Site icon InMarathi

ATM च्या रांगेत उभे असताना तुम्ही देखील अशी “विचित्र” माणसं पाहिली आहेत का?

atm featured inmarathi

indianexpress,com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एक वेळ अशी होती जेव्हा लोकांना पैसे काढण्यासाठी बँकेत लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत होते, पण त्यानंतर आले एटीएम… या मशीनने माणसांना कधीही कुठेही पैसे काढण्याची मुभा दिली.

माणसांच्या सोयीकरिता स्कॉटलंडच्या जॉन शेफर्ड बॅरन यांनी ATM मशीनचा शोध लावला होता.

 एटीएम मशीनचा शोध कोणी लावला होता माहिती आहे? जाणून घ्या 

पण ह्या ATM मशीनने लोकांना देखील बदलले. आता भलेही लोकांना बँकेसमोर रांग लावण्याची गरज पडत नसली तरी ATM मध्ये जात असताना काही लोक असे असतात ज्यांना बघून ती बँकेची रांगच बरी होती असं वाटायला लागते…

१. सर्वात आधी येतात ते लोक जे ATM मध्ये निव्वळ AC ची हवा खायला येत असतात. म्हणजे यांना वेळेचे काहीही भान नसते, बाहेर कितीही लोक थांबलेले असूदे हे आपले काम आरामातच करणार.

त्यांना बघून असे वाटत असते की, कदाचित ह्यांना ATM मध्ये वेळ घालविण्याचाच पगार मिळत असावा.

 

 

२. ATM च्या बाहेर जेव्हा तुम्ही रांगेत असता तेव्हा त्याच रांगेत एक महाशय असे देखील असतात जे सतत सर्वांकडे संशयाच्या नजरेने बघत असतात. जसे काही त्यांनी पैसे काढल्यावर बाकीचे त्यांना लुटण्यासाठीच रांगेत उभे आहेत.

 

 

३. ह्या व्यक्तींचा तर सर्वात राग येतो. नेमका आपल्याला उशीर होत असतो आणि तेव्हाच ATM मध्ये एक असा प्राणी शिरतो ज्याला पिन विसरायची सवय असेल. आणि मग तो जो काही वेळ घेतो ना… जाऊ द्या, आश्यांच्या पापांची शिक्षा त्यांना देव देईलच… ‘उपरवाला सब देखता है!’

 

 

४. ह्यातच एकजण असा देखील असतो ज्याला एवढी घाई असते की, जसे काही ह्याची शेवटची गाडीच सुटणार आहे. अश्या व्यक्तींना बघून चित्रपटसृष्टीचा तो काळ आठवतो जेव्हा डॉक्टर सांगायचे की,

‘जर तुम्ही अर्ध्या तासात २ लाख रुपयांह बंदोबस्त करू शकले तरच आम्ही तुमच्या आईचं ऑपरेशन करू…’

५. प्रत्येक वेळी ATM च्या रांगेत एक अतिहुशार व्यक्ती असतो. जो स्वतःचे स्वयंघोषित अशी ATM शिकवणी उघडून बसतो. असे लोक आधी स्वतः ATM मशीन मधून पैसे काढून प्रॅक्टिकल करून दाखवतात आणि त्यानंतर दुसऱ्याला तसेच करायला सांगतात.

इतरांची मदत करणे चांगले आहे. पण १५-२० मिनिटांनी जेव्हा ते दोघेही ३००-४०० रुपये काढून बाहेर येतात ना… तेव्हा खरंच असं वाटत की देव आपल्या सहनशिलेतेची परीक्षा घेतो आहे.

 

 

६. ह्या लोकांपासून तर दूरच राहावे, ह्या लोकांना घरी जायची एवढी घाई असते की पैसे काढल्यावर आपलं ATM कार्ड हे मशीनमधेच विसरून जातात.

 

 

७. तर दुसरीकडे काही असे असतात जे आपल्या ATM कार्ड ला एवढ जपून जपून वापरतात जणू काही ते कार्ड नसून अल्लादीनचा चिराग आहे.

