आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच देशातील तरुणांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया’ या महत्त्वाकांशी योजनेचा शुभारंभ केला. त्याचे स्वागत आहे. अशा पद्धतीच्या योजनांची गरज होती. आपल्याला माहित आहे नविन उद्योगाची व त्या द्वारे निर्माण होणाऱ्या रोजगारची आजच्या तरुणानां किती गरज आहे. वाढती महागाई, बदलत चाललेले मॉडर्न लाइफ स्टाइल आणि त्याच बरोबर वाढत चाललेली बेरोजगारी ही आपल्या देशाची, युवकांची आजची समस्या आहे. आत्तापर्यंत आपण बघत आलो आहोत की खुप छोटे – मोठे उद्योग आपल्या आजुबाजूला उभे राहिले आहेत. पण त्यातले किती उद्योग यशस्वी झाले – हे जर पाहिले तर खूपच कमी नावे समोर येतील.
असे का होते ? नविन उद्योग अयशस्वी का होतात, त्यांच्या पुढे नक्की कश्याचा अडथळा येतो ह्यावर आज आपण बोलुया.
कोणताही नविन उद्योग सुरु करण्याआधी आणि नविन उद्योग सुरु केल्यानंतर ते अयशस्वी का होतात त्याची कारणे पाहुया.
१) चुकीच्या व्यवसायची निवड:
व्यवसायची निवड ही सर्वात पहिली पायरी आहे. नविन व्यवसाय सुरु केल्या नंतर काही काळाने आपल्याला वाटते आपण चुकीच्या क्षेत्रात तर नाही ना आलो? व्यवसाय कुठलाही असो – त्या व्यवसायाची निवड करताना आज बाजारमध्ये कश्याची मागणी आहे (मार्केट ट्रेन्ड काय आहे) आणि आपल्याला काय जमते (त्या विषया मधे आपले किती knowledge आहे) हे पाहणे तितकेच महत्वाचे आहे.
आपल्या भारतात पाउला-पाउला वर वेगवेगळी demand – मागणी असते. त्यातून आपल्याला योग्य मागणी लक्षात घेऊन त्या संबंधीत व्यवसाय निवडण्याची गरज असते.
मंदिराच्या बाहेर हार-फुल नारळचाच व्यवसाय जास्ती होतो हे कळाले पाहिजे. योग्य गरज ओळखून तसा पुरवठा करणे गरजेचे असते.
२) आर्थिक भांडवल/गुंतवणूक:
बऱ्याच वेळा व्यवसायची निवड होते – पण नविन लघू उद्योगाची सुरुवात करायला मोठा अडथळा असतो तो आर्थिक भांडवलचा म्हणजेच व्यवसाय उभारणीसाठी लागणारा पैसा उभा करणे. बँकांच्या सावध पावित्र्या मुळे हे आर्थिक भांडवल सहजरित्या मिळणे थोड़े कठीण होते. ज्यानी नव्याने उद्योग सुरु केलेले आहेत त्यांना वाढती टेक्नोलॉजी, व्यवसायाचा विस्तार ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी निधी लागतोच.ह्या निधी अभावी व्यवसाय जास्ती वेळ तग धरु शकत नाही. व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर योग्य वेळी योग्य पैसा गुंतवणे गरजेचे असते. आर्थिक सुनियोजन आणि व्यवस्थापनाच्या अभावामुळे व्यवसायात आपण अयशस्वी होतो.
३) भीति/जोखिम:
व्यवसायात उतरण्या आधीपासूनच हा घटक आपल्यामधे ठाण मांडतो. ही भीती वेगवेगळी असू शकते.
उदा. व्यवसायात बुडण्याची भीती (पैश्याचं, वेळेचं नुकसान), उत्पादन हवे तेवढे व तसे नं चालण्याची भीती (growth नं होणे), व्यवसाय वाढीचे निर्णय चुकण्याची भीती…अशी अनेक प्रकारची भीती असते. काही व्यवसायांमधे कायद्याच्या भीतीचे सावट नेहमीच असते. उदा – डॉक्टर्स, फॉरेंसिक लॅब , ड्रग्स एंड केमिकल, होटल्स एंड बार इ. ह्या भीतीने “जे सध्या चालु आहे त्यातच आपण समाधानी आहोत” असा समज करून व्यवसाय वृद्धी साठी काहीच नं केल्याने आपण बाजारात जास्त दिवस टिकुन राहु शकत नाही.
“व्यवसाय म्हंटले की जोखिम आलीच”, हे वास्तव आपण विसरून चालणार नाही. व्यवसायात उतरताना ह्या भीतीवर विजय मिळवण्याच्या निराधारासकटच उडी मारावी!
४) व्यवसायीक भागीदार आणि टीम:
एका सर्वेनुसार असे पाहण्यात आले आहे की भागीदारीमध्ये व्यवसाय हा एकट्याच्या व्यवसायापेक्षा चांगला होतो पण तो भागिदार योग्य व्यक्ति असेल तरच!
अनेक वेळा व्यवसायीक भागीदारांमधे वाद/कलह, मतभेद होतात परिणामी व्यवसाय अयशस्वी होतो. योग्य भागीदार मिळाला तर व्यवसायात लवकर जम बसतो, निधीचा पर्याय प्राप्त होतो पर्यायाने भाग भांडवल वाढते, नविन युक्त्या, मत, सल्ला सहज मिळु शकतो. नाही तर काय होते, ह्याचे “हाउसिंग डॉट कॉम” चे उदाहरण आपण पाहिले आहे.
नविन उद्योगांमध्ये व्यावसायिक संघ (Team) चा सुद्धा खुप मोठा सहभाग असतो. काही उद्योगांमध्ये उच्च पदे गरजेचे असतात काही उद्योगांमध्ये तेवढे गरजेचे नसते. टीमची प्रेरणा (motivation), त्यांची निष्ठा (dedication) ह्यावर व्यवसायाचे यश-अपयश अवलंबून असते.
५) व्यवसाईक प्रशिक्षणाचा अभाव:
आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये practical knowledge, professional skills ह्यांना खुप कमी लेखण्यात आले आहे. ह्या कारणाने जेव्हा व्यवसायामध्ये आपण जातो तेव्हा आपल्याला कळते की आपला शैक्षणिक पाया भक्कम असला तरी “व्यावसाईक पाया”च मजबूत नाही. त्या नंतरसुद्धा व्यवसायीक प्रशिक्षण किती लोक घेतात? हा एक प्रश्नच आहे.
सर्व गोष्टी आपण आउटसोर्स करू नाही शकत, व्यवसायाच्या सुरुवातीला सर्व धुरा आपल्याला संभाळायला यायला हव्यात. नवीन clients मिळवण्यासाठी सेल्स, चांगले employees हेरण्यासाठी ह्यूमन रिसोर्स, बिझनेस मैनेजमेंट ह्या ‘कला’ यायलाच हव्यात. पण तसे होत नाही.
ह्या व्यतिरिक्त अजुनही काही कारणं आहेत – शासकीय योजनांचा उपयोग करून नं घेणे, जागतिक घडामोडीवर लक्ष्य ठेऊन नसणे हे ही तेवढेच महत्वाचे मुद्दे आहेत.
सरकार कदाचित ह्या समस्यांवर मात करण्यासाठी भारतीय तरुणांची मदत करेल. परंतु सरकारच्या मदतीची वाट नं बघता, आपण ह्या समस्या सोडवायला हव्यात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.