Site icon InMarathi

या “हुकुमशहाने” स्वतःच्या देशात चक्क लोकशाही आणली आणि देशाचा चेहराच पालटून टाकला!

kemal-pasha-inmarathi

golosarmenii.am

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

ॲडॉल्फ हिटलर हा जर्मनी देशाचा जर्मन हुकूमशहा होता. नाझी पक्षाच्या या नेत्याचे नाव त्याच्या क्रूरपणा व ज्यूंच्या कत्तलीकरता कुप्रसिद्ध आहे. तो नाझी जर्मनीचा प्रमुख होता. दुसरे महायुद्ध सुरू होण्यामागे असलेल्या प्रमुख कारणांत हिटलरची गणना होते.

पण इतिहासामध्ये एकमात्र हिटलरच हुकूमशहा नव्हता. आपल्याला इतिहासामध्ये हुकुमशाह म्हटलं की फक्त हिटलरबद्दलच माहिती दिली जाते.

 

medium.com

हिटलर सोबतच अजूनही कितीतरी हुकूमशहा  होऊन गेले आणि अजून देखील आहेत. उत्तर कोरियाचा किम जोँग-अन हा देखील एक हुकूमशहाच आहे. पण इतिहासातील सर्वच हुकूमशहा हे हिटलरसारखे क्रूर नव्हते.

काही हुकूमशहा असे देखील होते, ज्यांनी आपल्या प्रयत्नांनी आपल्या देशाचा विकास घडवून आणला आणि देशाचे रूप पूर्णपणे पालटले.

आज आपण अशाच एका हुकूमशहाबद्दल आणि त्याच्या प्रयत्नांबद्दल जाणून घेणार आहोत. त्याने आपल्या प्रयत्नाने देशामध्ये काही चांगले बदल घडवून आणले.

तुर्कस्तान म्हणजेच तुर्की हा मध्यपूर्वेतील एक मोठा देश आहे. हा देश दोन खंडामध्ये विस्तारित झालेला आहे. तुर्कीच्या राजधानीचे नाव अंकारा आहे. इस्तम्बूल हे तुर्कीमधील सर्वात मोठे शहर आहे. तुर्कीमध्ये खूप शासक शासन करून गेले.

पण तुर्कीच्या इतिहासामध्ये देखील असा एक हुकूमशहा होता, ज्याने या तुर्कीचे रूप पालटले होते. या हुकूमशहाचे नाव होते मुस्तफा केमाल अतातुर्क.

 

editorkafasi.com

मुस्तफा केमाल अतातुर्क याला केमाल पाशा या नावाने देखील ओळखले जात असे. मुस्तफा केमाल अतातुर्कचा जन्म १८ मे १८८१ ला झाला. केमाल पाशा हा ओस्मानी आणि तुर्कस्तानी लष्करातील अधिकारी, लेखक आणि तुर्कस्तानचे पहिला राष्ट्रपती होता.

मुस्तफा केमाल अतातुर्क हा जरी हुकुमशहा असला, तरीदेखील त्याचे धोरण लोकशाही, राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षतेवर आधारलेले होते.

मुस्तफाला कट्टर आणि धार्मिक मुस्लिम इस्लामचा शत्रू समजत होते. पण यामध्ये काहीच वाद नाही की, जगामध्ये तुर्कीचे आज जे स्थान आहे आणि जो तुर्कीच्या विकास झालेला आहे, तो फक्त आणि फक्त मुस्तफा म्हणजेच केमाल पाशाच्या प्रयत्नांचा परिणाम आहे.

पहिल्या महायुद्धानंतर तुर्क साम्राज्य पडल्यानंतर  मुस्तफाने तुर्कियांसाठी स्वातंत्र्याची लढाई लढली आणि १९२३ मध्ये प्रजासत्ताकाची निर्मिती केली.

 

 

मुस्तफाचे सर्वात मोठे यश हे होते की, त्याने कट्टर इस्लामिक ओट्टोमन साम्राज्याला धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताकामध्ये परिवर्तित केले. त्याने हे सर्व कायद्याच्या चौकटीत राहून आपल्या शक्तिशाली आणि प्रभावी भाषणाने घडवून आणले.

त्याचे मानणे होते की, मॉडर्न युगामध्ये अरबी राजनैतिक प्रणालीचे अनुकरण करणे योग्य नाही. मध्य – पूर्वेऐवजी त्याने पश्चिमी तत्त्वज्ञान, फॅशन आणि शिक्षण यांना तुर्कीमध्ये लागू केले आणि त्याने अरबी लिपीला देखील बंद करून टाकले होते.

 

 

मुस्तफाने हजारो नवीन शाळा बनवल्या, जिथे आधुनिक शिक्षण दिले जात असे. तसेच, त्याने स्त्रियांना सामान अधिकार दिले.

धर्मनिरपेक्षेला वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वी देखील झाला. जर एखादा नागरिक धर्म परिवर्तन करून इच्छित असेल, तर त्याला धर्म बदलण्याची सूट होती. तो त्याच्या इच्छेनुसार इतर धर्माचा स्वीकार करू शकत होता.

मुस्तफा केमाल अतातुर्क याने इस्लामबद्दल असलेला लोकांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकला.

 

 

मुस्तफाने लोकांना संघटित करून लोकशाहीचे महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर त्याने हुकूमशाहीने कशाप्रकारे लोकांचे नुकसान होत आहे आणि ते बदलणे का गरजेचे आहे, हे देखील लोकांना पटवून दिले.

त्याचे भाषण आणि व्यक्तिमत्त्व खूपच प्रभावी होते. त्याच्या याच प्रभावी भाषणामुळे लोकांना त्याचे म्हणणे पटले होते.

मुस्तफाने आपल्या मृत्यूपर्यंत आपल्या देशासाठी आणि आपल्या देशातील लोकांसाठी जेवढे करता येईल, तेवढे कोणताही स्वार्थ न बाळगता केले. मुस्तफा केमाल अतातुर्कचा मृत्यू  १० नोव्हेंबर १९३८ रोजी झाला. त्याने तुर्कस्तानचे आधुनिकीकरण घडवून आणले.

त्याच्या या कार्यामुळे  तुर्कस्तानची जनता प्रेमाने त्याला ‘अतातुर्क’ म्हणजे ‘तुर्कांचा पिता’ संबोधू लागली. तेव्हापासून त्याला मुस्तफा केमाल अतातुर्क असे नाव पडले.

 

 

आज जे तुर्की जगामध्ये मानाने आणि आधुनिकरित्या जगत आहे. ते मुस्तफामुळेच जगत आहे. जर मुस्तफा नसता, जर कदाचित आता तुर्कीमध्ये तेवढा बदल घडून आला नसता आणि तुर्कीच्या विकास झाला नसता.

याच करणामुळे तुर्कीच्या लोकांच्या मनामध्ये मुस्तफाचे एक वेगळे स्थान आहे आणि त्याच्याबद्दल प्रेम व आदर आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version