Site icon InMarathi

मुघलकालीन शिल्पांच्या कौतुकात दुर्लक्षित राहिलेल्या या अस्सल भारतीय कलाकृती पाहून डोळे दिपतील

hampi temple inamarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारत विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या भारतात जगभरातून दरवर्षी लाखो पर्यटक येथील जनजीवन आणि प्राचीन संस्कृती पाहायला येतात.

भारताला इतिहासाचा मोठा वारसा लाभलेला आहे आणि तो आजही भारतीय लोकांनी जपून ठेवलेला आहे. हा इतिहासाचा वारसा म्हणजेच आपल्या भारतात असलेली भव्य प्राचीन ठिकाणे.

भारतामध्ये असे खूप राजे होऊन गेले ज्यांनी कलेला महत्त्व दिले आणि ती जोपासण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न देखील केले. जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आपल्या भारतात देखील आहे, ते म्हणजे आग्राचा ताजमहल.

 

 

ताजमहालाचे स्ट्रक्चर खूपच थक्क करणारे आहे. त्याच्याकडे पाहिल्यावर इतिहासाच्या कुपीत ठेवलेला घटनाक्रम चटकन डोळ्यासमोरून जातो.

ताजमहलसारखेच भारतात इतर काही प्राचीन ठिकाणे देखील आहेत, ज्यांची स्थापत्यरचना आपल्याला थक्क करणारी आहे.

अश्याच काही ठिकांणांची आपण माहिती घेऊया. यामध्ये पहिले येते ते नालंदा विश्वविद्यालय.

नालंदा विश्वविद्यालय 

जगातील सर्वात जुन्या विश्व विद्यालयांपैकी एक होते, नालंदा विश्वविद्यालय. हे बिहारच्या नालंदा जिल्ह्यामध्ये स्थित होते.

या विद्यालयात जगभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असत. पण आता फक्त त्याचे अवशेषच आपल्याला पाहायला मिळतात.

पटनापासून जवळपास ८८ किलोमीटर दूर दक्षिण पूर्वेला आणि बिहारपासून जवळपास ११.५ किलोमीटर दूर उत्तरेला एका गावाजवळ इतिहासातील प्रसिद्ध प्राचीन बौद्ध विश्व विद्यालय नालंदाचे भग्न अवशेष आहेत.

 

culturalindia.net

 

सातव्या शताब्दीमध्ये भारत भ्रमणासाठी आलेल्या एका चिनी पर्यटकाने लिहिलेल्या अभिलेखातून या विश्व विद्यालयाबद्दल माहिती मिळते. या विश्व विद्यालयामध्ये जवळपास १०००० विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी २००० शिक्षक होते.

नालंदा हा शब्द संस्कृत शब्द नालम आणि दा पासून बनलेला आहे. संस्कृतमध्ये नालमचा अर्थ कमळ  होतो आणि कमळ हे ज्ञानाचे प्रतीक आहे.

महायान राजाकडून येथे महाविहाराची स्थापना झाली त्यानंतर याचे नाव नालंदा महाविहार ठेवण्यात आले.

अलेक्जेंडर कनिंघमद्वारे शोधण्यात आलेल्या या महान बौद्ध विश्व विद्यालयामधून प्राचीन वैभवाचा मोठ्या प्रमाणावर अंदाज लावण्यात येतो.

 

getsholidays.com

 

नालंदा विश्व विद्यालयामध्ये एक खूप मोठी लायब्ररी होती. या लायब्ररीमध्ये जवळपास तीन लाखांपेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह होता. या लायब्ररीमध्ये सर्व प्रकारच्या विषयांच्या पुस्तकांचा संग्रह होता.

हे ‘रत्नरंजक’ ‘रत्नोदधि’ ‘रत्नसागर’ नावाच्या तीन विशाल भवनांच्यामध्ये स्थित होते. यातील कितीतरी पुस्तकांच्या प्रतिलिपी चिनी यात्री आपल्याबरोबर घेऊन गेले.

या विश्व विद्यालयामध्ये भारतातीलच नाही तर कोरिया, जपान, चीन, तिब्बेट, इंडोनेशिया, तुर्की अशा देशांमधून विद्यार्थी येथे बौद्ध धर्माची शिकवण घेण्यासाठी येत असत.

जगातील हे एक सर्वात मोठे विद्यालय होते आणि येथे खूप ज्ञानी शिक्षक देखील आहेत. पण या नालंदा विद्यालयाला बख्तियार खिलजीने उध्वस्त केले होते.

 

aniccasight.blogspot.in

 

बख्तियार खिलजी एक तुर्क लुटेरा होता. तो थोडा वेडा आणि गर्विष्ठ होता. एकदा आजारी पडल्यावर त्याला नालंदाच्या वैद्याने बरे केले. पण त्याला ते पटले नाही. हिंदू आपल्यापेक्षा जास्त हुशार कसे, या विचाराने तो संतापला.

त्याने नालंदा विश्व विद्यालयाला उध्वस्त करण्याचे ठरवले. त्याने नालंदाला आग लावली आणि या आगीमध्ये सर्व विद्यालय जाळून खाक झाले.

