' खिलजी आणि मुघल – दोघेही “मुस्लिम” शासक, पण दोघांमध्ये हे महत्वाचे ८ फरक होते! – InMarathi

खिलजी आणि मुघल – दोघेही “मुस्लिम” शासक, पण दोघांमध्ये हे महत्वाचे ८ फरक होते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पद्मावत हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाने जगभरात जवळपास ४०० कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटामध्ये राणी पद्मावतीची भूमिका दीपिका पदुकोन, राजा महारावल रतन सिंगची भूमिका शाहिद कपूर आणि अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका रणवीर सिंगने साकारली आहे.

या चित्रपटातील अल्लाउद्दीन खिलजी हे पात्र लोकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे.

 

padmavati-khilji-inmarathi
hindi.bloggerpile.com

अल्लाउद्दीन खिलजी हा इसवीसन तेराव्या शतकातील खिलजी घराण्यातील दिल्लीचा सुलतान होता. त्याने इ.स. १२९६ ते इ.स. १३१६ या कालावधीत राज्य केले. तो खिलजी घराण्यातील सर्वात कर्तबगार सुलतान समजला जातो.

खिलजी घराणे आणि मुघल घराणे हे इतिहासातील दोन बलाढय साम्राज्य होती. पण यांच्या शासन पद्धती आणि इतर काही गोष्टी भिन्न होत्या.

 

हे ही वाचा –

===

 

आज आपण या दोन महासत्तांमध्ये असलेल्या फरकांबद्दलच जाणून घेणार आहोत.

१. बहुतेक मुघल सम्राटांनी मालवा पठारापासून भारताच्या दक्षिणेपर्यंत आक्रमण करून आपली सत्ता पसरवण्याचा प्रयत्न केला. खासकरून दख्खन आणि दक्षिणेकडील श्रीमंत राज्यांवर त्यांचे लक्ष होते. पण खिलजींनी या प्रदेशांवर आक्रमण केले नाही, कारण त्यांनी भारतीय क्षेत्रातून पाहिजे असलेली संपत्ती लुटून नेली होती. एक हा घटक होता.

 

Difference between Khiljis and Mughals.Inmarathi
vam.ac.uk

दुसरे असे की, अफगाणिस्तान, बलुचिस्तान आणि इतर मध्य आशियाई राज्यांतील प्रांत यांच्यावर खिलजींनी अधिक लक्ष दिले होते. त्यांनी बंगाल प्रांतात देखील प्रवेश करण्याचा प्रयत्न केला नाही.

२. मुघलांचा राजकीय हेतू हा खिलजींच्या तुलनेत अधिक स्पष्ट आणि प्रखर रासाठी मुघलांनी सरदारांच्या नेतृत्वाखाली सर्व दिशांमध्ये एकाच वेळी आपले सैन्य पाठवले होते आणि अनेक मोहीम एकाचवेळी चालू ठेवल्या. पण खिलजी मात्र एकावेळी फक्त एकच मोहीम पार पाडत असत.

 

Difference between Khiljis and Mughals.Inmarathi1
indiannerve.com

मुघल बादशाह याने एकाचवेळी काबुल, आसाम, मुल्तान, काश्मीर, आसाम अशा अनेक ठिकाणी आपल्या फौजा पाठवून आक्रम केले आणि आपले साम्राज्य विस्तारण्याचा प्रयत्न केला. पण खिलजी यांच्या अगदी विपरीत होते. खिलजी कधीही एकावेळी एकाच लक्ष ठेवत असत आणि त्यांचावरच सर्व शक्ती लावत असत.

३. कलेमध्ये आणि वास्तुकलेमध्ये मुघलांना खूप आवड होती. मुघलांनी नेहमीच कलेची योग्यप्रकारे जपणूक केली. त्यामुळे मुघलांनी बांधलेली स्मारके आणि किल्लेहि खूपच सुशोभित आहेत.

 

Difference between Khiljis and Mughals.Inmarathi2
blogspot.com

त्यांनी त्यांच्या जोपसण्याकडे देखील योग्यप्रकारे लक्ष दिले.पण खिलजींना कला आणि वास्तुकलेमध्ये काहीही रस नव्हता. ते खूप कमी प्रमाणात याकडे लक्ष देत असत.

