आंदोलनकारी, सुरक्षा, मानवी हक्क आणि शस्त्रांचे आधुनिकीकरण
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
एप्रिल १०, २०१७ ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरमध्ये आंदोलकांवर नियंत्रण आणण्यासाठी पॅलेट गनच्या वापरावर बदल करण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने पॅलेट गनचा वापर स्वैरपणे करण्यास मनाई केली. या बंदुकीमुळे बर्याच जणांना अंधत्व आले असेही निदर्शनास आले.
पोलीस आणि सुरक्षा दलाने जरी ही बंदूक धोकादायक नसल्याचा निर्वाळा दिला असला तरी डॉक्टरांच्या मते या बंदुका धोकादायक असल्याचे म्हणले. बरेच आंदोलनकारी एकतर पूर्णपणे आंधळे झाले किवा त्यांच्या दृष्टीला बाधा पोहोचली.
CRPF काश्मीर खोर्यात शांतता नांदावी यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे आणि त्यांचे योगदानसुद्धा खूप मोठे आहे. ज्यावेळेस आंदोलकांची गोष्ट येते तेव्हा त्यांची सुरक्षा आणि त्यांचे हक्क यावर बरीच चर्चा होते. पण, CRPF चे जे अधिकारी आणि जवान यासाठी आपला जीवसुद्धा द्यायला तयार आहेत त्यांच्यावर आणि त्यांच्या हक्कावर एवढी चर्चा होत नाही.
एकीकडे हिंसक आंदोलक मोठ्या संख्येत आणि एकीकडे मुठभर CRPFचे कर्मचारी. हा एक वेगळा विषय झाला, पण असो. या बंदुकीत मग थोडे बदल करून पुन्हा वापर चालू झाला.
एका CRPF अधिकार्याच्या माहितीनुसार CRPF च्या सैनिकांना असा आदेश आहे की आंदोलकांच्या पायावर मारा करायचा, जेणेकरून पोटाच्या वर काही इजा होणार नाही. पण, या पॅलेट रस्त्यावर किंवा कडक पृष्ठभागावर आदळून पुन्हा उसळी घेऊ शकतात आणि चेहऱ्याला किंवा डोळ्याला इजा करू शकतात.
आता प्रश्न येतो की हिंसक जमावाला पांगवणार तर कसे?
सुरक्षा दलाला आंदोलकांना इजा पोहोचवण्यात काही एक सुख मिळत नाही आणि त्यांचा तो उद्देशसुद्धा नसतो. ते त्यांच्या शिस्तीला आणि आदेशाला बांधील असतात. त्यांचा उद्देश असतो तो जमावाला पांगवणे. जमावाला पांगवताना अशा गोष्टी वापरायच्या ज्या धोकादायक नाही आहेत. पण तणाव आणि हिंसेच्या घटनेदरम्यान जमावाला पांगवण्यासाठी अखेरचा पर्याय म्हणून पॅलेट गनचा वापर केला जातो.
तसेच अश्रुधूर, पाण्याचा मारा, इत्यादींचासुद्धा उपयोग होतो. अश्या अधोकादायक शस्त्रांचा ( non lethal weapon) उपयोग मानवी हाणी, साधनसंपत्तीची हाणी आणि सुरक्षा दलाची हाणी रोखण्यासाठी होतो. त्यांचा उद्देश एकच उपद्रव करणाऱ्या आंदोलकांची शक्ती आणि क्षमता आहे तिथेच संपवणे किंवा त्यांना जागच्या जागीच असमर्थ करणे.
आज आपण अशाच काही अभिनव गोष्टींशी परिचय करून घेऊ.
१) Long Range Acoustic Device (LRAD):
एक गोष्ट तर सर्वश्रुत आहे की मोठा आवाज प्रचंड वेदना देतो आणि कदाचित एखादी व्यक्तीला श्रवणदोषसुद्धा होऊ शकतो. नेमकी हीच गोष्ट हे उपकरण बनवताना वापरली गेली. याचा उपयोग प्रथमतः दूरवर आदेश पोहोचवण्यासाठी केला गेला. समुद्री चाच्यांवर लगाम घालण्यासाठीसुद्धा याचा वापर केला गेला.
हे उपकरण प्रसिद्ध झाले ते ‘Occupy Wall Street’मुळे!
