Site icon InMarathi

जगातल्या अनेक खतरनाक षडयंत्राची सुपारी घेणारा जॅकाल, वाचा त्याची कहाणी!

carlos_jackal feature inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कधीही कोणताही गुन्हेगार हा कायद्याच्या कचाट्यातून वाचणे शक्य नसते. कधी ना कधी त्याला पकडलेच जाते.

प्रत्येक गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्यांप्रमाणे शिक्षा देण्यात येते. जेवढा गुन्हा मोठा तेवढीच त्याची शिक्षा देखील मोठी असते.

फाशीनंतर कोणती सर्वात मोठी शिक्षा असेल, तर आजीवन कारावास ही आहे. प्रत्येक गुन्हेगाराला त्याच्या जीवनामध्ये फक्त एकदाच आजीवन कारावासाची शिक्षा होते.

पण आज आम्ही तुम्हाला अशा एका गुन्हेगाराबद्दल सांगणार आहोत. ज्याला त्याच्या जीवनामध्ये एकदा नाही, तर दोनदा आजीवन कारावासाची शिक्षा भोगावी लागली आहे. या गुन्हेगाराचे नाव कार्लोस द जॅकल हे आहे.

 

 

कार्लोस द जॅकल हा कदाचित जगातील सर्वात खतरनाक समजला जाणारा गुन्हेगार, ओसामा बिन लादेनपेक्षा देखील खतरनाक होता. त्याने खूप मोठमोठे गुन्हे केले होते.

लॅटिन अमेरिकेच्या व्हेनेझुएलामध्ये जन्मलेल्या कार्लोसचे खरे नाव इलिच रेमीरेज सांचेज आहे. कार्लोसचा जन्म १२ ऑक्टोबर १९४९ मध्ये झाला. १९७० आणि १९८० च्या दशकामध्ये याला सर्वात खतरनाक अतिरेकी समजले जात होते.

त्याचे भय एवढे होते की, फ्रान्सने त्याला आतंकवादी घोषित केले होते आणि पोलिसांनी संपूर्ण ताकद त्याला शोधण्यामध्ये लावली होती.

हे ही वाचा या निरागस चेहऱ्याने कित्येक महिलांना ज्या यातना दिल्यात त्या बघून अंगावर काटा येतो!

कार्लोस द जॅकल हा वयाच्या फक्त २४ व्या वर्षी  ‘पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन’ मध्ये सहभागी झाला होता आणि अतिरेक्यांच्याकडे क्रांतिकारी प्रशिक्षण घेऊ लागला.

 

 

काही वर्षांनंतर त्याने सर्वात पहिला मोठा हल्ला केला. कार्लोस द जॅकलने मार्क्स अँड स्पेन्सर्सचे तत्कालीन अध्यक्ष जोसेफ एडवर्ड सेफवर कंपनीच्या लंडन येथील स्टोरमध्ये हल्ला केला होता.

त्याने सेफच्या डोक्यामध्ये गोळी मारली होती. पण त्यांचे नशीब चांगले होते म्हणून ते कसेतरी त्यामधून वाचले. सेफ हे यहुदी होते आणि एक प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जात असत.

 

 

कार्लोसला १९९४ मध्ये सूडानमध्ये अटक करून फ्रान्सला घेऊन जाण्यात आले. त्यावेळी कार्लोस द जॅकलला आजीवन कारावासाची शिक्षा दोनदा देण्यात आली. म्हणजेच नियमांनुसार कार्लोसला जीवनभर कारागृहातच रहावे लागणार ते देखील एकदा नाही तर दोनदा.

त्याला ही शिक्षा पॅलेस्टाईन आणि कम्युनिस्ट क्रांतीच्या नावावर कितीतरी खून करण्याच्या आरोपाखाली देण्यात आली होती.

ओपेक तेल मंत्र्यांचे अपहरण

कार्लोस आपल्या गुन्ह्यांमुळे सगळीकडेच चर्चेत होता. सत्तरच्या दशकामध्ये जेवढे मोठे अतिरेकी हल्ले झाले त्या सगळ्यांत त्याचे नाव येई.

मग त्यामध्ये म्यूनिकमधील इस्रायली खेळाडूंच्या हत्या असो वा पॅरिसमधील दक्षिणात्य वर्तमानपत्रांच्या कार्यालयावर आणि रेडिओ स्टेशनवर हल्ला असो, किंवा हेगमध्ये फ्रेंच दूतावासावर हल्ला करून ते काबीज करणे असो.

अशाप्रकारच्या सर्व घटनांमध्ये कार्लोसचा हात असल्याचे म्हटले जात आहे. पण जेव्हा कार्लोसने व्हिएनामध्ये तेलाचे उत्पादन करणाऱ्या देशांच्या मंत्रांचे अपहरण केले, तेव्हा त्याचे नाव जगभरात गाजले.

 

 

कार्लोसला पहिल्यांदा दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर २०११ मध्ये देखील कार्लोसला दोषी ठरवण्यात आले होते.

पॅरिस आणि फ्रान्सचे दुसरे शहर टुलुजमध्ये १९८२ च्या बॉम्ब हल्ल्यामध्ये पाच लोक मारले गेले होते आणि २८ लोक जखमी झाले होते. या घटनेमध्ये देखील कार्लोस द जॅकलचे नाव जोडलेले होते.

याव्यतिरिक्त १९८३ मध्ये मार्स आणि पॅरिसच्या दरम्यान एका रेल्वेमध्ये बॉम्ब स्फोट झाला होता. यामध्ये तीन लोक मारले गेले होते आणि १३ लोक जखमी झाले होते.

हे ही वाचा महाराष्ट्राला हादरवून सोडणारा हा खटला आजही अनेकांची झोप उडवतो!

तसेच, मार्शल स्टेशनवर झालेल्या बॉम्ब स्फोटामध्ये देखील दोन लोकांचा जीव गेला होता. या घटनांमध्ये देखील कार्लोसचाच हात होता, असे समजले होते.

 

 

१९७४ मध्ये फ्रान्सच्या राजधानीमध्ये स्थित एका शॉपिंग सेंटरवर त्याने ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये दोन लोक मारले गेले होते आणि इतर ३४ लोक जखमी झाले होते.

स्वतःला ‘पेशेवर क्रांतिकारी’ सांगणाऱ्या कार्लोसला अजून अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी ठरवले गेले.

 

 

पॅरिस आणि मार्समध्ये १९८२ आणि १९८३ मध्ये चार बॉम्ब हल्ले झाले होते आणि यामध्ये कार्लोस दोषी असल्याचे समोर आले होते. या हल्ल्यांमध्ये ११ लोक मारले गेले होते आणि १५० लोक जखमी झाले होते.

कार्लोस द जॅकल हा अट्टल गुन्हेगार आहे, त्याने आपल्या जीवनात खूप भयानक कृत्य केली आहेत. त्याच्या या कृत्यांमुळे त्याला एकदा नव्हे तर दोनदा जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

===

हे ही वाचाभारतीय पोलिसांच्या असामान्य बहादुरीच्या या कथा वाचून त्यांचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version