Site icon InMarathi

क्रिकेटच्या मॅचनंतर वापरून जुन्या झालेल्या बॉलचं काय होत असेल?

cricket ball inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

क्रिकेट हा भारतातला अत्यंत लोकप्रिय खेळ. भारताच्या गल्ली- गल्लीत हा खेळ खेळला जातो. आणि फक्त खेळलाच जात नाही तर तितक्या आवडीने जगभरात हा खेळ पाहिला जातो.

क्रिकेट बघताना आपल्याला अनेक प्रश्न पडतात. त्यातलाच एक नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे क्रिकेटच्या मॅचनंतर वापरून जुन्या झालेल्या बॉलचं काय होत असेल?

क्रिकेट… ह्या खेळात दोन गोष्टी अति महत्वाच्या असतात त्या म्हणजे बॅट आणि बॉल. आपण नेहमी बघतो की, हे क्रिकेटर्स खेळाकरिता आपल्या बॅट स्वतः निवडतात.

त्यांना कशी, कुठली बॅट हवी हे ते स्वतः नीट पारखून घेतात. पण ह्या खेळात जेवढे महत्व बॅटचे आहे तेवढेच बॉलचे देखील आहे.

 

hindustantimes.com

 

क्रिकेटचा बॉल हा लेदर आणि कॉर्कचा वापर करून बनवला जातो. तसेच टेस्ट क्रिकेट दरम्यान लाल तर एक दिवसीय सामन्यांत पांढऱ्या रंगाच्या बॉलचा वापर केला जातो.

 

fbc.com.fj

 

आपण अनेकदा बघतो की खेळादरम्यान जर गोलंदाजाला बॉल वापरण्यात काही समस्या असेल तर तो नवीन बॉलची अपील करतो.

तुम्ही कधी विचार केला आहे का, की नवीन बॉल आल्यानंतर त्या जुन्या बॉलचे काय होत असेल?

काही काळापूर्वी बीसीसीआईने ह्याचं संबंधी एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ह्या जुन्या बॉल्सचे काय होते याचं उत्तर होतं.

 

bcci.tv

 

जेव्हाही कुठल्या सामन्यात एखादा खेळाडू उत्तम प्रदर्शन करतो तेव्हा त्या सामन्याचा बॉल त्याला एक आठवण म्हणून दिला जातो.

त्याला देण्यात आलेल्या बॉलवर तो सामना, सामन्याची तारीख, ग्राउंड ते त्याच्या प्रदर्शनापर्यंत सर्वकाही लिहिलेले असते.

आपण असं कायम म्हणतो की जुने फोटो हे त्या प्रसंगाचे साक्षीदार असतात. त्या आठवणी आपण कॅमेऱ्यात कैद करून ठेवतो. तसंच काहीसं गोष्टींच्या बाबतीतही असतं.

कधीतरी कपाट आवरतांना आपल्याला जुनी गोष्ट सापडली की नकळत आपल्याला भूतकाळात घेऊन जाते. आणि त्या घटनेची आठीवण करून देते. क्षणभर का होईना, पण माणूस याने सुखावतो.

कदाचित बॉल आठवण म्हणून देण्यामागेही हेच कारण असावं.

 

bcci.tv

 

ह्या बॉल्सना क्रिकेट चाहत्यांना विकले देखील जाते. त्यासाठी लिलाव देखील ठेवण्यात येतो. पण असे क्वचितच होते, जेव्हा तो बॉल जास्तच खास असेल तेव्हा त्याचा लिलाव होतो.

माजी इंग्लिश क्रिकेटर बॉब विल्स यांनी १९८१ ला एशेज सिरीजमध्ये ओस्ट्रेलिया विरुध्द ८ विकेट घेतले होते. या सामन्यात लाल रंगाच्या लेदर बॉलचा वापर करण्यात आला होता. ह्या बॉलला २०१७ साली १० लाखाहून अधिक किमतीत विकण्याकरिता ठेवण्यात आले होते.

अनेक खेळाडू असे देखील असतात जे डोमेस्टिक आणि रिजनल लेवलवर उत्कृष्ट प्रदर्शन करतात. तेव्हा काही बॉल्स ह्या तरुण खेळाडूंना त्याचं कौतुक म्हणून दिले जातात. जेणेकरून त्यांना प्रात्साहन मिळत राहील.

 

pinterest.com

 

हे बॉल्स फॅन्सना भेट म्हणून देखील दिले जातात. टेलीकम्यूनिकेशन कंपनी ‘वोडाफोन’ नेहमी आईपीएल दरम्यान ‘वोडाफोन सुपरफॅन’ घेऊन येते.

जिथे लकी विनर्सना आईपीएलच्या सामन्यादरम्यान हॉस्पिटॅलिटी स्टॅण्ड मध्ये बसून सामना बघायला मिळतो. सोबतच त्यांना जिंकणाऱ्या टीमच्या कर्णधाराने ऑटोग्राफ केलेला मॅच बॉल देखील मिळतो.

भारतात एखादा माणूस क्रिकेटचा चाहता नाही असं शक्यतो होत नाही. त्यामुळे या चाहत्यांसाठी ही भेट किती खास असेल याची कल्पना तुम्हाला येईलच.

 

smh.com.au

 

कधी कधी सामन्यादरम्यान बॉल खराब होतो, तेव्हा त्याच्या जागी जो बॉल वापरला जातो तो नवीन नसतो. तर तो देखील आधीच्या बॉल एवढे ओव्हर्स खेळलेला असतो पण त्याची कंडीशन चांगली असते.

टेस्ट क्रिकेट दरम्यान नेहमी बॉल बदलला जातो. पाच दिवसीय क्रिकेटमध्ये ८० ओव्हर्स नंतर बॉल बदलता येतो.

ह्याप्रकारे जुन्या बॉल्सना अनेक ठिकाणी वापरल्या जाते किंवा चाहत्यांना तो गिफ्ट म्हणूनही दिला जातो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version