हे उपकरण ८ वर्ष आणि $४० मिलीयन खर्च करून तयार झाले आहे. लेसर सारखेच हे उपकरण ध्वनीलहरी एका ठराविक दिशेने पाठवते. आता तुम्ही दूर जरी गेले तरी तुम्हाला आवाज ऐकू येणार. मानवी श्रवणक्षमता जी ९५ डेसीबलच्या पुढे खिळखिळी होते, तेथे हे उपकरण १५५ डेसीबल क्षमतेच्या ध्वनीलहरी तयार करते. आहे की कमाल! आंदोलक स्वतःच याच्यापासून दूर जाणार. सध्या याचा उपयोग इराक, अफगाणिस्तान आणि टर्की येथे होतो. याचा उपयोग आपल्याकडे नक्कीच होऊ शकतो.
२) Vehicle Mounted Active Denial System:
हे उपकरणसुद्धा अफलातून आहे. याला ‘उष्ण किरण’ असेही संबोधले जाते. जमावाला काबू करण्यासाठी आणि perimeter security यासाठी हे वापरले जाते. घरोघरी असणार्या microwave oven सारखे हे काम करते. जसे microwave oven magnetronच्या सहाय्याने microwave निर्माण करते आणि खाद्यवस्तू गरम करते, अगदी त्याच प्रकारे हे उपकरण gyrotronच्या सहाय्याने मिलीमीटर wave निर्माण करते.
ही wave मग प्रकाशाच्या वेगाने लक्ष्याचा वेध घेते. ज्या वेळेस अशी केंद्रित high energy beam त्वचेवर पडते, तेव्हा त्वचेवर असणार्या छोट्या पाण्याच्या रेणूसोबत संबध येताच अतीव उष्णता निर्माण होते. तसेच आपल्या शरीरातसुद्धा पाणी असते. ही beam त्वचेला भेदत आत जाते आणि पाण्याला गरम करते. अश्या वेळेस आपले शरीर मेंदूला संकेत देते की बाजूला होणे गरजेचे आहे आणि शरीर आपोआप दिशा बदलते. आपली अशी उष्णता सहन करण्यास आपले शरीर सक्षम नाही.
जिथे सगळे उपाय फसतात तिथे याचा उपयोग होतो. हे उपकरण स्वतःच मानवी धोका ओळखते आणि आपोआप बंद होते. ५०० मीटरपर्यंत हे उपकरण उपद्रवकारी आंदोलकांना काबूत आणू शकते.
३) बंदूक:
समजा तुम्ही तुंबलेल्या नाल्यासामोरून जात आहात. समजा हा नाला सर्व प्रकारच्या गोष्टींनी भरला आहे. जसे की एखादे मेलेले जनावर, अंडी, मानवी विष्ठा, सडलेल्या भाज्या, इत्यादी. एकदा प्रयोग करा आणि तुम्ही किती वेळ तिथे थांबू शकता हे बघा. वाटलंच तर घड्याळ्याची मदत घ्या. अश्या वेळेस आपला मेंदू आपोआपच अश्या जागेतून निघण्यास आपल्या शरीराला आदेश देईल. याच गोष्टीचा फायदा इस्राइलने घेतला आणि तयार केली skunk बंदूक अथवा ज्याला आपण water cannon म्हणतो.
आता ही साधीसुधी water cannon नाही. यात एक खास रसायन आहे, ज्याच्यामुळे याला एकदम घाणेरडा असा वास येतो. अगदी वर सांगितल्या सारखा. अश्या पाण्याला उपद्रवीच्या डोक्यावर मारले जाते. मग त्या उपद्रवीने कोणतेही अत्तर लावा, कोणतीही साबण वापरू दे हा वास सहजासहजी जाणार नाही. ज्यांचा अभिषेक अश्या पाण्यानी झाला आहे, अश्यांजवळ लोकं एक एक आठवडा फिरकले नाही.
२०१० साली पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांनी Rapid Action Force चे आधुनिकीकरण करू असे बोलले होते.
त्यात किती प्रगती झाली हा वेगळा विषय. विद्यमान सरकारने किती आधुनिकीकरण केले हासुद्धा वेगळा विषय. सुरक्षा दलातल्या अधिकारी आणि जवान यांची संख्या बघता त्यांना आपण उपद्रव रोखण्यासाठी किती पर्याय उपलव्ध करून दिले हा नेमका विषय. त्यांच्या हक्कांना किती शाबूत ठेवले हा विषय.
वर सांगितललेल्या अभिनव शस्त्रांचा जर उपयोग झाला तर नक्कीच त्यांचे हक्क शाबूत राहतील, त्यांच्यावरचा मोठा ताण हलका होईल हे मात्र नक्की!
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.