दल अजूनही कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नाही.

या संस्कृतीच्या अभ्यासानंतर समोर आलेला सर्वात आश्चर्यकारक निष्कर्ष हा आहे की, ही संस्कृती निर्माण होऊन अचानकपणे विलुप्त झाली. या अचानक लुप्त होणाऱ्या संस्कृतीबद्दल अनेक सिद्धांत आहेत, पण यांपैकी कोणताही अचूक नाही.

६. नऊ अज्ञात माणसे 

 

 

या ९ अज्ञात पुरुषांचे गूढ हे जगातील सर्वात मोठे गूढ मानले जाते. पौराणिक कथेनुसार, सम्राट अशोक स्वतः कलिंगाच्या रक्तरंजित लढ्यानंतर या माणसांना भेटले होते. कलिंगाच्या युद्धामध्ये जवळपास १ लाख लोकांचा मृत्यू झाला होता.

या ९ अज्ञात माणसांकडे खूप ज्ञान होते, असे म्हटले जाते. वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करून विविध विषयांच्या आणि ज्ञानाविषयी माहिती घेऊन त्यावर ग्रंथ लिहिण्याचे काम यांच्यावर सोपवण्यात आलेले होते.

७. संघा तेन्झिनचा पाचशे वर्षांपूर्वीचा ममी

 

 

हिमालयाच्या ट्रेकमध्ये आपल्याला स्पिती व्हॅलीमध्ये घ्वेन नावाचे एक छोटेसे गाव लागते. या गावामधील एक गोष्ट भीतीदायक आणि प्राचीन इतिहासाची ग्वाही देणारी आहे. या गावामध्ये एका लहान खोलीमध्ये काँक्रीटच्या संरचनेत पातळ काचेमध्ये संरक्षित असलेले ५०० वर्षापूर्वीचे ममी आहे.

या ममीला जसेच्या तसे जतन करून ठेवण्यात आलेले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ५०० वर्षांपूर्वीची ही ममी असूनही तिचे दात, अंगावरचे कातडे जसेच्या  तसे आहे. जवळून पाहिल्यास असे वाटते की, जणू ही ममी आताही श्वास घेत आहे. हे देखील एक रहस्य आहे.

या सर्व इतिहासातील गोष्टी अजून एक मोठे गुपित बनून राहिलेल्या आहेत. ज्यांच्याबद्दलची पुरेशी माहिती अजूनही हाती लागलेली नाही.

===

हे ही वाचा – या मंदिराच्या खांबांतून येतो आवाज. प्राचीन स्थापत्यशास्त्राचा अनोखा आविष्कार!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version