Site icon InMarathi

“अछे दिन” येण्याची चिन्हे नाहीतच!

Modi-failure-inmarathi

newslaundry.com

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

३ वर्षांपासून काही “अच्छे दिन” च्या गोष्टी सतत ऐकू येत असतात. खतांवर “निम कोटिंग” केल्यामुळे हजारो कोटी वाचले. DBT मुळे हजारो कोटी वाचले.
आधार लिंकिंग मुळे शेकडो कोटी वाचले.

ह्या वाचलेल्या पैश्यांचं काही होतंय की नाही? काय होतंय?

इन्फ्रा डेव्हलपमेंटमध्ये पैसे ओतले जाताहेत असं म्हटलं जातं. पण शाळा तितक्याच बकाल आहेत. दवाखाने तितकेच भकास आहेत. सरकारी कार्यालयं अजूनही मध्ययुगीन काळातली वाटतात. कुठे जाताहेत पैसे?

 

assettype.com

लोकांनी “देशासाठी गॅस सबसिडी सोडली” म्हणजे स्वतःच्या खिशातून देशासाठी खारीचा वाटा उचलला. ह्या खारीच्या वाट्यातून कोणता विकास सेतू बांधला जातोय?

 

thehawk.in

आकडेवारीच्या पल्याड काही दृश्य परिणाम दिसताहेत का? मुद्रा योजनेतील कर्जातून उभ्या राहिलेल्या उद्योजकांचे डोळे विस्फारणारे आकडे दिसतात. पण मी व्यक्तिशः ओळखतो अश्या एका माणसाला सुद्धा कर्ज मिळालेलं नाही.

प्रत्येकाची, एकाचवेळी, संतापजनक आणि हताश वाटण्याजोगी, कहाणी आहे.

मेक इन इंडिया च्या मार्केटिंगकडे बघून त्या अफाट कर्जाचं दडपण येतं. पण वाटतं “देश” “तरक्की” करणार असेल, “आगे बढणार” असेल तर हा खर्च सार्थकीच लागणार. पण मेक इन इंडियाचा ताळेबंद दिवाळखोरीसारखा भासतो.

 

thehansindia.com

माझ्या नात्यातील एकाला त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग सेट अप बंद करावं लागलंय. कुटुंब उद्धवस्त झालंय – बँक आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या हप्ते गिरीमुळे.

स्किल इंडिया मुळे सरकारी अनुदानं मिळवून लोकांनी आपापली स्किल डेव्हलपमेंटची दुकानं थाटली.

पण त्यातून घडलेली स्किलफुल जनरेशन दृष्टीस पडत नाही.

अजूनही उद्योगांना हवी असलेली एम्प्लॉएबल तरुणांची फळी प्रकट झालेली नाही.

हा “नकारात्मक चित्र चितारणे” चा उद्योग नाही. बदल घडायला वेळ लागतो वगैरे सगळं ठीक आहे. वाट बघण्याची तयारीसुद्धा आहे.

पण आजूबाजूचं वास्तव अन त्याच्या अगदी विपरीत, सगळं काही आलबेल असणारे आकडे बघून गणित चुकल्यासारखं वाटतं.

 

newslaundry.com

देश बदलतोय, नव्याने उभा रहातोय म्हटल्यावर काही तरी लक्षणं दिसायला हवीत…आकडेवारीच्या पल्याड ती दिसत नाहीयेत. किमान प्रायमरी सिम्पटम्स दिसण्यासाठी वाट किती बघायची, कळत नाहीये.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version