अजिंठा आणि वेरूळ लेणी 

महाराष्ट्रात असलेली प्राचीन अजिंठा आणि वेरूळची लेणी ही वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात तयार केलेली आहेत. ह्या लेण्या त्यांच्यातील स्थापत्यकला, शिल्पकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत.

अजिंठा येथे २९ लेणी आहेत. ही सर्व लेणी वाघूर नदीच्या आसपास विखुरलेली आहेत. या लेणी नदीच्या पात्रामध्ये १५ ते ३० मीटर म्हणजेच जवळपास ४० ते १०० फूट उंचीवर कातळात आहेत.

 

imimg.com

 

महाराष्ट्रातील मराठवाडा भागात औरंगाबाद शहरापासून जवळपास ३० किलोमीटर अंतरावर वेरूळ हे एक छोटे खेडेगाव आहे. येथे प्राचीन काळात कोरलेली १२ बौद्ध, १७ हिंदू आणि ५ जैन अशी एकूण ३४ लेणी आहेत.

शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचे मूळ गाव वेरूळ हेच आहे.

वेरूळची लेणी साधारणत: इसवीसनच्या पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरण्यात आली असून प्राचीन भारतातील बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मामधील परस्पर सहिष्णुता या लेणी दाखवतात.

वेरूळच्या लेण्यांची हिंदू लेणी, बौद्ध लेणी आणि जैन लेणी अशी विभागणी करण्यात आलेली आहे.

 

loupiote.com

 

वेरूळ लेण्यांपासून जवळच हे मंदिर आहे. भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे एक आहे.

इलागंगा नदीच्या तीरावर वेरूळ गावाजवळ हे मंदिर आहे. हे मंदिर दक्षिणाभिमुख असून जांभ्या दगडाचे आहे. इलागंगा नदीच्या तीरावर वेरूळ गावाजवळ हे मंदिर आहे.

हे मंदिर दक्षिणाभिमुख असून जांभ्या दगडाचे आहे.मंदिराच्या छतावर पशु-पक्षी, नर्तक,धनुर्धारी शिकारी इ. चित्रे आहेत.

प्राचीन भारतीय स्थापत्यकलेच्या वैभवाची कथा सांगणारी अजिंठा आणि वेरूळ ही सर्वांगसुंदर शिल्पे आजही भारतातीलच नव्हे तर परदेशातील पर्यटकांनाही भुरळ घालत आहेत.

हंपी विजयनगर 

हंपी हे मध्ययुगीन हिंदू राज्य विजयनगर साम्राज्याची राजधानी होती.

हंपीमध्ये विठाला मंदिर परिसर सर्वात सुंदर स्मारकांपैकी एका आहे. याच्या मुख्य हॉलमध्ये लावण्यात आलेल्या ५६ स्तंभावर थाप मारल्यावर त्यातून संगीताच्या काही लहरी बाहेर पडतात.

या हॉलच्या पूर्व भागामध्ये प्रसिद्ध शिला – रथ आहे, जो दगडाच्या चाकांनी चालतो.

 

sankarayatra.com

 

हंपीमध्ये असे अनेक आश्चर्य आहेत. जसे, येथील राजांना धान्य, सोने आणि रुपयांमध्ये तोलले जात असे आणि त्याला गरीबांमध्ये वाटले जात असे.

येथे राण्यांसाठी एक स्नानघर, तसेच कमळाच्या आकाराचे फव्वारे सुसज्जित होते. या व्यतिरिक्त कमल महाल आणि जनानखाना देखील अशाच आश्चर्यांचा एक भाग आहे.

एक सुंदर दोन मजली ठिकाण आहे, ज्याचे रस्ते वेगळ्याच भौगोलिक रचनेने बनवण्यात आलेले आहेत आणि ऊन आणि हवा घेण्यासाठी एखाद्या फुलांच्या पानांसारखे बनवण्यात आलेले आहे.

 

amazonaws.com

 

येथे हत्ती खाणेचे प्रवेशद्वार आणि घुमट कमानी बनलेले आहे आणि शहराच्या शाही प्रवेशद्वारावर हजारा राम मंदिर बनलेले आहे. येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येत तीर्थ यात्री येतात.

हंपीचे पूर्ण विशाल परिसर गोल खडकांनी आणि टेकड्यांनी भरलेला आहे, या टेकड्यांमध्ये पाचशेपेक्षा जास्त स्मारके आहेत. हंपीमध्ये मंदिर, महाल, तळघर, पाणी साठवण, जुना बाजार इत्यादी आहेत.

भारताच्या इतिहासावर, प्रामुख्याने मध्ययुगीन इतिहासावर मुस्लिम आक्रमकांच्या स्थापत्यकलेचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख नेहमी होणे ही स्वाभाविक गोष्ट झाली. ती स्मारकेही आपल्या सर्वांची सामाजिक संचिते आहेत.

पण त्यांच्या कौतुकात पूर्णतः दुर्लक्षित राहिलेली अस्सल भारतीय स्थापत्यशास्त्राची प्रचीती देणारी नालंदा आणि अजिंठ्यासारखी अनेक स्थळे प्रकाशाच्या झोतात येणे गरजेचे आहे. 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version