Site icon InMarathi

बापाशीच मुलीचे लग्न : बांग्लादेशच्या या जमातीत आई आणि मुली एकाच घरात नांदतात!

mandi featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आपल्या देशातील लोक आजही एकत्र कुटुंब व्यवस्थेलाच सर्वश्रेष्ठ मानतात. जिथे आजही आई-वडील, मुलं-बाळं, आजी-आजोबा, काका-काकू असे सर्व एकत्र कुटुंबात राहतात. आणि या कुटुंब व्यवस्थेला येणारी पिढी वाढवत असते. जसे की मुलगा मोठा झाला की तो लग्न करून सून आणणार.

आपण देखील नेहमी असंच बघितलं असेल. बघितलं असेल काय कित्येक वर्षांपासून असंच होत आलेलं आहे.

नेहमी लग्नानंतर मुलगी आपलं माहेर सोडून सासरी जाते. तिचं नवीन कुटुंब हे तिचं सासर असत.

आणि ही परंपरा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात पाळली जाते. लग्नानंतर मुलगी ही तिच्या नवऱ्यासोबत राहते.

 

sanjeevnitoday.com

पण आज आम्ही तुम्हाला एका अश्या परंपरेबद्द्ल सांगणार आहोत, ज्या बद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य नक्की वाटेल.

जगातील जवळजवळ सर्वच देशांत मुलीचे लग्न झाले की तिच्या पतीसोबत राहते. पण जगात असे एक ठिकाण आहे जिथे मुलीचे लग्न तिच्याच पित्याशी लावल्या जाते. हो… आश्चर्यकारक असलं तरी हे सत्य आहे.

 

youngisthan.in

 

बांग्लादेश येथील मंडी जनजातीमध्ये अशी परंपरा आहे आणि ते लोक निरंतर ही परंपरा पाळत आले आहेत.

प्रत्येक मुलगी नेहमी एक स्वप्न बघत असते की, तिचा पती अगदी तिच्या पित्यासारखा असायला हवा. पण इथे जन्माला येणाऱ्या मुली लहानपणीपासूनच आपल्या पित्याशी लग्न करण्याचे स्वप्न रंगवत असतात.

येथील ओरोला डॉलबोट ह्या सांगतात की, लहानपणीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता.

पित्याच्या मृत्युनंतर ओरोला डॉलबोट यांच्या आईने दुसरं लग्न केलं. त्यांच्या दुसऱ्या पतीचे नाव नॉटेन असे आहे.

ओरोला यांनी सांगितले की, त्या तीन वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्या आईने दुसरे लग्न केले. तेव्हापासूनच त्यांना त्यांचे दुसरे पिता नॉटेन खुप आवडायचे.

त्या कधी कधी विचार करायच्या की, त्यांच्या आई किती भाग्यशाली आहेत की त्यांना नॉटेन सारखा पती मिळाला.

 

webdunia.com

 

जेव्हा ओरेला मोठ्या झाल्या तेव्हा त्यांना सांगण्यात आले की नॉटेन हे केवळ त्यांच्या आईचेच नाही तर त्यांचे देखील पती आहेत. ही अतिशय विचित्र गोष्ट होती. ज्या व्यक्तीला त्या पिता मानायच्या तेच तिचे पतीदेखील होते.

बांगलादेशाच्या काही आदिवासी क्षेत्रात ही परंपरा आहे. ही परंपरा तेव्हा अमलात आणली जाते जेव्हा एखाद्या स्त्रीच्या पतीचा कमी वयात मृत्यू होतो. अश्या परिस्थितीत त्या स्त्रीला आपल्याच कुटुंबातील कमी वयाच्या मुलाशी लग्न करावे लागते.

ओरेला ह्यांच्या आईसोबत असेच घडले होते. कमी वयाच्या नव्या नवऱ्याचे लग्न त्याच्याच मुलीशी लावून दिले जाते. आई आणि मुलीचं एकाच मंडपात लग्न लावून दिलं जातं.

या परंपरेमागे हा उद्देश असतो की, कमी वयाचा पती हा त्याची पत्नी आणि त्याच्या मुलीचाही पती होऊन दोघांना अधिक काळापर्यंत सुरक्षा देऊ शकतो, सांभाळू शकतो.

 

viratpost.com

 

याच परंपरेमुळे ओरेला यांना नॉटेनपासून तीन मुलं तर त्यांच्या आईला नॉटेनपासून दोन मुलं आहेत.

या माय-लेकी एकाच घरात एकाच नवऱ्यासोबत राहतात.

पण या परंपरेमुळे आई आणि तिच्या मुलीमधील संबंध खराब होतात. कारण एकीकडे त्यांच्यात माय-लेकीचे नाते असते तर दुसरीकडे त्या एकमेकींच्या सवती असतात.

याच कारणामुळे ओरेला आणि त्यांच्या आई यांच्यातील नाते देखील सामान्य नाही. त्यांच्यात नेहेमी तणाव असतो. एकच नवरा असल्याने दोघी एकमेकींवर चिडतात.

भारत आणि बांगलादेश येथे मंडी जमातीचे जवळजवळ २० लाख लोक राहतात. या जमातीच्या लोकांना गारो म्हणून ओळखले जाते. आपल्याच मुलीशी लग्न होणे, ही परंपरा जरी विचित्र वाटत असली तरी ओरेला सारख्या अनेक स्त्रिया बांग्लादेशात ही परंपरा पाळत आहेत.

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version