Site icon InMarathi

हॉटेलमध्ये तुम्हाला बिर्याणी म्हणून पुलावच दिला जात नाही ना? दोन्हीत फरक आहे, जाणून घ्या..

biryani-pulao-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

खाण्याच्या बाबतीत दोन प्रकारचे लोक असतात, एक म्हणजे शाकाहारी आणि दुसरे म्हणजे मांसाहारी. ह्या दोघांचेही आपआपल्या खाण्याविषयी वैयक्तिक मतं असतात. “आणि तेवढंच प्रेमही”… पण ह्यांच्यात मतभेद तेव्हा होतात जेव्हा पुलाव खाणारा शाकाहारी वर्ग हा बिर्याणी हा देखील पुलावचाच प्रकार असल्याचे सांगत असतात.

 

cooktube.in

 

म्हणून आज आम्ही तुम्हाला पुलाव आणि बिर्याणी यात नेमका काय फरक असतो तो समजावून सांगणार आहोत, जेणेकरून तुमची परत कधी पुलाव आणि बिर्याणी याच्यात गफलत होणार नाही.

बिर्याणी आणि पुलाव हे दोन्ही भाताचे वेगवेगळे पण लोकप्रिय प्रकार आहेत. तसेच त्यांना बनविण्याच्या पद्धती देखील खूप वेगळ्या आहेत. ह्यासाठी वापरण्यात येणारी साधनसामुग्री देखील वेगवेगळी आहे. कारण ह्या दोन्ही डिश वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या आहेत.

असं म्हणतात की, बिर्याणी खावी, तर एखाद्या मुस्लिम खानसाम्यानं तयार केलेलीच. त्याच्या हाताची चव इतर कुठेही नाही.

आपल्याला शहरात अनेक ठिकाणी ‘ऑथेंटिक दम बिर्याणी’ असे बोर्ड लागलेले दिसतात. आणि आपणही ह्या बिर्याणीच्या प्रेमात एखाद्या प्रेमअंधळ्या प्रियकराप्रमाणे त्या नॉट सो ऑथेंटिक दम बिर्याणीला आपलं सर्वस्व समजतो.

 

ndtv.com

 

पण बहुतेक वेळी अश्या ठिकाणी खवय्यांची फसवणूकच होताना दिसून येते. बहुतांश ठिकाणी मटण किंवा चिकन शिजवतात. दुसरीकडे भात शिजवतात. नंतर मग हे दोन्ही पदार्थ एकत्र करून अतोनात मसाले आणि बळजबरीचा दम त्यात भरला जातो. आणि असा हा बेचव भात दम बिर्याणी म्हणून सर्व्ह केला जातो. पण ह्याला ‘ओपन’ किंवा ‘अखनी’ बिर्याणी असे म्हणतात.

अशा बिर्याणीला ‘दम बिर्याणी’ म्हणणं म्हणजे बिर्याणीचा अपमानच..!

बिर्याणी म्हणजे मुघलांची ओळख आहे, नावाबांची शान आहे.. त्यातच दम बिर्याणी… ह्याच्या फक्त नावातच दम नाही, तर आस्वादही दमदार, कधीही न विसरल्या जाणारा सुगंध आणि स्वाद. जे खाल्ल्याने पोट एकवेळच भरेल पण मन… शक्यच नाही.

 

 

पर्शियातून भारतात आलेली दम बिर्याणी म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच ठरली आहे.

एकदम दर्जेदार मटण किंवा चिकन, उच्च प्रतीचा बासमती तांदूळ, साजूक तूप, दही, केशर, हवा असल्यास सुकामेवा, बारा-पंधरा प्रकारचे मसाल्याचे पदार्थ आणि स्वादासाठी आवडीनुसार इतर अनेक गोष्टींचा अंतर्भाव. तयार करण्याची प्रक्रियाही भलतीच दमदार. शॉर्टकट मारला, की ना स्वाद, ना चव आणि ना दम.

बिर्याणी अनेक प्रकारांनी तयार केली जाते. नवाबांच्या लखनऊमध्ये मिळणाऱ्या बिर्याणीचा रुबाब वेगळा. केरळमधील मलबार, अल्लपुळा आणि तलाश्शेरी बिर्याणीचा थाट निराळाच. तमिळनाडूतील दिंडिगुल किंवा कर्नाटकातील भटकळची बिर्याणी स्वतःचा खास स्वाद घेऊन येते. पण सर्वोत्तम बिर्याणी म्हणजे हैदराबादची अस्सल ‘दम बिर्याणी’.

 

hungryforever.com

 

पुलाव आणि बिर्याणी ह्या दोन्ही डिश मध्ये खूप अंतर आहे. काही लोकांना अस वाटतं की ह्या जवळपास सारख्याच पण ह्यांच्यात तेवढाच फरक आहे जेवढा काश्मीर आणि माथेरान मध्ये.

तांदळच्या प्रकारापासून ते कुठले मसाले कधी वापरायचे हे देखील वेगवेगळ असतं. एवढंच नाही तर ह्याला शिजविण्याचा पद्धती देखील वेगळ्या असतात.

 

steffisrecipes.com

 

पुलाव हा भारत ते तुर्की पर्यंत आहारात असणारा आवडीचा पदार्थ आहे. ह्याला बनविण्याची पद्धत तशी फारशी वेगळी नाहीच. ह्यात तांदळात भाज्या टाकून त्या सोबतच शिजवल्या जातात.

पण बिर्याणीत… बिर्याणी तर खासच, म्हणून त्याला बनविण्याची पद्धत देखील खास. त्यासाठी आधी चांगल्या प्रतीचा तांदूळ निवडला जातो. त्यानंतर त्याला अर्ध शिजवलं किंवा पाण्यात उकडलं जातं. ज्यानंतर मॅरीनेट केलेलं चिकन-मटण किंवा सोयाबीन त्यात घालून त्याला परत शिजवले जाते.

 

files.wordpress.com

 

पुलाव ह्यात जास्त मसाल्यांचा वापर केला जात नाही. तर दुसरीकडे बिर्याणी, ज्यात नानाविध प्रकारचे मसाले परफेक्ट प्रमाणात वापरले जातात. जसे की, लवंग, दालचिनी, विलायची, केसर, मिरे, दगडफूल वगैरे वगैरे… ह्यानेच तर त्या बिर्याणीला तोंडाला पाणी सोडणारा सुगंध येतो…

पुलाव बनविताना तांदूळ आणि भाज्या ह्यांना सोबतच शिजवले जाते. पण बिर्याणीत असे होत नाही. बिर्याणीमध्ये वेगवेगळ्या लेयर्स असतात.

 

ashishbhatia3.wordpress.com

 

आधी चिकन/मटणची लेयर त्यावर भाताची लेयर मग परत चिकन/मटण मग परत भात त्यावर ते केसर, तूप आणि तळलेल्या कांद्याचा सडा… वाह! असेच उद्गार निघतात ते बघितल्यावर.

पुलाव हा मिडीयम आचेवर शिजवला जातो तर बिर्याणीला अगदी मंद आचेवर निवांतपणे शिजवले जाते. जेणेकरून त्यातील संपूर्ण फ्लेवर्स खुलून यावे, आणि चिकन/मटण हे व्यवस्थित शिजावे.

बघितलत किती फरक असतो पुलाव आणि बिर्याणीमध्ये…

अनेक हॉटेल्स मध्ये बऱ्याचदा बिर्याणी म्हणून पुलाव सारखा बनवलेला पदार्थ दिला जातो. पण तुम्ही जे खाता त्यात आणि बिर्याणीत हा एवढं फरक असतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version