Site icon InMarathi

Samsung देणार Apple ला ५४ कोटी ८० लाख डॉलर्सचा दंड!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

२०११ पासून Samsung आणि Apple मध्ये चालू असलेला patents चा न्यायालयीन लढा आता अंतिम टप्प्यात आलाय.

Image source: REUTERS/Dado Ruvic

२०११ मध्ये Apple ने Samsung विरुद्ध designs आणि patents चे उल्लंघन करण्याची case दाखल केली होती. Samsung ने Apple च्या phones च्या software designs सारखेच Samsung च्या phones मध्ये designs वापरायला सुरुवात केली होती आणि तेंव्हापासून या दोन्ही कंपनी मध्ये कोर्टात वाद चालू होते. या सगळ्या प्रकरणात कोर्टाने Samsung ला दोषी ठरवले असून त्यांना आता Apple ला $५४८ million dollars एवढा fine द्यायचा आहे.

Apple ने कोर्टात Samsung कडून ९३० million dollars ची मागणी केली होती. पण कोर्टाने ती रक्कम मे महिन्यात कमी करून, ५४८ million dollars इतका दंड Samsung ला ठोठावला होता. ही रक्कम रुपयांमध्ये होते – ३५ अब्ज ६२ कोटी रुपये! San Jose मधील Federal court मध्ये file केलेल्या papers नुसार Samsung ही रक्कम १४ डिसेंबर पर्यंत Apple ला देण्याची शक्यता आहे. परंतु Samsung नी म्हटलंय की Apple आधी दंडाच्या रकमेची invoice पाठवेल आणि मगच ही रक्कम ते त्यांना देतील. या सगळ्यावर Apple कडून काही comments आलेल्या नाहीत.

मोठ्ठ्या कंपनीज, मोठ्ठी भांडणं, मोठ्ठे आकडे !

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version