 

 

८. ATM मधून पैसे काढल्यावर मशीन आपल्याला आपल्या खात्यात जमा शिल्लक रक्कम दाखवते. पण काही लोक एवढे हुशार असतात की, ते पैसे काढण्याआधी तसेच पैसे काढल्यावर देखील आपली शिल्लक परत परत चेक करत असतात. अश्या लोकांवर एक्स्ट्रा कर लावायला हवे.

 

 

९. ह्यात एक असा देखील असतो जो अगदी घाबरून घाबरून आपला व्यवहार करत असतो. जणू काही एखादे चुकीचे बटन दाबल्याने त्यांच्या खात्यातील सर्व पैसे दुसऱ्या कोणाच्या खात्यात जमा होतील.

 

 

१०. काहींना तर अति घाई असते, म्हणजे ह्यांच्यात संयम नावाची गोष्टच नसते. त्यांना बघून असे वाटते की आज हा ATM तोडून पैसे काढणार आहे.

११. असेही अनेक लोक असतात ज्यांना ATM मधून पैसे काढण्यापेक्षा समोर लागलेल्या कॅमेऱ्याकडे बघण्यात जास्त इंटरेस्ट असतो. एवढच नाही पैसे काढता काढता ते त्या कॅमेऱ्यासमोर आपल्यातली कला दाखवत एक छोटसं ऑडिशन देखील देऊन टाकतात.

जसे काही त्या कॅमेऱ्याचं लाइव्ह प्रक्षेपण भन्साळीच्या ऑफिसमध्येच सुरु आहे.

 

 

१२. ह्यातच ते लोकं देखील असतात जे आपलं ATM पिन टाकताना कॅमेऱ्यापासून असे काही लपवतात, जणू त्यांना पिन बघून कोणी त्यांच्या पैश्यांची चोरीच करणार आहे.

 

 

१३. एकतर कळत नाही की जर ATM तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या खात्यातील जमा रक्कम दाखवत आहे तर मग तुम्ही स्लीप का घेता.

आणि घेतल्यावर त्यावर एक नजर टाकून अश्या काही द्वेषाने तिला बिनमध्ये टाकतात जणू काही त्यात इंडिया वर्ल्ड कप हरल्याची बातमी छापलेली असेल.

 

 

१४. त्यातच काही असे लोकं असतात ज्यांना पैसे काढण्यावर कमी आणि व्यवहार झाल्यावर कॅन्सलची बटन दाबण्यावर जास्त फोकस असतो. तो एकदा नाही तर तीन-चार वेळा कॅन्सलची बटन दाबतो.

जणू काही त्याने खूप मोठा गुन्हा केला आहे आणि आता तो त्याचे सर्व पुरावे नष्ट करतो आहे.

१५. एक असा देखील असतो जो पैसे काढताना वारंवार मागे वळून बघत असतो जणू काही संपूर्ण जगाचे लक्ष ह्यावरच लागलेलं आहे.

आणि जर चुकीने एका ठिकाणी दोन मशीन असतील आणि तुम्ही ते व्यवहार करत असताना एन्ट्री केली तर ते अश्या संशयास्पद नजरेने तुमच्याकडे बघतात ना जणू काही ते RAW चे एजेंट आहेत आणि आपण त्यांची खुफिया माहिती जाणून घेण्यासाठी आलो आहोत.

 

 

 

१६. ह्यानंतर शेवटी आपण ATM मध्ये जाऊन आपले पैसे काढतो आणि ५ मिनटात बाहेर येतो कारण आपल्याला आधीच उशीर झालेला असतो, त्यात आणखी एकजण अडवा येणार आणि विचारणार, “ATM सुरु आहे न?”… “चिल्लर आहेत की नाही?”….

त्यावेळी ATM मधून पैसे काढणे हे जगातील सर्वात कठीण काम असल्यासारखं वाटत…

 

जर तुम्हालाही अश्या प्रकारचे लोकं ATMच्या जवळपास आढळले असतील तर तुमचे किस्से आमच्यासोबत नक्की शेअर करा…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version