Site icon InMarathi

प्रेमाची व्याख्या फक्त बॉलीवूड दाखवेल तशीच असते का? तरुणाई का भुलते?

rockstar im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – सोमेश सहाने 

===

बॉलिवूडने आपलीच एक वेगळी काल्पनिक प्रेमाची व्याख्या बनवून टाकलेली आहे. “असामान्य समस्यांना सोडवल्या नंतर बक्षीस म्हणून हिरोला हिरोईन भेटणे किंवा तिला मिळविण्यासाठी जगाशी भांडणे म्हणजेच प्रेम होय…”

 

 

शाहरुखचे प्रसिद्ध चित्रपट, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, DDLJ, आर माधवनचा रेहना है तेरे दिल मे, मैने प्यार किया, दिल दे चुके सनम, सगळे साऊथ इंडियन रिमेक्स, या प्रेम युगुलांना प्रेम करणं सोडून आयुष्यात दुसरं काहीच काम नसतं, प्रेम मुलानेच मुलीवरच (गोऱ्याच) केलं पाहिजे. दोघेही सुंदर दिसणारेच असायला हवेत.

बऱ्याचदा दोघांच्याही आयुष्यातलं ते पहिलंच प्रेम असतं. जगात एकदाच प्रेम होऊ शकतं.

प्रेम मिळत नसेल किंवा विरह असेल तर काय काय करायचं असतं याची यादी: दम्याचा त्रास होतो, केस बांधायला-दाढी करायला जमत नाही, डोळ्यात सतत पाणी असतं, जेवण जात नाही, पांढरे कपडे घालायचे असतात, एकटं-एकटं रहायचं असतं, दर्दी गाणं सुरात म्हणायचं असतं, त्रास होतोय म्हणून नाचायचं असतं, अतिप्रमाणात दारू प्यायची असते (फक्त हिरोनेच!), हिरोईनने लग्नाचा विचार करायला पाहिजे, इ.

बॉलिवूड मधील प्रेम प्रकारांना प्रेमासाठीचे युद्ध, अँग्री यंग मॅन आणि लाजाळू नटीच्या लग्नसमारंभाने शेवट होणाऱ्या कथांच्या चौकटीतून बाहेर काढण्याची सुरुवात म्हणजे DDlJ.

 

 

शाहरुखच्या रूपाने क्युट दिसणारा रोमँटिक तरुण आणि मोकळ्या स्वभावाच्या नट्या यांच्या समिकरणाने मेलोड्रामाने गच्च भरलेल्या सिनेमांची नवीन चौकट बनली.

अति विशेष डायलॉग आणि अति व्यावहारिक आयुष्यापासून दूर असलेल्या कथानकांनी भरपूर कमाई केली. आपला साथीदार स्वप्नात जसा असावा तसा सिनेमांत दिसू लागला, याला एसकेपीझम म्हणता येईल.

यातून प्रेमाची अशी एक धादांत खोटी व्याख्या बिंबविली गेली, तिचा अजूनही बराच प्रभाव आढळतो.

 

 

या गोष्टींचा वास्तवाशी संबंध नसला तरी वास्तवातील अपेक्षा या गोष्टींनी प्रभावित झालेल्या असतात. छोट्या शहरात आणि ग्रामीण भागात तरुणांसाठी अजूनही हेच प्रेमाचं समर्पक चित्रण आहे.

आता तरुण पिढी जरा पुढे सरकली आहे, हे फेसबुकवर वाचणाऱ्यांपैकी बरेच जण आता या मेलोड्रामाशी स्वतःच्या संकल्पनांना रिलेट करत नसतील.

जब वुई मेट, अनजाना अनजानी, बचना ए हसिनो, हंम तुम, शुद्ध देसी रोमान्स, बेफिकरे, वेक अप सिड, ये जवानी है दिवाणी, जिंदगी ना मिलेगी दोबारा, बँड बाजा बारात, कॉकटेल, स्टुडन्ट ऑफ द इअर

 

 

आता सिनेमांमधला मेलोड्रामा काहीसा काळसुसंगत झाला, संपला नाही बरं का! अजूनही छान दिसणारे लोकच एकमेकांच्या प्रेमात पडतात, एकमेकांना मिळविण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करतात.

आता व्हिलन हा बाहेरचा कोणी नसतो. तो त्यांच्या आतच असतो. करिअर, प्रीओक्युपाईड माईंडसेट, ध्येयासक्ती, पॅशन, स्वतःची तत्व, इ. गोष्टी अडथळे निर्माण करतात.

हे बऱ्याचअंशी वास्तव परिस्थितीला धरून वाटतं. चित्रपटातील परिस्थिती जरी झकपक असली तरी कथेचा गाभार्थ व्यावहारिक असतो. रिलेटेबल असतो.

आता वाढती तरुणांची संख्या झपाट्याने शहरात स्थलांतरित होत आहे, आधुनिकतेच्या प्रवाहात संकुचित परंपरांच्या चौकटी ढिल्या पडताय.

यातून आंतर जातीय-धर्मीय विवाह, लिव्ह इन, हे प्रकार जन्माला येताय. कधी नव्हे ते स्त्री पात्राला एक सबळ लिखाण, भूमिका, स्क्रीन स्पेस मिळतोय.

90s मधल्या “लाज औरत का गेहना होती है” वाली किंमत नव्हे तर नटाइतकीच नटीही आर्थिक पातळीवर सक्षम दाखवली जाऊ लागली. यातून प्रेमात निर्णय घेताना तिची बाजू कुठेही कमी पडत नाही.

