' बुलेट प्रूफ जॅकेट्स घालनूही भारतीय जवान मृत्युच्या विळख्यात का अडकतात? वाचा… – InMarathi

बुलेट प्रूफ जॅकेट्स घालनूही भारतीय जवान मृत्युच्या विळख्यात का अडकतात? वाचा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

आपले भारतीय सैनिक हे आपल्या देशाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. हे सैनिक आपले संपूर्ण जीवन आपल्या देशाच्या रक्षणार्थ वाहून टाकतात. त्यांच्यामुळेच आपण आपल्या देशात सुरक्षितपणे जगू शकतो.

भारतीय सैनिक आपण सुरक्षित राहावे, यासाठी आपल्या जवळच्या माणसांपासून दूर राहून भारतमातेचे रक्षण करण्यासाठी सीमेवर उभे असतात. गोठणवणारी थंडी असो किंवा तळपणारा उन्हाळा असो. त्यांना कसलाच फरक पडत नाही. आपल्या कर्तव्यासमोर ते कोणाचेच ऐकत नाही आणि कोणालाही जुमानत नाहीत.

 

Indian army's Bulletproof Jacket.Inmarathi
yourstory.com

नेहमी तत्पर असणारे, डोळ्यांमध्ये तेल घालून भारतीय सीमेचे रक्षण करणारे, शत्रूला सळो की पळो करून सोडणारे भारतीय  सैनिक हे देशाचे भूषण आहेत. त्यांना आमचा आदराचा सलाम.

आता सैनिकांना पहिल्यापेक्षा वेगळी आणि मॉडर्न हत्यारे देण्यात येतात. बंदुका असो किंवा मग बॉम्ब असो, हे नवीन अपग्रेडेड शस्त्र त्यांना देण्यात आलेले आहेत. आजकाल सैनिकांना बुलेटप्रूफ जॅकेट देखील दिले जाते, जेणेकरून ते जॅकेट त्यांचे काही प्रमाणात रक्षण करू शकेल.

 

indian_army bulletproof jackets InMarathi

 

पण तुम्हाला हे माहित आहे का, कधी कधी हे जॅकेट घातलेले असून देखील सैनिकांना गोळी लागून ते शहीद होतात. मग असे का होते?

बुलेटप्रूफ जॅकेट घातल्यावर तर त्यांना गोळी लागूच शकत नाही. पण यामागे देखील एक कारण आहे, तेच आज आपण जाणून घेऊया.

क्वोरावर देण्यात आलेल्या उत्तरांनुसार, सध्या भारत लष्करी आणि अर्धसैनिक बलांना ही बुलेटप्रूफ जॅकेट देण्यात येतात. लष्कर, बीएसएफ, सीआरपीएफ आणि पोलीस या आपल्या जवानांकडून वापरण्यात येणाऱ्या जॅकेटचे वजन जवळपास १५ ते १८ किलो एवढे असते.

यामध्ये फक्त लोखंड आणि स्टीलच्या एकत्रित केलेल्या प्लेट्स काही अंतरांवर बिस्किटाच्या स्वरूपामध्ये मांडलेल्या असतात.

 

Indian army's Bulletproof Jacket.Inmarathi1
ytimg.com

त्यामुळे कधी कधी गोळी त्यावर आदळून सैनिकाची हनुवटी, हात आणि पायाकडे वळण्याची शक्यता खूप जास्त असते. कधी – कधी बुलेट्स जॅकेटवर आदळून जोरात आघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचा परिणाम सैनिकाच्या शरीरावर होतो.

असे दहा ते पंधरा सेकंदामध्ये खूप वेळा होते आणि त्याचा सैनिकाच्या शरीरावर आघात होतो. सैनिक हा यादरम्यान देखील शत्रूवर काउंटर अटॅक करत असतो, त्यामुळे त्याच्या शरीरावर याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो आणि हेच त्याच्या मृत्यूचे कारण देखील ठरू शकते.

indian_army bulletproof jackets 2 InMarathi

 

तसेच, बुलेटप्रूफ जॅकेट हे केवळ समोरून गोळ्या झाडणाऱ्या बंदुकीच्या काही फेऱ्यांसाठी आणि काही अंतरासाठीच प्रभावी असते.

हे जॅकेट शरीरावर मारल्या गेलेल्या गोळ्यांना अडवू शकते पण त्याचा हा अर्थ होत नाही की, त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होत नाही.

 

Indian army's Bulletproof Jacket.Inmarathi2
allindiaroundup.com

तसेच, हे बुलेटप्रूफ जॅकेट फक्त आपल्या धडाच्या भागाचे संरक्षण करते. जर तुमच्या पायाला गोळी लागली तरीदेखील तुम्ही मरू शकता. असे कितीतरी शरीराचे भाग रिकामे असतात, जिथे शत्रू गोळी मारू शकतो.

 

indian_army bulletproof jackets 1 InMarathi

 

तसेच, या बुलेटप्रूफ जॅकेटच्या प्लेट्समध्ये असलेल्या अंतरामध्ये जर गोळी लागली, तरीदेखील इजा होऊ शकते. एवढेच नाही तर, शत्रूने सैनिकांवर ग्रेनेडने हल्ला केल्यास या बुलेटप्रूफ जॅकेटचा काहीही उपयोग होत नाही.

या सर्व कारणांमुळे कधी – कधी बुलेटप्रूफ जॅकेट घातलेलं असूनही सैनिकांना काउंटर अटॅक करतेवेळी मरण पत्कराव लागत आणि त्यावेळी ह्या बुलेटप्रूफ जॅकेटचा काहीही उपयोग होत नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?