Site icon InMarathi

जर तुमच्यातही हे ८ गुण असतील तर समजा की तुम्ही बुद्धिमान आहात!

memory-inmarathi

brainfacts.org

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपण नेहमी बुद्धिमान लोकांबद्दल बोलताना त्यांची बुद्धिमत्ता, त्यांच्या सवयी, त्यांचे विचार यांबाबत बोलत असतो. आपण त्यांचे विचार आपल्या जीवनात अवलंबण्याचा प्रयत्न करत असतो.

पण हे बुद्धिमान लोक देखील आपल्यासारखे सामान्य मनुष्यच असतात. फक्त त्यांच्यातील काही गुण त्यांना आपल्यापेक्षा अधिक बुद्धिमान बनवितात.

कधी तुम्ही विचार केला आहे का, की जर तुमच्याजवळ एका सामान्य व्यक्तीच्या तुलनेत जास्त बुद्धी असती तर? म्हणजे जर तुमची बुद्धिमत्ता एका साधारण व्यक्तीच्या तुलनेत जास्त असती तर?

कधी तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेवर संशय आला आहे का? जर हे सर्व तुमच्यासोबत देखील घडले आहे तर तुम्ही खरंच बुद्धिमान आहात.

आता तुम्ही विचार करत असाल की, हे कसं शक्य आहे. तर हा लेख वाचल्यावर तुम्ही इतरांच्या तुलनेत अधिक बुद्धिमान आहात की नाही हे तुम्हाला कळेल.

स्वतःशीच बोलणे :

आपण अनेकदा स्वतःशीच बडबडत असतो. काही विषयांवर स्वतःशीच बोलत असतो. अश्या वेळी आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला वेड्यात काढतात.

पण जे स्वतःशीच बोलतात ते लोक खूप बुद्धिमान असतात असे अनेकदा निरीक्षणात दिसून आले आहे.

 

 

जेव्हा आपण स्वतःशीच बोलतो तेव्हा त्यामुळे आपल्या विचारांना आधार मिळतो. ह्यामुळे आपण गोष्टींना अधिक चांगल्या रीतीने स्मरणात ठेवू शकतो.

जर तुम्ही देखील स्वतःशीच बोलत असाल तर तुम्ही वेडे नाही तर बुद्धिमान आहात.

जिज्ञासू असणे :

 

हे ही वाचा – अतिशय हुशार असूनही कित्येक लोक अयशस्वी होतात…! कारण ह्या “८” गोष्टी त्यांना सतत मागे खेचतात..!

बुद्धिमान लोक इतरांपेक्षा जास्त जिज्ञासू असतात. ते त्यांच्या आसपासच्या लोकांबद्दल, वस्तूंबाबत अधिकाधिक जाणून घेण्यास उत्सुक असतात.

त्यांच्यातील जिज्ञासा कधीही संपत नाही. त्यांना नवनवीन गोष्टी शोधायला नेहमी काहीतरी नवीन करत राहायला आवडते.

पुस्तकांची आवड :

 

जर तुम्हाला रात्री पुस्तकं वाचल्याशिवाय झोप येत नाही तर तुम्ही बुद्धिमान आहात हे समजायला काहीही हरकत नाही.

 

pinkvilla.com

 

ज्या लोकांना वाचनाची आवड असते ते इतरांपेक्षा जास्त बुद्धिमान असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीबाबत माहिती असते. असे लोकं इतर कामात आपला वेळ खर्च न करता पुस्तकं वाचण्याला पसंती देतात.

चिंतीत असणे :

 

Patrika

 

अनेक संशोधनात असे सिध्द झाले आहे की, जे लोक घाबरलेले किंवा चिंतीत असतात ते लोक अधिक बुद्धिमान असतात.

असं ह्याकरिता कारण जे लोकं चिंतेत असतात ते समोर येणाऱ्या संभाव्य समस्येच्या समाधानाबाबत आधीच विचार करून ठेवतात.

अस्ताव्यस्त खोलीत काम करणे :

 

 

बुद्धिमान लोकांची काम करण्याची जागा नेहमी अस्ताव्यस्त असते. कारण त्यांना अश्या स्थितीत काम करायला आवडत असते. अश्या स्थितीत त्यांचं डोकं अधिक काम करतं.

जर तुमची खोली देखल अशीच अस्ताव्यस्त असेल तर समजून जा की, तुम्ही देखील बुद्धिमान आहात.

रात्री उशिरापर्यंत काम करणे :

 

 

वैज्ञानिकांच्या मते रात्री उशिरापर्यंत जागून काम करणारे लोक इतरांच्या तुलनेत अधिक बुद्धिमान असतात. कारण साधारणपणे इतर कोणी असं रात्री जागून काम करू शकत नाही.

केवळ बुद्धिमान लोकच असं करू शकतात. ते नेहमी त्यांच्या क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करत असतात.

नवीन गोष्टी शिकायला आवडणे :

 

 

बुद्धिमान लोकांना नवनवीन गोष्टी शिकायला मजा येते. म्हणून ते क्रिएटीव्ह असतात आणि त्यांना मानसिक आव्हाने स्वीकारण्यात जास्त रुची असते.

वस्तू विसरणे :

 

जर तुम्ही नेहमी तुमच्या वस्तू किंवा कुठली गोष्ट विसरत असाल, तर तुम्ही बुद्धिमान आहात. कारण बुद्धिमान लोकांच्या डोक्यात एका वेळी अनेक विचार सुरु असतात म्हणून ते गोष्टी विसरतात.

विनोदी स्वभाव :

 

 

एका रिसर्च नुसार बुद्धिमान लोकांचा सेन्स ऑफ ह्युमर अतिशय चांगला असतो. त्यामुळे ते अतिशय विनोदी असतात.

बुद्धिमान लोकांच्या बाबतीत नोंदवली गेलेली ही काही निरीक्षणे आहेत.

पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. ती म्हणजे, माणसाचा बुध्यांक (Intelligence quotient) मोजण्याची एक ठराविक शास्त्रशुध्द पद्धत आहे.

मानसशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात ती अंतर्भूत आहे. बुध्यांक मोजण्याची तीच योग्य पद्धत आहे.

ही निरीक्षणे म्हणजे तुम्ही बुद्धिमान असण्याची काही लक्षणे आहेत.

===

हे ही वाचा – IAS मुलाखतीमध्ये विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी बिरबलाचंच डोकं हवं!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version