तिच्या स्वाभिमानाचा विचार होतो आणि वास्तवात यातलं काही उतरलं असेल तर ही एक क्रांतिकारी सुरुवात म्हणावी लागेल. व्हर्जिनिटी किंवा लग्नाआधीचे संबंध या गोष्टींचा स्वीकार होतोय.

या पिढी समोर प्रेम करण्यात असणारे अडथळे फक्त वैचारिक-भावनिकच असतात. अर्थात फक्त एवढं एका समजूतदार, आर्थिक स्थैर्य असणाऱ्या वर्गापूरतच हे मर्यादित होतंय, पण शेवटी हीच लोकं तर 200-300 रुपये भरून सिनेमे बघतात!

‎अशा सिनेमांची वारंवारिता वाढत आहे. मेलोड्रामा असला तरी रिलेटेबिलिटी नक्कीच वाढली आहे. वास्तव परिस्थितीत स्वतःला त्या नटाच्या भूमिकेत ठेवणं सोपं जातंय.

रणबीर कपूर, सैफ अली खान याना या बदलाचा चेहरा म्हणता येईल. पण त्यापेक्षा इम्तियाझ अली याचं सातत्य या प्रवाहाला बळ देतंय.

प्रेमाच्या प्रगल्भ व्याख्या देणारे चित्रपट:

“प्रेमाची खरी व्याख्या —– अशी आहे” असं सांगण्याची हिम्मत मी करणार नाही. पण एवढं नक्की म्हणता येईल की ती व्याख्या सापेक्ष असते.

तर ही अत्यंत रँडम, अनियमित, डील्यूजनल, संकल्पना तशीच गोंधळासकट काही चित्रपटांत दाखवली गेली.

 

 

‎याची सुरुवात केली ती फरहान अख्तरच्या “दिल चाहता है” ने. विशीतला तरुण अक्षय खन्ना चाळीशीतल्या डिंपलच्या प्रेमात पडताना दाखवला.

तिला, आईला, आणि मित्रांनाही त्याची ही साहजिक भावना समजावून सांगताना नायकाची धडपड अक्षय खन्नाने मस्त साकारली आहे.

 

 

‎प्रेम केलं म्हणजे लग्न करावंच किंवा आता तिचे लग्न झालंय म्हणून तिला विसरून जावं असे सामाजिक संकेत साधारणतः समाजमान्यतेसाठी सगळेच पाळतात.

पण शेवटी कोणाही, अगदी कोणाही बद्दल कधीही आलेले इन्स्टिंकट्स पाळून प्रेम व्यक्त करणे तसं सगळ्याच बाजूंनी अप्रिय प्रकार. हा अप्रिय प्रकारही प्रेम असतो हे दाखवण्याचं श्रेय इम्तियाझ अलीच्या “रॉकस्टरला” जातं.

“Beyond all good and bad, right and wrong their lies a land, i ll meet you their – Rumi” हा आशय चांगल्या चित्रपटाच्या रूपाने सोप्या भाषेत आलाय.

‎’स्वतःला स्वतःच्या मूळ अस्तित्वाच्या जवळ नेणार नातं’ अशीही एक व्याख्या प्रेमाची करता येते. एकमेकांचं नाव, गाव, काम, काहीच माहीत नसतानाही प्रेम होऊ शकतं, त्यासाठी खूप काळ सहवासात घालवायची गरज नसते.

अत्यंत कमी काळ मिळालेल्या सोबतीतूनही प्रेम बहरू शकतं, स्वतःला स्वतःच्या जवळ नेऊ शकतं. हा प्रकार इम्तियाझ च्या “तमाशा” मधून आपल्या समोर आला. “अगर तुम साथ हो” हे गाणं आणि त्यातला अभिनय तर कळस.

 

 

‎पण या संकल्पनांसह वास्तवात चालणाऱ्या प्रेमकथांचं हुबेहूब चित्रण झालय ते मसान आणि पिकू या चित्रपटांमधून. मसानमध्ये बनारस शहरात चालणाऱ्या दोन समांतर कथानकातून टिपिकल रोमान्सचं वास्तवदर्शी रूप दिसतं.

तर “पिकू” चा विषय वेगळा असला तरी त्यात दीपिका-इरफानची केमिस्ट्री मला जास्त इंटरेस्टिंग वाटली.

प्रेम होतं म्हणजे काय? काही नाट्यमय घटना आणि रोमँटिक म्युझिक या कल्पना झाल्या. काही सामान्य घटनाक्रमात येणारा सहज सहवास, त्यातून वाढणारी आतुरता, साध्या-साध्या घटनांतून वाढत जाणारी जवळीक, अस सगळं नैसर्गिक गतीने पाहण्याची पर्वणी म्हणजे “पिकु”.

‎पण या सगळ्या संकल्पनांच्याही पुढे जाऊन विशाल भारद्वाजच्या “हैदर” मधून त्याने Oedipus complex दाखवलाय, ज्यात नायकाचं आपल्या आईवर प्रेम असतं.

कित्येक जुने चित्रपट आणि हिंदी सोडून बाकीच्या भाषेतील चित्रपटही आहेत पण सदरील चित्रपट फक्त त्या प्रेमाच्या व्याख्येला प्रसिद्ध उदाहरण म्हणून वापरलेले आहेत.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version