आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
तुम्ही लहानपणी हिटलर आणि त्याच्या नाझी जर्मनीविषयी इतिहासात अभ्यासले असेल, अशा या नाझी जर्मनीचे अस्तित्व दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी संपले होते आणि त्याच्यानंतर जगामध्ये वेगवेगळ्या घडामोडी सुरु होण्यास सुरुवात झाली. याच घडामोडीमधील एक म्हणजे बर्लिनची भिंत.
नाझी जर्मनीच्या आत्मसमर्पणाच्या बरोबरच संपलेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर युती केलेल्या सैन्याने बर्लिनला चार भागांमध्ये विभागले होते. सर्वात मोठा पूर्व भाग हा सोव्हियत सेक्टरचा होता. पश्चिम भागावर तीन मोठ्या शक्ती अमेरिका, ग्रेट ब्रिटेन आणि फ्रांस यांचे नियंत्रण होते.
युतीच्या सैन्याने ‘पोट्सडॅम’ करारावर स्वाक्षरी केली, ज्याच्यानुसार जर्मनी आणि बर्लिनच्या सीमा ठरवण्यात आली.
बर्लिनची भिंत बनण्याचे कारणे काय होती ?
पूर्व जर्मनीमध्ये शिक्षण मोफत होते, पण पश्चिम जर्मनीमध्ये शिक्षणावर खर्च करावा लागत असे. याच कारणामुळे जर्मन विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी पूर्व भागामध्ये जात असत आणि नोकरी करण्यासाठी पश्चिम भागामध्ये येत असत.
दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जेव्हा जर्मनीची विभागणी झाली, तेव्हा शेकडो कारागीर, प्रोफेसर, डॉक्टर, इंजिनियर आणि व्यावसायिक दर दिवशी पूर्व बर्लिन सोडून पश्चिम बर्लिनमध्ये जाऊ लागले.
एका अनुमानानुसार, १९५४ ते १९६० च्या दरम्यान ७३८ विद्यापीठाचे प्रोफेसर. १५, ८८५ अध्यापक, ४६०० डॉक्टर आणि १५, ५३६ इंजिनियर आणि तंत्रज्ञानाचे विशेषतज्ञ यांनी पूर्व जर्मनीमधून पश्चिम जर्मनीमध्ये स्थलांतर केले.
एकूण मिळून ही संख्या ३६, ७५९ च्या जवळपास होती. जवळपास ११००० विद्यार्थ्यांनी चांगल्या भविष्याच्या शोधात पूर्व जर्मनी सोडून पश्चिम जर्मनीला जवळ केले.
जेवढ्या लोकांनी पश्चिम जर्मनीमध्ये पलायन केले होते, त्यांना चांगले शिक्षण हे पूर्व जर्मनीमधूनच मिळाले होते. याच प्रतिभावान लोकांच्या पलायनामुळे पश्चिम जर्मनीला त्याचा फायदा मिळाला आणि पूर्व जर्मनीला त्याचे नुकसान सहन करावे लागले.
येथे ही गोष्ट देखील सांगणे तेवढेच गरजेचे आहे की, जे लोक पूर्व जर्मनीला सोडू इच्छित होते, अश्या लोकांना पश्चिम बर्लिनला येऊन तिथून विमानाद्वारे पश्चिम जर्मनीला जाणे सोपे होते. याव्यतिरिक्त १९५० आणि १९६० च्या शीत युद्धाच्या दरम्यान पश्चिमी देश, बर्लिनला पूर्वी ब्लॉकच्या गुप्तहेरासारखा देखील वापर करत असत.
आता अशा परिस्थितीमध्ये पूर्व जर्मनीला या पलायनाला आणि गुप्तहेरीला रोखण्यासाठी काही न काही उपाय करणे गरजेचे होते. याच सर्व कारणांना वैतागून शेवटी पूर्व जर्मनीच्या समाजवादी सरकारने १२ आणि १३ ऑगस्ट, १९६१ च्या रात्रीमध्ये पूर्व आणि पश्चिम बर्लिनच्या सीमांना बंद केले होते.
बर्लिनच्या या भिंतीचे मुख्य हेतू हा होता की, पूर्व जर्मनीमधून पळून पश्चिम जर्मनीमध्ये जाणाऱ्या लोकांना जाऊ न देता येथेच थांबवावे.
बर्लिनच्या या भिंतीची लांबी जवळपास १५५ किलोमीटर एवढी होती. पूर्व जर्मनीच्या सरकारने हजारो सैनिक सीमेवर तैनात केले आणि कामगारांच्या मदतीने रात्रीच्या वेळी सीमेवर गस्त घालण्यास सुरुवात केली. एवढेच नाही, तर रस्त्यांवर पेटणाऱ्या लाईट्स देखील त्यांनी यासाठी बंद केलेल्या होत्या. जेणेकरून पश्चिम भागामध्ये राहणाऱ्या लोकांना या भिंतीविषयी काही कळू नये आणि त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा विरोध होऊ नये.
जेव्हा सकाळ झाली, तेव्हा बर्लिन शहराला दोन भागांमध्ये विभागलं गेलं होतं. या भिंतीमुळे कितीतरी कुटुंब देखील विभागले गेले. एकाच कुटूंबातील नातेवाईकांमधील काहींचे घर भिंतीच्या ह्या बाजूला होते, तर काहींचे घर भिंतीच्या त्या बाजूला होते. त्यावेळेचे अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन एफ केनेडी यांना देखील याबद्दल काहीच माहिती नव्हते.
बर्लिनची ही भिंत कधी बनवण्यात आली ?
१९८० च्या दशकामध्ये सोव्हियत अधिपत्य असल्यामुळे पूर्व जर्मनीमध्ये राजकीय उदारीकरण सुरू झाले आणि पूर्व जर्मनीमध्ये सरकारच्या विरोधात जबरदस्त प्रदर्शने झाली. यामुळे पूर्व जर्मनीच्या सामाज्यवादी सत्तेचा अंत झाला. ९ नोव्हेंबर १९८९ ला घोषणा करण्यात आली की, बर्लिन सीमेच्या रहदारीवर लावण्यात आलेली बंदी हटवण्यात आली आहे आणि ही भिंत पाडण्यात आली आहे. जर्मन लोक या भिंतीचे तुकडे तोडून त्याच्या आठवणी जपण्यासाठी आपल्या घरी घेऊन गेले होते.
बर्लिनची भिंत पडल्याने संपूर्ण जर्मनीमध्ये राष्ट्रवादाचा उदय झाला आणि पूर्व जर्मनीच्या लोकांनी जर्मनीच्या पुनः एकीकरणासाठी मंजुरी दिली आणि ३ ऑक्टोबर १९९० ला जर्मनी परत एकदा एकत्रित झाले.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.