ह्या ७ इरिटेटिंग चुकांमुळेच तुम्ही ह्या वॅलेंटाईनला देखील सिंगल आहात
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आज वॅलेंटाईन्स डे म्हणजेच प्रेमाला सेलीब्रेट करण्याचा दिवस, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस.. सर्वात आधी ज्यांच्याकडे त्यांचा त्यांचा वॅलेंटाईन आहे त्या सर्वांना ‘हॅप्पी वॅलेंटाईन्स डे’… आणि जे आजच्या दिवशी देखील सिंगल आहेत त्यांच्यासाठी दोन मिनिटांच मौन…
अरे पण काळजी का करताय वॅलेंटाईन्स डे अजून संपला नाहीये, अजूनही तुमच्या हातात वेळ आहे. तुम्ही सिंगल आहात, ह्याच्या मागे काही ना काही कारण तर नक्कीच असणार ना? एकतर तुम्ही कधीच तसे एफर्ट्स घेतलेले नाहीत किंवा घेतलेले एफर्ट्स पुरेसे ठरलेले नाही.
मला एक कळत नाही की, मुलं नेहेमी पोरी पटवायच्या मागेच का असतात. म्हणजे अक्षरशः त्यावर बेट्स म्हणजेच मित्रा मित्रांत पैज लावली जाते. कॉलेजच्या कट्ट्यावर, ऑफिसच्या कॅन्टिनमध्ये अश्या चर्चा रंगत असतात.
पहिली गोष्ट म्हणजे पोरींना पटवायच्या नजरेने मुळीच बघू नका. त्यांना मैत्री, प्रेम ह्या भावनेने बघा. म्हणजे तुमचा पुढील वॅलेंटाईन्स डे सिंगल सेलिब्रेट करावा लागणार नाही.
आज आम्ही तुम्हाला तुम्ही करत असलेल्या अश्या काही चुका सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही आजही सिंगल आहात. तसेच त्या चुका सुधारण्यासाठी काही खास टिप्स देखील सांगणार आहोत ज्या वापरून तुम्ही मुलींना सहजपणे इम्प्रेस करू शकता…
१. पोरींना पटवणे
अनेकांना असे वाटत असते की, मुली ह्या अश्याच पटतात… आता हे पटतात म्हणजे काय? खरेतर मुलींना एखादा असा मुलगा हवा असतो जो त्यांच्यावर प्रेम करेल आणि हे प्रेम त्यांना ह्या पोरी पटवा संघटनेतील मुलांच्या डोळ्यांत तर नक्कीच दिसत नाही. त्यामुळे त्या अश्या पोरांना कधीही पोरी होकार देत नाहीत.
पोरींना पटवू नका त्यांना इम्प्रेस करा. जर तुम्ही त्यांना आवडलात तर त्या नक्की तुम्हाला होकार देतील.
२. चुकीची वागणूक
तुम्ही मुन्ना भाई एम.बी.बी.एस. हा चित्रपट तर बघितलाच असेल. त्यातील तुम्हाला तो सीन आठवतो, जेव्हा मुन्नाभाईला कॉल येतो आणि ती मुलगी सांगते की ती पहिल्यांदा एका मुलाला भेटायला आलेली आहे, आणि ह्या भेटीतच तिला ठरवायचे की तिला तो पसंत आहे की नाही.
तेव्हा मुन्नाभाई तिला सल्ला देतो की, जर त्या मुलाने वेटरला चांगल्याने हाक मारली तर तो मुलगा चांगला आणि जर त्याने शुक-शुक, छूक-छूक अशी हाक मारली तर तो ठीक नाही.
हीच ती वागणूक जी ठरवते की मुलगी इम्प्रेस होईल की, नाही. तुम्ही इतरांना कशी वागणूक देता ह्यावरून तुमचा स्वभाव कळतो. त्यामुळे आपली वागणूक चांगली ठेवा. तुम्हीच विचार करा ना कोणती मुलगी अश्या शुक-शुक, छूक-छूक करण्याऱ्या मुलासोबत राहील.
