' रेल्वे मंत्र्यांचा दणका – तब्ब्ल १३,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकणार! – InMarathi

रेल्वे मंत्र्यांचा दणका – तब्ब्ल १३,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकणार!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

भारतीय रेल्वे ही जगत सर्वात जास्त रोजगार निर्माण करणारी संस्था असल्याचे आपण ऐकले असेल. भारतात राहणाऱ्या हजारो लोकांचे रोजगाराचे साधन भारतीय रेल्वे आहे. याच रेल्वेने रेल्वे कर्मचाऱ्यासंबंधित आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने तब्बल १३ हजाराहून जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हे कर्मचारी ग्रुप सी आणि डी चे आहेत.

 

http://indianexpress.com
indianexpress.com

पण एवढ्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचे कारण काय? असं काय केलंय त्यांनी?

तर तुम्हाला एकूण आनंद होईल की, हे ते कर्मचारी आहेत जे नेहमी आपल्या कामावरून गैरहजर असतात. जे नेहमी मोठ्या सुट्ट्या घेतात. त्याही अश्या सुट्ट्या ज्या रेल्वे नियमांनुसार नसतात. आता रेल्वेने ह्या सर्व कर्मचार्यांबाबत कडक कारवाई करण्याचा निश्चय केला आहे. अश्या कामचुकार सरकारी कर्मचाऱ्यांना आता सरकार धडा शिकविणार आहे.

 

Piyush Goel-inmarathi
livemint.com

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आपल्या उच्च अधिकाऱ्यांना सांगितले होते की, अश्या कर्मचाऱ्यांना शोधून काढण्याचे व्यवस्थापन करा. त्यानंतर रेल्वेच्या वेगवेगळ्या विभागांतून अश्या कर्मचाऱ्यांना शोधून, त्यांचा त्यांच्या पदावरून हकालपट्टी करा.

रेल्वेने कडून देण्यात आलेल्या एका विधानात सांगितले गेले आहे की,

ह्यासंबंधी एक अभियान चालविण्यात आले होते, ज्याद्वारे अश्या कामचुकार कर्मचाऱ्यांना शोधून काढण्यात आले आहेत. ह्यांची संख्या १३ हजाराहून जास्त आहे. हे ते कर्मचारी आहेत जे नेहेमी आपल्या ड्युटीवरुन गैरहजर असल्याचे दिसून आले. आता ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

 

railways-inmarathi
indianexpress.com

भारतीय रेल्वे आणि भारतीय रेल्वे मंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय कठोर असला तरी तो महत्वाचा आहे आणि ह्यासाठी भारतीय रेल्वेचे कौतुकच करायला हवे. कदाचित रेल्वेने घेतलेल्या ह्या निर्णयाचा सर्वच सरकारी कर्मचारी धसका घेतील आणि आपली ड्युटी निभावतील…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?