Site icon InMarathi

या मुस्लिम देशात आजही रामायण, महाभारताची सार्वजनिक सादरीकरणे होतात!

Indonesian-Muslims-use-Hindu-names.Inmarathi1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

इंडोनेशिया हा देश आग्नेय आशिया व ओशनियामधील एक देश आहे. हा देश हिंदी महासागरामध्ये एकूण १७,५०८ बेटांवर वसला आहे. बोर्नियो, जावा, सुमात्रा, सुलावेसी, तिमोर व न्यू गिनी ही येथील प्रमुख बेटे आहेत.

इंडोनेशियाची लोकसंख्या सुमारे २३ कोटी असून जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या ह्याच देशात आहे.

संस्कृतमध्ये या देशाला दीपांतर असे नाव देण्यात आलेले आहे. इंडिया आणि एशिया यांचा संगम येथे होतो, म्हणून याचे नाव इंडोनेशिया असे पडले. इंडोनेशियाला पूर्वी इंडोचायना असे देखील म्हटले जात असे. इंडोनेशियाचे भारताशी खूप जवळचे नाते आहे, कारण इंडोनेशियातील मुस्लिम लोक हिंदू नावे वापरतात.

 

wordpress.com

क्वार्ट्झ या वेबसाईटवर आलेल्या एका लेखानुसार, इंडोनेशियामध्ये जागातील सर्वात जास्त मुस्लिम राहतात. पण येथे रामायण हे जपानी शैलीमध्ये सादर करण्यात येते. एखाद्या संथ चळवळीसारखेच हे चालू आहे. १९६१ पासून आतापर्यंत हे सतत चालू आहे. २०१२ मध्ये गिनीज बुकाने याला जागातील सर्वात जास्त काळ चालणारे स्टेज परफॉर्मन्स म्हणून घोषित केले आहे.

याच रामायण स्टेज शोमध्ये सीतेचे वडील जनक यांचा रोल करणारा सोत्या म्हणाला की,

“आम्ही फक्त मुस्लिम नाही, आम्ही जावाचे लोक आहोत. येथे आम्हाला हिंदू आणि बौद्ध या दोन्ही धर्माच्या कथा देखील शिकवल्या जातात.” सोत्याचे पूर्ण नाव अली नूर सोत्या हे आहे.

 

wikimedia.org

याच रामायणामध्ये माकडांचा योद्धा सुग्रीवचा रोल करणारा २८ वर्षीय दमर कासियादी आपले कॉस्ट्यूम बदलत असताना म्हणाला की,

“जावामध्ये मुस्लिम हे मिश्रित आहे. मुसलमान हे धर्माने मुसलमान आहेत, पण त्यांच्यावर हिंदूंचा आणि हिंदू संस्कृतीचा प्रभाव आहे.”

जावा हे या देशातल्या द्वीप समूहांपैकी एक महत्त्वाचे द्वीपसमूह आहे. या देशाची राजधानी जकार्ता येथे आहे आणि जवळपास ६० टक्के लोकसंख्या येथे राहते. १३ व्या शतकापासून १५ व्या शतकापर्यंत येथे मजापहित हे हिंदू शक्तिशाली साम्राज्य जावा बेटावर विकसित झाले. याच साम्राज्याचे प्रभाव येथील भाषा, संस्कृती आणि भूदृश्यावर पडला आणि हा पडलेला प्रभाव आजही तसाच टिकून आहे.

 

nusantara.news

भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्या सन्मानार्थ येथे बांधण्यात बांधण्यात आलेली मंदिरे आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतात. यांच्या भाषेमध्ये संस्कृतमधील शब्द आपल्याला पाहायला मिळतात आणि महाभारत आणि रामायण यांच्यामध्ये आलेल्या नावांची दुकाने आपल्याला याच्या शहरांमध्ये पाहायला मिळतात.

पण आजही इंडोनेशियामध्ये २ टक्क्यांपेक्षा कमी हिंदू लोकसंख्या आहे.

इंडोनेशिया हे देश अधिकृतपणे सहा धर्मांसाठी ओळखला जातो. त्यातीलच एक हिंदू धर्म हा आहे. ही यादी १९६२ मध्ये बनवली गेली होती आणि यांचे बहुतांश अनुयायी हे बाली, जावा आणि लोम्बोक येथे स्थित आहेत. १९६४ पासून ‘द परिषदा हिंदू धर्म, इंडोनेशिया’ ही एक धार्मिक संघटना असून ते हिंदू प्रथा कायम राखण्यासाठी आणि इतरत्र हिंदूंबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी काम करत आहेत.

 

bstatic.com

बाली हे हिंदू इंडोनेशियाचे केंद्रबिंदू आहे, तर जावामध्ये अनेक हिंदू आणि बौद्ध धर्माची मंदिरे आहेत. ज्यामध्ये बोरोबुदूर या जगातील सर्वात मोठ्या बौद्ध मंदिराचा समावेश आहे. या ठिकाणी देखील काही हिंदू धर्मातील नियम पाळले जातात, पवित्र महिन्यामध्ये येथे उपवास केले जातात आणि प्रार्थना देखील केली जाते. तेथील एकाने सांगितले की, “आमच्यासाठी आमचा धर्म आणि आमची संस्कृती हे दोन्ही वेगवेगळे आहेत.”

त्याने पुढे सांगितले की,

“येथील एका स्थानिक संग्रहालयाजवळील एका वर्क स्टेशनमध्ये राम, शिंता (सीता) आणि गोटोकाका (घटोत्कच)  यांचे म्हशीच्या कातड्यापासूचन तयार केलेले पुतळे आहेत. हे गाईच्या कातड्यापासून तयार केलेले नाहीत, कारण आम्ही हिंदूंचा आदर करतो आणि त्यांच्यासाठी गाय हा एक पवित्र प्राणी आहे.”

 

tripadvisor.com

इंडोनेशियामध्ये तुम्हाला खूप अशी नावे ऐकायला मिळतील, जी ऐकण्यासाठी खूप विचित्र असतील. त्यातीलच एक उदाहरण सोत्याचे आहे. तसेच, श्री मुल्यानी इंद्रावती ही इंडोनेशियाची अर्थमंत्री आणि जागतिक बँकेची माजी संचालक होती. त्याचबरोबर जनरल गटोट नूरमान्त्यो (घटोत्कच) आर्मी फोर्सचे माजी कमांडर.

या इतिहासामुळेच आज इंडोनेशियामध्ये आपल्याला हिंदूंचा प्रभाव असलेली माणसे मिळतात आणि त्यांची नावे देखील हिंदू धर्माशी निगडित असतात. सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असूनही हिंदू संस्कृती जपणारा इंडोनेशिया हा एकमेव देश आहे.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version