३. स्वतःला हिरो समजणे
भलेही शाहरुख, सलमान, रणबीर हे मुलींना आवडत असले, तरी तुम्ही ते आहात असा वाव मुळीच आणू नये. तुम्ही जसे आहात तसेच राहा.
मुलींना ती मुलं जास्त आवडतात जे उगाचच हिरो बनण्याचा प्रयत्न करत नाहीत. थोडक्यात काय तर तुम्ही जसे नॉर्मल राहता त्यांच्यासमोर पण तसेच रहा.
४. तुमच्यासोबत तिला असुरक्षित वाटणे
एखादी मुलगी एखाद्या मुलाबरोबर का असते, कारण तिला त्या मुलासोबत राहायला आवडत म्हणून.
जर तुमच्यासोबत कुठली मुलगी आहे तर तिला तुमच्या वागणुकीमुळे कुठेही असुक्षित वाटायला नको.
तिच्याशी बोला, तिला जीवनाविषयी, आवडी-निवडीविषयी जाणून घ्या. ह्यामुळे ती कम्फर्टेबल होईल आणि मग पुढे तुमची मैत्री हळूहळू प्रमाकडे नेत चला. ते काय आहे न, पहिल्या भेटीत “आय लव्ह यू” म्हणून चालत नसतं… प्रेमाची पहिली पायरीच मैत्री आहे. त्यामुळे तिथूनच सुरवात करा. नाहीतर तोंडावर आपटाल.
५. तिला गृहीत धरणे
प्रत्येक मुलीला ती स्पेशल आहे असं तुम्ही म्हटलं, तर तुमचं अर्ध काम झालं समजा.
ह्या जगातली कुठलीही मुलगी असू दे, जर तुम्ही तिला स्पेशल ट्रिट केलं तर ती तुम्हाला होकार देणारच. ती तुमच्यासाठी किती खास आहे, का खास आहे हे वेळोवेळी तिला सांगत चला. ज्यानंतर तुम्हला देखील ती आपल्या मनात एक स्पेशल स्थान नक्की देईल. पण जर तुम्ही तिला गृहीत धरले तर मग काही खरं नाही.
६. पहिल्या भेटीवेळी रिकाम्या हाताने जाणे
पहिल्या भेटीत कधीही खाली हाताने जाऊ नये. एक छानसा फुलांचा गुच्छ, एखादी भेटवस्तू, चॉकलेट असं कहीतरी घेऊन जावे. यामुळे मुली इम्प्रेस होतात.
जर खूप खर्चिक वाटत असेल तर एक लाल गुलाबाचं फुल हे तर सर्वात उत्तम ऑप्शन. ह्याने तुम्हाला जास्त खर्चही करावा लागणार नाही आणि मुलगी देखील गुलाब बघून आनंदी होईल.
७. पुरुषी वर्चस्व गाजवणे
कुठल्याही मुलीला एक असा जोडीदार हवा असतो, जो तिला समजून घेईल, तिला तिचे जीवन जगण्याची मोकळीक देईल.
त्यामुळे तुम्ही पुरुष आहात आणि ती एक स्त्री आहे म्हणून तिने नेहेमी तुमचेच ऐकायला हवे असे निर्बंध तिच्यावर लादू नका. तिचेही ऐकून घ्या, तिला जसे राहायचे आहे, जसे जगायचे आहे तसे जगू द्या.
तुम्हाला तिची कुठली गोष्ट पटत नसेल तर तिच्याशी त्याबद्दल बोला. तिला सल्ला द्या, तिच्यावर स्वतःचे निर्णय लादू नका.
ह्या वरील काही टिप्स वापरून बघा… काही जमतंय का.. कारण अजूनही तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही.
—
- प्रेमाच्या ५ स्टेजेस- ह्या माहीत नसल्या तर जोडपी ह्या सुंदर नात्याचा आनंद मिळवू शकत नाहीत
- बौद्ध भिक्खूच्या नजरेतून: नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसीत घडू शकणाऱ्या चुका व त्यांवरील उपाय
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.