Site icon InMarathi

“यात्रीगण कृपया ध्यान दे…”, रेल्वे platform वर ऐकू येणारा हा आवाज कुणाचा आहे?

platform InMarathi feature

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

लहानपणी ‘झुक झुक अगीनगाडी’ हे गाणं गाताना आणि ऐकताना खूप आनंद वाटत असे. त्या गाडीत बसल्यावर किती मज्जा येईल याची कल्पना करूनच अंगावर रोमांच उमटत. अशी ही रेल्वे मोठे झाल्यावर मात्र आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनते.

कोणत्याही ठिकाणी प्रवास करायचा झाल्यास, पहिल्यांदा रेल्वेचाच विचार मनामध्ये येतो.

रेल्वे ही जनसामन्यांसाठी बीएमडब्लू किंवा मर्सिडीजचं आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

कमी खर्चामध्ये आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी योग्य वेळेमध्ये पोहचवण्याचे काम रेल्वे करते. रेल्वेचा प्रवास हा कधीही न विसरता येण्यासारखा असतो.

 

dailyhunt.in

रेल्वे ही गतिमान प्रवासाचे साधन म्हणून ओळखली जाते. औद्योगिक क्रांतीमध्ये रेल्वेचा प्रमुख वाटा आहे.

आताच्या फास्ट जगात आरामदायक तसेच जलद प्रवासाचे साधन म्हणून जवळपास सगळेच लोक रेल्वेला पसंती देतात.

आपण नेहेमी रेल्वेने प्रवास करत असतो. रेल्वे स्टेशनवर उभे असताना आपली गाडी कधी येणार हे भलेही त्या इंडिकेटर वर लागलेलं असेल तरी आपला पूर्ण विश्वास असतो तो स्टेशनवर होणाऱ्या अनांउसमेंटवर.

कोरोनामुळे ओढवलेली लॉकडाऊनची स्थिती अजूनही पूर्व  पदावर आलेली नाही. गजबजलेलं रेल्वेस्टेशन, मोठ्या दिमाखात धावणारी मुंबईची लाईफलाईन, म्हणजेच मुंबई लोकल सध्या यार्डात उभी आहे.

 

financialexpress.com

‘यात्री गण कृपया ध्यान दे…’ जेव्हा हा आवाज कानी पडतो तेव्हा आपल्या सर्वाचे लक्ष त्या घोषणेकडे जाते. संपूर्ण प्रवासादरम्यान आपण तो आवाज ऐकत असतो. सध्या हाच आवाज आपण सगळेजण फार मिस करतोय…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

पण कधी विचार केला आहे, की ह्या घोषणेची सुरवात कुठून झाली असेल? कोणी दिली असेल पहिली अनांउसमेंट!!!

 

jagran.com

 

रेल्वे स्टेशनवर होणाऱ्या त्या अनांउसमेंटचा आवाज आहे सरला चौधरी ह्या महिलेचा..  ह्याच आहेत त्या ज्यांचा आवाज आपल्याला रेल्वे स्टेशनवर होणाऱ्या अनांउसमेंटमध्ये ऐकायला येतो.

 

pixabay.com

सरला चौधरी ह्या मागील २० वर्षांहून अधिक काळापासून रेल्वेत अनांउसर म्हणून कार्यरत आहेत. १९८२ साली सरला ह्यांनी रेल्वेत अनांउसर ह्या पदासाठी टेस्ट दिली होती. ही टेस्ट पास केल्यानंतर सरला ह्यांना रेल्वेत दैनिक वेतनावर अनांउसर म्हणून नोकरी मिळाली.

सरला यांना त्यांच्या कामाप्रती प्रामाणिकपणा आणि त्यांची मेहनत बघून १९८६ साली रेल्वेत अनांउसर ह्या पोस्ट वर त्यांना कायमस्वरूपी नियुक्ती मिळाली.

सरला ह्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की,

“त्या काळी कॉम्प्युटर नव्हते, त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या स्टेशन्सवर जाऊन अनांउसमेंट करावी लागयची. एक अनांउसमेंट रेकॉर्ड करण्यासाठी ३-४ दिवसांचा वेळ लागायचा. एवढंच नाही तर ही रेकॉर्डिंग वेगवेगळ्या भाषेत करावी लागायची.”

 

khaleejtimes.com

 

त्यानंतर काही काळाने रेल्वे स्टेशनवर होणाऱ्या सर्व अनांउसमेंटची जबाबदारी ट्रेन मॅनेजमेंट सिस्टीमला सोपविण्यात आली. त्यासोबतच स्टॅण्डबाय वर सरला यांचा आवाज मॅनेजमेंट विभागाने कंट्रोल रूममध्ये सेव्ह करून ठेवला.

१२ वर्षांआधी काही खाजगी कारणांनी सरला ह्यांनी सेवानिवृत्ती घेतली. आणि आता त्या OHE विभागात कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

सरला चौधरी सांगतात की, लोक त्यांना न बघता त्यांच्या आवाजाला एवढं महत्व देतात. हे बघून त्यांना खूप आनंद होतो. आजही रेल्वे स्टेशनवर स्वतःचा आवाज ऐकून त्यांना खूप आनंद होतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version