४. अल्लाउद्दीन खिलजी ( एक यशस्वी खिलजी सुलतान ) याने आपल्या स्वतःचा काका जल्लालुद्दीन खिलजी याला ठार मारून सत्ता हस्तगत केली होती.

 

viraldrafts.com

मुघलांमध्ये त्यांच्या वारसांना त्यांच्या श्रेणीनुसार सत्ता बहाल करण्याची परंपरा होती. पण फक्त औरंगजेबने सत्ता मिळवण्यासाठी आपल्या तीन भावांना ठार मारले होते.

५. मुघलांनी साम्राज्याचे सत्तेचे विकेंद्रीकरण केले होते. साम्राज्यामध्ये खूप सुभेदार होते ( जे प्रांत चालवत होते ), सरदार (अमीर-उमराव) , अंमलदार (वरिष्ठ अधिकारी) आणि दिवाण (प्रशासनिक व्यवस्थापक) होते.

हे ही वाचा –

===

 

Difference between Khiljis and Mughals.Inmarathi3
sutori.com

पण खिलजींच्या साम्राज्यामध्ये असे काहीही नव्हते. संपूर्ण साम्राज्यामध्ये फक्त एक सुलतान होता, जो संपूर्ण साम्राज्य चालवत असे. येथे सत्तेचे विकेंद्रीकरण फार कमी प्रमाणात होत असे.

६. महसूल प्राप्त करण्यासाठी मुघल हे कर आकारत असत. काही कर म्हणजेच जसा जिझिया कर हा लोकांवर लादण्यात येत असत. तसेच मुघल साम्राजामध्ये प्रत्येकाला कर भरणे हे सक्तीचे होते.

 

Difference between Khiljis and Mughals.Inmarathi4
blogspot.com

खिलजी साम्राज्यामध्ये करातून कमाई देखील केली जात असे. पण खिलजींची बहुतांश संपत्ती ही साम्राज्यातील हिंदू मंदिरांना लूटूनच कमावण्यात येत असे.

७. खिलजी हे भारतात तुर्कीमिनिस्तान (टर्की) मधून आले होते आणि मुघल हे भारतामध्ये फेरगाना (उझबेकिस्तान) मधून आले होते.

 

islam-in-india-inmarathi
themuslimissue.files.wordpress.com

 

८. औरंगजेब सोडून इतर मुघल बादशहा हे मुस्लिम नसलेल्या लोकांविषयी सहिष्णू होते. पण दिल्लीचे खिलजी सुलतान हे गैर मुस्लिम लोकांशी सहिष्णू नव्हते.

 

Difference between Khiljis and Mughals.Inmarathi6
tellychakkar.com

तसेच, मुघल हे गैर मुस्लिम साम्राज्यातील स्त्रियांशी वैवाहिक संबंध ठेवत असत. पण खिलजींनी अल्लाउद्दिन खिलजी याचा मोठा पुत्र खिज्र खान याने वाघेला घराण्यातील एका राजकन्येशी केलेला विवाह वगळता कधीही गैर मुस्लिम स्त्रियांशी विवाह केला नाही.

हे आहेत, भारतामध्ये राज्य केलेल्या दोन मुस्लिम बलाढ्य साम्राज्यांमधील फरक. खिलजींनी भारतामध्ये खूप कमी काळ राज्य केले. पण मुघलांनी भारतामध्ये जवळपास २०० वर्ष राज्य केले आणि आपली सत्ता कायम ठेवली.

हे दोन्ही शासक मध्युगीन काळात भारतात परकीय आक्रमक म्हणून आले. धर्माच्या आणि सत्तेच्या प्रेरणेने त्यांनी भारतात प्रचंड अमानुष गोष्टी केल्या. पण खिलजी आणि मुघल हे मुस्लीम हा एक समान धागा वगळता गुणात्मक दृष्टीने बरेच वेगळे होते.

हे ही वाचा –

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?